शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

एक प्रवास आयुष्याच्या आयुष्याची रंगीत पाने

 काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 

नवाक्षरी कविता 

 विषय..एक प्रवास आयुष्याच्या 

*आयुष्याची रंगीत पाने 


पाने चाळली आयुष्याची.          

पान  प्रत्येकच सुंदर 

निहाळली सरलेली ती

होती सारीची मनोहर 


बालपणाचे निरागस 

होतेची पान आनंदित

नव्हते त्यात हेवेदावे

चिंता  व क्लेश विरहीत


यौवनाचे  तर गुलाबी

रंगविलेली स्वप्ने मनी

 कधी किनारी उपवनी

ताज्या झाल्या की आठवणी 


  कर्तव्याचे अन् कर्तृत्वाचे 

 नजरेत येताच  पान

 चढले स्फुरण मनात 

 मिळविलेला जगी मान


आयु करण्या  सप्तरंगी

केली उधळण रंगाची

जगले सदा स्वच्छंदाने

गीत गाणी आनंदाची


रंगची देती मोद जीवा

पहाताची मन झाले दंग

किती मोहक भासले ते

एकाहून एक सुंदर  रंग


मिळाला जन्म मानवाचा

करावे सोने  आयुष्याचे

नको खंत निराशा मनीं

रंग उधळू आनंदाचे


शिकवण माता पित्याची

 संस्काराची सदैव गाठी 

सुख लाभणार संसारी

 विश्वेश्वर सदेव पाठी


 रमले सुखाच्या जीवनी

पान समोर समाधानाचे. 

दिले सारेची विधात्याने

ऋण मानीते  विधात्याचे



वैशाली वर्तक 

अहमदाबाद 




 परिस्थिती बेताची बालपणी

 कष्ट सोसले  जीवनी

 पूंजी दिली  संस्काराची

 फळास आली मोठेपणी


 नाही केली मौजमजा 

नाही केले खोटे हट्ट 

शिकवण होती शिस्तीची




रविवार, २६ जानेवारी, २०२५

सुजाण नागरिक सावध ऐका पुढल्या हाका


सारस्वतांची मांदियाळी (R)

समूह आयोजित उपक्रम क्रमांक 11

विषय...सुजाण नागरिक 

          *विश्वात महान*


आपण नागरिक भारतभूचे

मनी असावा देशाभिमान 

तशीच हवीच देशभक्ती 

देश शोभण्या *विश्वात महान*


पाळू  नियमाची चौकट

राखू स्वच्छ सुंदर भारत

 होऊन सुजाण नागरिक 

देश प्रगती साठी  करू मेहनत


आपण सुजाण नागरिक 

ऐकू  येता मदतीच्या हाका

जाऊ धावून देश रक्षणा

येता कधी प्रसंग बाका.


लावूया झाडे ,वाढवू वनश्री 

जतन करू पर्यावरण 

असता आपण सुजाण नागरिक 

कच-याचे करु नीट नियंत्रण.


गिरवू  पाठ शिस्तीचे. 

करूया संस्कृतीचे  जतन

भाव मनी विश्व बंधुत्वाचा

 समानतेचे  राखू. मनी धोरण



  फिरवा नजर इतिहासात

 नव्या पीढीला करा जागृत

  समजवा यातना पारतंत्र्याच्या

  उमजता होतील  स्वीकृत


 सरकार, *आपणच,आपलेच,आपल्यासाठी*,

 हा मंत्र ठेवू. सदैव ध्यानी 

 चला तयारी करू उन्नतीची

 एकत्र मिळून सुजाण नागरिकांनी 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

26/1/25


काव्य निनाद साहित्य मंच पुणे 

आयोजित उपक्रम 

दि 3/4/25

विषय ...सावध ऐका पुढल्या हाका

  शीर्षक...सुजाण नागरिक 


आपण नागरिक भारतभूचे

मनी असावा देशाभिमान 

तशीच हवीच देशभक्ती 

देश शोभण्या *विश्वात महान*


पाळू  नियमाची चौकट

राखू स्वच्छ सुंदर भारत

 होऊन सुजाण नागरिक 

देश प्रगती साठी  करू मेहनत


आहोत सारे कर्तव्यदक्ष 

ऐकू  येता मदतीच्या हाका

जाऊ धावून देश रक्षणा

येता कधी प्रसंग बाका.



लावूया झाडे ,वाढवू वनश्री 

जतन करूया पर्यावरण 

 बनवु सुंदर स्वच्छ भारत

कच-याचे करु नीट नियंत्रण.


गिरवू  पाठ शिस्तीचे. 

करूया संस्कृतीचे  जतन हे

भाव मनी विश्व बंधुत्वाचा

समानतेचे  राखू. मनी धोरण


  फिरवून नजर इतिहासात

 नव्या पीढीला करा जागृत

  समजवा यातना पारतंत्र्याच्या

 उमजता तेही होतील,   स्वीकृत




 सरकार, *आपणच,आपलेच,आपल्यासाठी*,

 हा मंत्र ठेवू. सदैव ध्यानी 

 चला तयारी करू उन्नतीची

 एकत्र मिळून सुजाण नागरिकांनी 




वैशाली वर्तक 

अहमदाबाद


शनिवार, २५ जानेवारी, २०२५

प्रवेश

काही प्रवेश होतात सहजची
न घेता कष्ट वा कसली ही अनुमती 
 सारेची जगचीजन प्रविशते झालो\ होतो
दर नव वर्षी  पुढती पुढती

काळ सरतो पुढे पुढे 
बालपण सरले मस्ती मजेत 
प्रवशिलो गृहस्थाश्रमी 
 रमलो गमलो कुटुंब समवेत 

 तांदूळ माप ओलांडून  
नववधू करी प्रवेश सासरी 
आनंदाला येई उधाण 
मनी असती सुखाच्या घागरी 


प्रवेशाची होती जय्यत तयारी 
 राम वनवासातून परतता
अयोध्या सजली गुडी तोरणांनी
उत्सुकता तीच राम मंदिर बांधता.

मोरपीस


मन माझे आनंदले
किती पहा आकर्षक 
पीस सुंदर मोराचे
भासे  चित्तास वेधक

सप्त रंगातील रंग 
 हिरवाई, नील ,पीत
भरलीत विधात्याने. 
सुंदर करण्यास नीत

मेघ जमता अंबरी
फुलविता पिसारा भार
पडलेले जल पिसावर 
चमकत दिसे शानदार 

मोरपीस स्पर्श अलवार 
सुखवितो तन मनाला 
विधात्याने सौंदर्य सारे
अर्पिले जणू मयूराला

 पाहताच मयूर पीस
 आठवे कृष्णाची मूर्ती 
शोभिवंत दिसे शिरी
मनी मिळे सदा स्फूर्ती

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

अष्टाक्षरी...पांघरुण

नीजेसाठी गरजेचे 
प्रत्येकाला अंथरूण 
त्याच बरोबर हवे
पांघरण्या  पांघरुण 

आई बाबांचे मायेचे.             तातमाये पांधरीले. आपणासी मायरुपी.  पांघरूण  .
ममतेचे उबदार 
सदा साठी पांघरले
किती भासे शानदार 

देवे दिधले आपणा
नभ रुपी पांघरूण 
सारे राहू तयाखाली 
समतेचे भाव जाणून 

पांघरूण यामिनीचे 
दूर होतेची  क्षणात 
येता रवी राजे नभी
होते मंगल पहाट 

संस्काराची हीच शिकवण
उपयोगी असे जीवनात
पाहता अंथरूण पांघरूण 
खर्च करावा आटोक्यात.

वैशाली वर्तक 


नाव घेता झोपण्याचे
काय घेऊ अंथराया
शांततेने नीजयेण्या
 पाहिजे ना पांघराया 

देवराये आपणाला
राखण्याला भाव समता
एकलेची व्योम दिधले.
जोपसाया  ती एकता (ठेवण्याला)

पांघरूण यामिनीचे
आदित्याने दूर केले
फाटलेल्या रश्मिकांनी
गगन सारे ऊजळीले



गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

ललित लेख सुंदर मी होणार

सुंदर मी होणार 

22/1/25
आजीच्या हातात राईंटींग पॅड पेन घेऊन विचार करत बसलेली पाहून नातीने विचारले
काय ग आजी तुमच्या विविधतेत तुम्हाला पण होम वर्क देतात काय 
आणि एवढं काय लिहीत आहे .
बघू बघू
आणि तिने मोठ्याने  हेडींग वाचले ..सुंदर मी होणार .
व लगेच नातं वदली अगं आजी तू सुंदर आहेस च की अजून किती सुंदर होणार 
म्हणत पळून गेली.  कारण तिला आजी जीव की  प्राण.  प्रेमळमाया ममतेने भरलेली तिची ती सुंदरतेची मूर्ती.
      कसं असतं ना बाह्य सुंदरतेला जग पहात असते. 
पण खरं तर  मनाच्या आरशात दडलेली सुंदरता पहावी
 गोड मृदू भाषी बोलणे.  प्रेमळ ममता माया ने भरलेले मन, परोपकारी स्वभाव.. हुशार असूनही विनयता, अहंकाराचा लवलेशही नाही, पैशाचा, विद्येचा गर्व नसणे.  मनाची उदारता ,आवड सत्कर्माची ही सर्व आंतरिक सुंदरतेची उदाहरणे होत.. ह्याच सौंदर्यतेत माणसाची खरी सुंदरता दडलेली आहे. आपण  सा-यांना  बाह्य सुंदरतेची भुरळ पडते.
   साधी सर्व सामान्य दिसणारी , पण सतत सर्वांना धावत जाऊन मदतीला येणारी, भले दिसण्यात रूपवती नाही  पण ,तिच्या कर्माने आकर्षक  व्यक्तिमत्वाची व्यक्ती बनते. आणि त्यातच तिच्या मनमिळाऊ स्वभावाने  परोपकारी वृत्तीच्या स्वभावाने ती बाह्य सुंदरतेला मात करते. बाबा आमटे कुटुंब  सुंदरतेत आहेतच पण  कुष्ठरोग्यांना पण ‌ करून कर्म सौंदर्याने ते देश भरात उजळले. तर कर्मात सौंदर्य आहे. ते सौंदर्य आपापल्या नजरेत आले पाहिजे.  तर असे सौंदर्य प्रत्येक मानवात दडलेले आहे. कोणी  कलाकृती, वाद्य ,
बागायती ,निसर्ग चित्रण वगैरेमधे आपली सुंदरता दाखवित असतो. तर त्या गुणांनी उजळून सौंदर्य  वाढवितो.प्रत्येक जण सुंदर असतो. 
        कित्येक नट नायक त्यांच्या अभिनयाने उजळून सुंदरतेला मात करून उत्तम नटसम्राट होतात.
निसर्ग आपली सुंदरता क्षणाला दाखवितो.व तो पाहून आपण आनंद घेतो. साधे पिवळे पिकलेले पान पण कसे मस्त गिरकी घेत भुमीवर येते. पण त्याच्या पडण्यातील सुंदरता सर्वांनाच जाणविले असे नाही. कारण
त्या कृतीकडे पहाण्याची ती दृष्टी पाहिजे तर त्यात सौंदर्य जाणविते. तर सर्वत्र सुंदरता भरलेली आहे.
त्यात आपण पण कर्माने आपण आपल्याला सुंदर बनवू शकतो. आपण सुंदर बनतो.
          आता पहा विविधोत्सवात वा वर्धापनदिन साजरा करतांना,  आपापले सुंदर कलागुण प्रदर्शित करून 
 सारे कलाकार सुंदर झालेच ना . आणि सारेच  जण सुंदर भासले ,दिसले  , सुंदर झाले ना !
तसेच आपणही  आपापले सौंदर्य दाखवून. ... सुंदर होतच असतो .आणि.   सुंदर होणार च असतो.
नमस्कार 

      

सोमवार, २० जानेवारी, २०२५

अष्टाक्षरी ..आनंदाची उधळण. ऋतुराज आला

प्रज्ञा महिला मंच
विषय - आनंदाची उधळण

     ऋतुराज आला

पाने टाकूनी पिवळी
संपे आता पानगळ
नव पर्णे अंगोपांगी
दूर झाली मरगळ


ऋतू वसंत येताच
फुटे कोवळी पालवी
वृक्ष लता बहरली
मनी आनंद फुलवी

थंड वा-याची झुळूक
शहारते अंगावर
तृण पाने डवरली
फुले डुले , रोपावर

येता रवीराज नभी
उधळण चैतन्याची
परिमल मोग-याचा
आसमंत सुगंधाची

  फुले रंगीत फुलली
सृष्टी  सजली धजली
 रुप  पहाता धरेचे
जनमने आनंदली


उधळण आनंदाची
असे काळ सृजनाचा
  रूप पहा अवनीचे
दिन भासे आनंदाचा

वैशाली वर्तक 

अहमदाबाद

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...