सोमवार, १२ जून, २०२३

चित्र काव्य.......काव्य प्रणाली रचना असामान्य दर्पण. | मनाचा आरसा



स्वप्नगंध स्पर्धा समूह
चित्रा धारित रचना
स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित
काव्य प्रणाली चित्र काव्यलेखन स्पर्धा
10/8/8/10
काव्य प्रणाली  रचना
 १०\८\८\१० ओळी शब्द 
शीर्षक...  *असामान्य दर्पण*


रूप निरखण्या उभी बाळी. 
बाळीला भासे आगळे 
आगळेची प्रतिबिंब 
प्रतिबिंबाचे रुप वेगळे

वेगळे  पाहुनीया   स्वरूप    
स्वरुपाने भयभीत 
भयभीतीने निरखे 
निरखून झालीय चकित 

चकित होऊनिया पाहता
पाहताच   वाटतसे 
वाटे स्वरूप वृद्धेचे
 वृध्द काळी दिसेल असे

असेची काही  विचार मनी
मनातून   उद्भवले
उद्भवलेले विचार 
विचारांचे मंथन  संपले

संपले जरी वाटे मनाला
मनाला शांतता नाही 
नसे दर्पण सामान्य
असामान्यता शोधीत राही. 

वैशाली वर्तक
अहमदाबाद



मनाचा आरसा

काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक ४४३
विषय ..मनाचा आरसा


दिसे क्षणात स्व रूप 
पाहताच दर्पणात
जसे आहे तसे दिसे
नसे बदल रुपात 

सत्य वचनी आरसा 
दावी  बाह्यच रूपाला
पण डोकवा अंतरी 
जाणा त्या अंर्तमनाला

बोट  इतरा दाविता
प्रश्न विचारा मनात 
सांगे बाकीची ती बोटे 
 मिळे उत्तर क्षणात 

हेच प्रात्यक्षिक असे 
साधे होते परिक्षण
 खेळ उमजे  मनाचे 
स्वच्छ दिसे अंतर्मऩ

निराकार तो आरसा
पहा कसा तो मनाचा
सदा दावी गुणदोष
आपुल्याच अंतरंगाचा 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...