शनिवार, २५ जानेवारी, २०२५

मोरपीस


मन माझे आनंदले
किती पहा आकर्षक 
पीस सुंदर मोराचे
भासे  चित्तास वेधक

सप्त रंगातील रंग 
 हिरवाई, नील ,पीत
भरलीत विधात्याने. 
सुंदर करण्यास नीत

मेघ जमता अंबरी
फुलविता पिसारा भार
पडलेले जल पिसावर 
चमकत दिसे शानदार 

मोरपीस स्पर्श अलवार 
सुखवितो तन मनाला 
विधात्याने सौंदर्य सारे
अर्पिले जणू मयूराला

 पाहताच मयूर पीस
 आठवे कृष्णाची मूर्ती 
शोभिवंत दिसे शिरी
मनी मिळे सदा स्फूर्ती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुजाण नागरिक

सारस्वतांची मांदियाळी (R) समूह आयोजित उपक्रम क्रमांक 11 विषय...सुजाण नागरिक            *विश्वात महान* आपण नागरिक भारतभूचे मनी असावा देशाभिमा...