शनिवार, १ जुलै, २०२३

चौपदी काव्य रचना

 स्वप्नगंध स्पर्धा  समूह

स्पर्धा क्र.३२
चौपदी काव्यलेखन
विषय.. विठ्ठल
शीर्षक,...  वारी विठ्ठलाची


चला चला विठू दर्शनाला 
मेळा वैष्णवांचा आला दर्शनाला 
एकमुखाने करती विठ्ठल गजर
आतुरले भक्तगण दर्शनाला

 वारीत जाण्याची  मनातून आस
 माऊलींच्या चरण स्पर्शाची आस
 विठ्ठल नाम राही सदैव अधरी
 पाऊलांना लागली पंढरीची आस

ध्यानी मनी स्वप्नी विठ्ठलाचे रूप 
अंतरात भरले माऊलींचे रुप
कधी न चुकली वारीतली सकाळ 
जळी स्थळी पाही श्रीहरीचे रुप

रमतो भजनी वैष्णवांचा  मेळा  
रिंगण  घालती   वारकरी मेळा
खेळ फुगडीचा, धरुनीया फेर
टाळ चिपळ्यात रंगला मेळा

विठ्ठल पाहता दुःखाचा विसर          
मी तू पणाचा, होतअसे विसरत
विठ्ठल नामात, सारेची दंग .           
 राग द्वेषाचा पडला विसर 


वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, २१ जून, २०२३

हारजीत

 काव्य निनाद साहित्य मंच पुणे

आयोजित उपक्रम क्रमांक 319

विषय...हारजीत

   


चाले जीवनात खेळ

कधी जय तर पराजयाचा

जसा श्रावण मासी चाले

ऊन तर  मधेच पावसाचा


पर म्हणजे दुजांचा

होतो जेव्हा विजय

हसत मुखे स्विकारा

अपयशात शब्द वसे यश


ठेवा घ्यावी अपयश हीच

असे पायरी यशाची

 स्विकारावी हार पण

करीता वाटचाल जीवनाची


निसर्गात पण दिसे हारजीत

येता ओहटी सागरास

होतो तो कधी  न उदास

वाट पाही भरतीची  खास 


 होता न अपयशी  खच्ची

हवी अभिलाषा विकासाची 

 पहा साधा कीटक कोळी

 राखतो मनी आशा यशाची


वैशाली वर्तक

अहमदाबाद

देहबोली


देहबोली 

अव्यक्त भाषा

सहजची उमजती
उठता भावना मनी
 एक शब्द न वदता
देहबोली बोले क्षणी. 

तीची असेची किमया
अव्यक्त भाव सहज
शब्दाविणा कळताती
 नसे वदणे गरज

अभिनय कलेतही
तिला प्राधान्य मिळते
रंगमंचावर कलाकार
 नाटय कला रंगवते

देहबोलीतून पहा
कळे. व्यक्तीचा स्वभाव
सहज घडे दर्शन
गुण दोष होती ठाव


देहबोली 

सहजची उमजती
उठता भावना मनी
 एक शब्द न वदता
देहबोली बोले क्षणी. 

तीची असेची किमया
अव्यक्त भाव सहज
शब्दाविणा कळताती
 नसे वदणे गरज

अभिनय कलेतही
तिला प्राधान्य मिळते
रंगमंचावर कलाकार
 नाटय कला रंगवते

देहबोलीतून पहा
कळे व्यक्तीचा स्वभाव
सहज घडे दर्शन
गुण दोष होती ठाव

 भाव असता उत्कट
नसे गरज बोलणे
माझे प्रेम तुझ्यावरी
शब्दा शिवाय कळणे


आहे माध्यमे प्रेमाची
स्पर्श , संकेत , कटाक्ष
भाव दावी अंतरीचे
प्रेम भाषेत चाणाक्ष

रविवार, १८ जून, २०२३

पश्चात्ताप

कल्याण डोंबिवली महानगर 2
उपक्रम 
विषय - पश्चाताप


व्हायचे ते तर होणार 
चिंता का करावी मनी
जायचे ते नक्की जाणार
 मग पश्चात्ताप  नको त्याक्षणी

नाही मिळाले  जर यश 
कमी पडले तेव्हा बळ
रडून काय उपयोग 
नशीबी नव्हते फळ

 निष्काळजीने होते चूक
लक्ष देता होत नाही भूल
हवी दक्षता कामात
मग मिळे यशाचे फूल


होते अलवार हलके
पश्चाताप होता मन
पुढच्या कामासाठी
तयार होतात क्षण

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, १३ जून, २०२३

चित्र काव्य......

सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
चित्र काव्य लेखन
   *लगबग परतणीची*

नभ दाटले कृष्ण मेघांनी  
तयांना बरसण्याची घाई
गडगडता  ते डोंगर माथ्याशी
घरी जाण्यास अधीर बाई

दोर गाईचा एक हाती
दुजा हाती वासरांचा
घेऊन चाले भरभर
खटाटोप घरी पोहचण्याचा.

गेली होती गुरे चरायला
अचानक दाटले नभी मेघ
वारा सुटलाय जोरात
चमके नभी दामिनीची रेघ

मुखाने वदे वासराला
अनवाणी चालता भरभर
बिगी बिगी पाय उचला
येईल  पावसाची सर.
 
आता थंड खट्याळ वारा
झोंबता अंगाला उठे शहारा
पहा आता बरसणार धारा
काळोखी  आसमंत सारा

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, १२ जून, २०२३

चित्र काव्य.......काव्य प्रणाली रचना असामान्य दर्पण. | मनाचा आरसा



स्वप्नगंध स्पर्धा समूह
चित्रा धारित रचना
स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित
काव्य प्रणाली चित्र काव्यलेखन स्पर्धा
10/8/8/10
काव्य प्रणाली  रचना
 १०\८\८\१० ओळी शब्द 
शीर्षक...  *असामान्य दर्पण*


रूप निरखण्या उभी बाळी. 
बाळीला भासे आगळे 
आगळेची प्रतिबिंब 
प्रतिबिंबाचे रुप वेगळे

वेगळे  पाहुनीया   स्वरूप    
स्वरुपाने भयभीत 
भयभीतीने निरखे 
निरखून झालीय चकित 

चकित होऊनिया पाहता
पाहताच   वाटतसे 
वाटे स्वरूप वृद्धेचे
 वृध्द काळी दिसेल असे

असेची काही  विचार मनी
मनातून   उद्भवले
उद्भवलेले विचार 
विचारांचे मंथन  संपले

संपले जरी वाटे मनाला
मनाला शांतता नाही 
नसे दर्पण सामान्य
असामान्यता शोधीत राही. 

वैशाली वर्तक
अहमदाबाद



मनाचा आरसा

काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक ४४३
विषय ..मनाचा आरसा


दिसे क्षणात स्व रूप 
पाहताच दर्पणात
जसे आहे तसे दिसे
नसे बदल रुपात 

सत्य वचनी आरसा 
दावी  बाह्यच रूपाला
पण डोकवा अंतरी 
जाणा त्या अंर्तमनाला

बोट  इतरा दाविता
प्रश्न विचारा मनात 
सांगे बाकीची ती बोटे 
 मिळे उत्तर क्षणात 

हेच प्रात्यक्षिक असे 
साधे होते परिक्षण
 खेळ उमजे  मनाचे 
स्वच्छ दिसे अंतर्मऩ

निराकार तो आरसा
पहा कसा तो मनाचा
सदा दावी गुणदोष
आपुल्याच अंतरंगाचा 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, ९ जून, २०२३

सुनीत काव्य बेरोजगार

माझी लेखणी साहित्यमंच शहापूर जि ठाणे 
आयोजित तृतीय वर्धापन दिनानिमित्त महास्पर्धा
काव्य प्रकार ..सुनित काव्य
विषय... बेरोजगारी

     *कशाला चाकरी*
 
रंगवली होती साहेबी स्वप्ने मनात
मनाजोगती नक्की मिळेल नोकरी 
झालो आहोत ना उत्तम पदवीधर ?
आता कसलाच नाही खेद अंतरी .  1      

केले अर्ज अनेक जागी कचेरीत
असूनही कुशाग्र बुध्दी हुशार
  कसे सरसावले वशीलेवाले पुढे?
सर्वत्र दिसला माजलेला भ्रष्टाचार..2

काय करावे काही कळेना
शिकून सावरुन पण मी बेकार
 काय कामाची हातातली प्रमाणपत्रे?
हासत म्हणाली तू शिक्षीत *बेरोजगार.  ३

 न होता विचलित,धावत आलो शिवारी
माझीमाय काळी माती,कशाला करु  चाकरी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...