गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

चित्र काव्य ओढलागली जीवाला


 सिद्ध  साहित्यिक  समूह 

आयोजित 

उपक्रम  क्रमांक ४७१

अष्टाक्षरी काव्य रचना

 ओढ लागली जीवाला

     *राधा बावरी*


जळी स्थळी पाही  तुज

कृष्णा  तुला एकमात्र

दुजा कोणी न मजला

दिसे श्यामच सर्वत्र 


ध्यानी मनी तू सावळा

मनी देवकी नंदन

हरी नाम सदा मुखी

जरी करिता मंथन


अविरत करी  तुझे

सदा मनात चिंतन

कृष्ण कृष्णची शब्द ते

माझे  बोलती कंकण


बाधा  झाली  राधिकेला

झाले मी आता बावरी

 ओढ लागली भेटीची

 ऐक रे कृष्ण  मुरारी


नाद मुरलीचा ऐकता   

राधा हरपते भान        

गोप गोपिका सवे

हरी कडे तिचे ध्यान


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

तृष्णा तहान


अ भा म सा प मध्य मुंबई  समूह क्र २
उपक्रमासाठी
- तृष्णा
    
   
आहे स्मरणी कहाणी
तहानलेल्या कावळ्याची
किती परिश्रमाने तयाने
भागविली तृष्णा पाण्याची

तृष्णा लागते जीवाला
नानाविधी  आशा अपेक्षांची
घेतो मानव परिश्रम जीवनी
साध्य करण्या त्या तृष्णांची

 मीरेला तृष्णा गिरीधराची
राहीली सदैव भक्तीत लीन
रचूनी कवने गोपालाची
भजनात व्यस्त  रांत्रदिन

तृष्णा  आंतरिक भावना  
करते जीवाला अस्वस्थ 
वेड लावते तन मनाला
बसू देत नाही ती स्वस्थ 

मिळता स्वातंत्र्य  देशाला
शमली तृष्णा देश भक्तांची
करूनी बलिदान जीवांचे
दावीली पहाट स्वातंत्र्याची 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

म्हणीवर.. शहाण्यास शब्दांचा मार

कल्याण डोंबिवली महानगर
आयोजित 
विषय - शहाण्याला शब्दाचा मार


काय वाईट काय चांगले
मानव करतो विचार 
मेंदू दिधलाय ना देवाने
चिंतनास उपयोगी फार

नसे तसे पशुं प्राण्यांचे
नाही बोली समजत
दाखविता  तयांना काठी
 बुध्दी   नसतेच  उमजत

 
शहाण्यास शब्दांचा मार
शब्द उमजतो   सहज
मुर्खास कोण सांगणार
असते काठीची गरज

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

पथ मज नेई कुठे...| मार्ग

भा सा व सां मंचठाणे 
आयोजित 
उपक्रम 
विषय - पथ मज नेई कुठे
 


 मिळता  माय बापांच्या कृपेची 
 मग कसलीच न  मज भिती
ठेव घेऊनी अमुल्य  संस्काराची
जीवन मार्गी  कसली क्षिती

सहनशिलतेच्या अंगी वृत्तीने
वाटेवर असता काटे जरी 
 मनी संतोषाने भासली फुलासम
 मार्ग असो  खडतर तरी

पथ मज नेई  सन्मार्गी
न पडे  षडरिपुची भुरळ 
येता मार्गी मोह लोभ सुसरी
 सद्विचारांची जाणीव केवळ


मज पथ नेई कुठे
शंका कुशंकांचे नसे मळभ
दृढ विश्वास असे मनी
पथ चालणे झाले सुलभ


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



कल्याण डोंबिवली महानगर
आयोजित 
काव्य लेखन
विषय - मार्ग 

        जीवन मार्ग 
मिळता  माय बापांच्या कृपेची 
 मग कसलीच न  मज भिती
ठेव घेऊनी अमुल्य  संस्काराची
जीवन मार्गी  कसली क्षिती

सहनशिलतेच्या अंगी वृत्तीने
वाटेवर असता काटे जरी 
 मनी संतोषाने भासे फुलासम
 मार्ग असो  खडतर तरी

मार्ग  मज नेई  सन्मार्गी
न पडे  षडरिपुची भुरळ 
येता मार्गी मोह लोभ सुसरी
 सद्विचारांची जाणीव केवळ


माझा जीवन मार्ग नेई कुठे
शंका कुशंकांचे नसे मळभ
दृढ विश्वास असे मनी
पथ चालणे झाले सुलभ


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

पाश मोहाचे सुटेना

लालित्य नक्षत्रवेल
आयोजित 
उपक्रम अष्टाक्षरी

विषय -  पाश मोहाचे सुटेना


मन असते चंचल
काम आहेची कठीण
क्षणा क्षणाला धावते
मनी विचार  नवीन

षडरिपू सहा पहा
ठेव संस्काराची मनी
तरी  ग्रासती मनास 
भूल पाडी शिकवणी

मन कसे आवरावे
मना कधी उमजेना
मन चंचल पाखरु
पाश  मोहाचे सुटेना

माझे माझे सुटेचना
भव ताप जरी फार
जीव अडके मोहात
होता  यातना अपार

पाश मोहाचे सोडण्या
हवी अध्यात्माची जोड
संत वाणी ऐकू  सदा
करी जीवन ते गोड

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

उंबरठा


काव्यलेखन

विषय ... "उंबरठा"


ओलांडूनी जया प्रवेशते घरा 

आहे मान तव उंबरठ्याला

कुंपण आहे तेची कुटुंबाचे

मान मर्यादा असती तयाला !


नित्य कौटुंबिक घडामोडी

सदैव चालीरीती घरादाराला 

आणू नयेत चव्हाट्यावरी 

चूकभूल द्यावी उंबरठ्याला !


वधू माप ओलांडून जाते

पतीच्या घराचा उंबरठा 

उजळण्या दोन कुळे

चालविते संस्कृतीच्या वाटा !


 संस्काराचे जपते बंधन

 राखून थोरांचा सन्मान 

 ध्यानी उंबरठाची मर्यादा 

वाढविते कुटुंबाची शान !


मर्यादा आपापल्या घराची

पाळावी लागते प्रत्येकाला 

तरच कुटुंब आदर्श ठरते

वेळोवेळी मान उंबरठ्याला !


आपले संस्कार व संस्कृती

कर्माचरणाने टिकवून ठेवा 

समतेचे महान राष्ट्र म्हणवून 

जगाला वाटू द्यावा हेवा





आ भा म भा प ठाणे जिल्हा 2

आयोजित उपक्रम क्रमांक 592

विषय - उंबरठा


ओलांडूनी. प्रवेशितो घरा

 मान असे त्या उंबरठ्याला

कुटुंबाचे असते  ते कुंपण

देई मान -मर्यादा  वागण्याला



कुटुंबाच्या नित्य घडामोडी

चालती सदैव घराघरातूनी

न आणाव्या चव्हाट्यावरी

उंबरठ्याची मर्यादा असे मनातूनी


वधू ओलांडून प्रवशिते

उंबरठा पतीच्या घरचा 

उजळण्या दोन कुळे

चालविण्या वारसा संस्कृतीचा.


 जपते संस्काराचे  बंधन

 राखून सन्मान थोरांचा

 ध्यानी  उंबरठाची मर्यादा 

मान वाढविते कुटुंबाचा


कुंपण मर्यादा  घराची

पाळावी  लागते प्रत्येकाला 

तरच कुटुंब  ठरते आदर्श

मान  देत उंबरठ्याला


आपले संस्कार व संस्कृती

करिताती वेळोवळी जाण

म्हणूनच टिकेल राष्ट्र- धर्म 

मनाच्या उंबरठ्याला द्यावा मान


वैशाली वर्तक

अहमदाबाद


मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

आदर्श

सर्वधर्म  समभाव साहित्य मंच
आयोजित 
उपक्रम 
काव्य लेखन 
विषय - आदर्श 


जीवनात दिले संस्कार 
सांगून गोष्टीच्या  चार
करण्या वर्तन जीवनात
थोर व्यक्तीचे ऐका विचार 

बोल मातेचे असती सदा
बनविण्या जीवन आदर्श 
अनुसरता विचार  तियेचे
जीवनात होतो उत्कर्ष

निसर्गाचा पहा आदर्श  
सूर्य चंद्र तारे येती नेमाने  
प्रकाशतात म्हणूनच
ऋतुचक्र घडती क्रमाने

 स्वातंत्र्य वीरांच्या आदर्शाने
भारतभूला शोभवू विश्वात 
आत्मनिर्भयाने करु प्रगती 
हाच रुजवू विचार  मनात

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...