लालित्य नक्षत्रवेल
आयोजित
उपक्रम अष्टाक्षरी
विषय - पाश मोहाचे सुटेना
मन असते चंचल
काम आहेची कठीण
क्षणा क्षणाला धावते
मनी विचार नवीन
षडरिपू सहा पहा
ठेव संस्काराची मनी
तरी ग्रासती मनास
भूल पाडी शिकवणी
मन कसे आवरावे
मना कधी उमजेना
मन चंचल पाखरु
पाश मोहाचे सुटेना
माझे माझे सुटेचना
भव ताप जरी फार
जीव अडके मोहात
होता यातना अपार
पाश मोहाचे सोडण्या
हवी अध्यात्माची जोड
संत वाणी ऐकू सदा
करी जीवन ते गोड
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा