शनिवार, २५ एप्रिल, २०२०

अष्टाक्षरी..हा समुद्र किनारा. /मुक्तछंद किनारा सप्ताक्षरी

उपक्रम
निसर्ग कविता

विषय - किनारा
      
      *सागरी किनारा*
 वाटे सदा ओळखीचा
जणु साथी जीवनाचा
जाता क्षणैक जवळी
मिळे आनंद मनाचा

किती भव्य रुप तुझे
वाटे पहात बसावे
  मनी  उठती तरंग
मन हलके करावे.

पहा आली भेटण्यास
लाट किती उफाळून
 भेटताच किनाऱ्याला
 विरतेच ती लाजून

  वाटे पहात रहावे
तुझा चालणारा खेळ
मन  होई प्रफुल्लित
 मजेतच जाई वेळ

धन्यता वाटे विधात्याची
धरा  पहा रमणीय
कुठे नदी, दरी,गिरी
किनाराही शोभनीय

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



माझी  लेखणी

विषय -

*मी लाट सागराची*


   *लाट बोले*


लाट पहा सागराची

आली कशी उफाळून

आस मनी किना-याची

विरली मी किनारा पाहून


 *मी लाट सागराची*

 शंखमोती घेते सोबत 

देते पसरून तटाला

हेच काम चाले अविरत


किना-यास भेटण्यास 

मन माझे सदैव आतुर

पण भेटताचा किनारा

लाजून होते मी चूरचूर


लागतो जन मनास 

मला पाहण्याचा छंद

कितीदा पाहूनीही मज

पाहण्यात होती धुंद


जशी येते उफाळून मी

देते मनास उभारी

उठा झटकून मरगळ

घ्यावी जीवनी भरारी


मी  लाट सागराची

नित्य  चाले माझा खेळ

 किनारा सागरी आवडीचा

न उमजे किती गेला वेळ

वैशाली वर्तक

अहमदाबाद


DBA साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र जिल्हा गडचिरोली

आयोजित

उपक्रम 67

विषय ...तो सागरी किनारा ( मुक्तछंद)


          *सागरी किनारा* 


बसले होते सागर किनारी

पहात खेळ लाटांचा

पाठोपाठ येती उसळूनी

किती अधीर होत्या

भेटण्या किन-यास.

जशी येते लाट उफाळून

देते मनाला उभारी 

जणू सांगे उठा 

झटकून मरगळ सारी

घेण्याजीवनात भरारी.


येते लाट अधीरतेने भेटण्या

तिच्या आवडीच्या किना-यास.

पण पहा कशी लाजूनी

झाली  लाट चूर चूर

पाहताच ती किना-यास


किनारा हा आवडीचा

वाटे जणू साथी

सर्वांना जीवनाचा 

किती वेळ बसता

आनंद देतो मनाला.

प्रेमी युगुल रमती

याच्या समवेत किती काळ

स्वप्ने किती रंगवती

बसून त्या समीप.

लहान मोठे सारेची

येती सागर किनारी

होऊन उल्हासित मने

परतताती स्वगृही.

वैशाली वर्तक

अहमदाबाद

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सातारा 

आयोजित उपक्रम

विषय... किनारा 


किनारा असे आवडीचा

मनास मिळतो विरंगुळा भारी

असो तो नदी वा सागराचा

वेळ जातो सहजची किनारी


पाहूनी सागर किनारा

मत्स बांधवांना मिळे उभारी

सोडुनीया नौका जलात

सागर जली घेतसे भरारी


नदीच्या किनारी सुंदर देऊळ

प्रभात समयीची ऐकून भुपाळी

सकाळ सांजवेळी येती जन

वाटे ऐकत बसावे सकाळी सकाळी 


जाता काळ पुढे पुढे

येता समय जीवन सांजेचा

जीवन नौका किनारी लावण्या

जन आक्रमती मार्ग भक्तीचा


वैशाली वर्तक

अहमदाबाद


चित्र काव्य सिंगापूर शब्द गंध 

किनारा

      

      *सागरी किनारा*


काळेकुट्ट काळेभोर 

नभ मेघांनी दाटले

गाज ऐकत समुद्राची 

जन किनारी रमले


 वाटे सदा ओळखीचा

जणु साथी जीवनाचा

जाता क्षणैक जवळी

मिळे आनंद मनाचा


रूप भव्य  सागराचे

वाटे पहात बसावे

  मनी  उठती तरंग

मन हलके करावे.


बसा रेतीत वाळूत  

स्वप्न रंगवू उद्याची

खरी मजा लुटण्यास

नको  आसने खूर्च्यांची 


पहा आली भेटण्यास

लाट किती उफाळून

 भेटताच किनाऱ्याला

 विरतेच ती लाजून


 वाटे पहात रहावे

तुझा चालणारा खेळ

मन  होई प्रफुल्लित

 मजेतच जाई वेळ


धन्यता वाटे विधात्याची

धरा  पहा रमणीय

कुठे नदी, दरी,गिरी

किनाराही शोभनीय


वैशाली वर्तक




@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

विश्व लेखकांचे 

आयोजित उपक्रम 

काव्य लेखन 

प्रकार सप्ताक्षरी

विषय ...किनारा 

-----------------

शीर्षक. मना विरंगुळा 


असो   सिंधू वा नदी

वेळ जातो  किनारी

किनारा  आवडीचा

देई  आनंद भारी



 येता  सिंधू किनारी

 मना मिळे उभारी

घेऊ नौका जलात

घेऊ जली भरारी 



नदी काठी  देऊळ

प्रातः ऐकू भुपाळी

कानी येताची स्वर

 ऐकावी  सदाकाळी 



   जसा काळ येताची

 जीवनाच्या संध्येचा  

नौका लावण्या काठी  

मार्ग दिसे भक्तीचा


खूप  मिळे शिकण्या 

 बसा किना-यावर

 कळे जीवन सार

हे जाणा जन्मभर 



वैशाली वर्तक

अहमदाबाद




मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

वैशाख वणवा


उपक्रम
आठोळी
विषय - * *वैशाख वणवा**

पेटला वैशाख वणवा
लाही लाही जीवाला
नको वाटे तप्त झळा
नसे गारवा तन मनाला

तप्त झळा उन्हाच्या
जीव होई घाबरा
जणू चमती काजवे
 जाणे बाहेर आवरा

वैशाली वर्तक.


सोमवार, २० एप्रिल, २०२०

गीत ..जाग जागली ही प्रभा

प्रेमाची अक्षरे समूह
भावगीत स्पर्धे साठी
विषय - जाग जागली ही प्रभा

      दूर जाहला तम निशेचा जाग जागली ही प्रभा,
      उठा हो सकळ जना, मंदीरी भक्तांची भरे सभा. ....धृवपद

   उमलल्या कळ्या आशारुपी वेलीवर सकाळी
   किलबिल खगांची भासते जणु गोड भुपाळी
   वनोवनी विहरतील पहा विहंग आता नभा
   उठा हो सकळ जना, मंदिरी भक्तांची भरे सभा.....1

   करुनी सडा रांगोळी लावियले दीप वृंदावनी
   अर्ध्य दान करण्या उभे जन तयांच्या सदनी
   रवी आगमनाने दिसे न्यारीच सृष्टीची शोभा
   उठा हो सकळ जना मंदिरी भक्तांची भरे सभा

   स्वर्ण रंगात नभी येता ,मिळे जीवन जनांना
   उल्हासित मने जन म्हणती "प्रभात" त्या क्षणांना
   उषःकाल होता नभात पसरल्या सोनेरी आभा
   उठा हो सकळ जना, मंदिरी भक्तांची भरे सभा

वैशाली वर्तक
अहमदाबाद(गुजरात )

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

बाबासाहेब आंबेडकर (५) बहुजनांचा सारथी,महामानव, अष्टाक्षरी.भावगीत.तुझ्या जयंती


आष्टाक्षरी


१*भीमा तुझ्या जयंतीला*

   आले संकट देशात
   वंदू तुझ्या कर्तृत्वाला
   करु कायदा पालन
   भिमा तव जयंतीला

   लोक कल्याणा झटला
    मिळविला पुरस्कार
  केला दलित उध्दार
   संविधान शिल्पकार

     तेज चमके बुध्दी चे
     किती भाषा पारंगत
     तव कर्तृत्व अपार
     देशभर यशवंत

    समानता तू आणिली
   दलीतांचा तू कैवारी
   जात पात दूर केली
     तुझा मान घरोघरी

   आज वंदन करुनी
  दया भाव सर्वा वरी
    करु तुझीच आरती
  भिमराव सुविचारी

    वैशाली वर्तक
 २     बाबासाहेब आंबेडकर ....भावगीत

        करु तयांचा आठवणीने दिन यादगार                     
        बाबासाहेब होते महामानव शिल्पकार

         लोक कल्याणा दिन रात्र केले प्रयत्न
         मिळवला पुरस्कार तुम्ही भारतरत्न
        नाव तव जगी सतत गर्जत रहाणार
        बाबा साहेब होते महामानव शिल्पकार 1


       मानव ठरला हाची महामानव
        प्रवेशिते केले मंदिरी दलित बांधव
        दिधले तळ्याचे पाणी चवदार
        बाबासाहेब होते महामानव शिल्पकार 2


       जन करीती तुझीच प्रशंसा सदा
       विसर होणार नाही कर्तृत्व कदा
       मिळवून दिला समतेचा अधिकार
       बाबासाहेब होते महामानव शिल्पकार 3

३  बाबासाहेब अष्टाक्षरी

प्रज्ञा सूर्य मानवतेचा
आहे तुजला तो मान
 तव कर्तृत्वे मिळाला
तुझी जगतात शान

   लोक कल्याणा झटला
    मिळविला पुरस्कार
  केला दलित उध्दार
   संविधान शिल्पकार

     तेज चमके बुध्दी चे
     किती भाषा पारंगत
     तव कर्तृत्व अपार
     देशभर यशवंत

    समानता तू आणिली
   दलीतांचा तू कैवारी
   जात पात दूर केली
     तुझा मान घरोघरी

   आज वंदन करुनी
  दया भाव सर्वा वरी
    करु तुझीच आरती
  भिमराव सुविचारी


लोकशाही विचार धारा सा मंच
आयोजित स्पर्धा
क्रमांक 2

**स्पर्धेसाठी*
४ भीम शक्ती काव्य लेखन स्पर्धा

प्रेमाची अक्षरे समूह आयोजित
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा
काव्य प्रकार... अष्टाक्षरी

विषय .. भीमशक्ती
शीर्षक   महामानव


भीम शक्ती ,प्रज्ञा सूर्य 
आहे तुजला तो मान
 तव कर्तृत्वे मिळाला
तुझी जगतात शान

   लोक कल्याणा झटला
   मिळविला पुरस्कार
  केला दलित उध्दार
  संविधान शिल्पकार

   तेज चमके बुध्दी चे
   किती भाषा पारंगत
   तव कर्तृत्व अपार
   देशभर यशवंत

   समानता तू आणिली
   दलीतांचा तू कैवारी
  जात पात केली दूर
  तुझा मान जगीभारी

  *भीमशक्ती* वंदनीय 
  दया भाव सर्वा वरी
  करु तुझीच आरती
  भिमराव सुविचारी.

 वैशाली वर्तक 
अहमदाबाद





भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी जिल्हा कोल्हापूर 
आयोजित
स्पर्धा क्रमांक 11
दि 14/4/23
५   विषय...बहुजनांचा सारथी
काव्य प्रकार...दशाक्षरी
शीर्षक.   *तूची महामानव* 

 दिला समतेचा अधिकार
 गाऊ तव कर्तृत्वाची गाथा
जन करीती तुझी प्रशंसा
बहुजन नमवती माथा.        1

तूची  ठरला  महामानव.             
पाजूनिया  चवदार पाणी 
दिधला प्रवेश मंदिरात 
बहुजन गाती तव गाणी         2


सारे जन लेकरे देवाची 
नाते आपले विश्व- बांधव
नुरे भाव तो  दलित-जनी
बाबा तुम्ही हो महामानव.           3

अहोरात्र  केलेत बाबांनी 
लोक कल्याण्यासाठी प्रयत्न 
देशाने दिधला पुरस्कार 
मान  बाबांचा *भारतरत्न*          4

आज दिसते दलितांची
तुमच्या  कर्तृत्वाची प्रगती
संदेश दिला बहुजनांना
बनूनी *सारथी* या जगती          5

 दिन साजरा आठवणीने
करु  बाबांचे नित्यस्मरण
गाऊया गुणगान आरती
बहुजनांचे तुला नमन.            6

वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद
मो नं 8141427430
















भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच अहमदनगर 
आयोजित उपक्रम क्रमांक १५०
 विषय..चवदार तळे सत्याग्रह 
     *क्रांतिवीर बाबासाहेब*  

निसर्गाची असे देन
जाण समानतेची हवी ठाव
जल हे तत्व अनमोल
असे असता का भेदभाव 

तूची पुकारले बंड जलासाठी
गाजला जल सत्याग्रह महाडला
घेऊन लक्षात हक्क समतेचा
मुभा दिली स्पर्श करण्या सर्व जनतेला 

होती विषमता भरलेली समाजी 
चवदार झाले तळ्याच पाणी
तुझ्या क्रांतिकारी परिवर्तनाचे
 आज गुणगान गाती गाणी

आता  दिसते समानता
नाही उरले  स्पृश्य अस्पृश्य
समतेचा भाव नांदे
सर्वत्र दिसते ऐक्यतेचे दृश्य

वैशाली वर्तक
अहमदाबाद




भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नंदुरबार 
स्पर्धा क्रमांक 78
7/12/24
विषय.  करु वंदन महामानवाला 
 शीर्षक ..   तूची महामानव* 

दिला समतेचा अधिकार
 गाऊ तव कर्तृत्वाची गाथा
जन करीती तुझी प्रशंसा
बहुजन नमवती माथा.        1

तूची  ठरला  महामानव.             
पाजूनिया  चवदार पाणी 
दिधला प्रवेश मंदिरात 
बहुजन गाती तव गाणी         2


सारे जन लेकरे देवाची 
नाते आपले विश्व- बांधव
नुरे भाव तो  दलित-जनी
बाबा तुम्ही हो महामानव.           3

अहोरात्र  केलेत बाबांनी 
लोक कल्याण्यासाठी प्रयत्न 
देशाने दिधला पुरस्कार 
मान  बाबांचा *भारतरत्न*          4

आज दिसते दलितांची
तुमच्या  कर्तृत्वाची प्रगती
संदेश दिला बहुजनांना
बनूनी *सारथी* या जगती          5

 दिन साजरा आठवणीने
करु  बाबांचे नित्यस्मरण
गाऊया गुणगान आरती
बहुजनांचे तुला नमन.            6

वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद
मो नं 8141427430



शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

पापण्याच्या काठावर

सिध्द लेखिका समूह आयोजित उपक्रम
अष्टाक्षरी
        **पापण्याच्या काठावर**

       येता आठव प्रेमाची
       मन वेडे मागे पाहे
       उर येतेची भरुनी
       पाणी डोळ्यातून वाहे

       कसा सोसावा विरह
       कैसे कंठु रात दिन
       पापणीच्या काठावर
       नेत्र पाणावले क्षीण

        कधी कळणार तुला
        मनोभाव अंतरीचा
        पापणीच्या काठावर
        किती साठा भावनांचा

         कळताच मनाला त्या
         संपणार तो विरह
         आनंदाने पापण्यात्या
         वाहे अश्रूंचा समुह

      येता सुखाचे हे क्षण
      मन गेले आनंदून
      अश्रू दाटे पापणीत
       हसू येई ओठातून

   वैशाली वर्तक

   

दीप (बाल कथा)

         

                                            
                       परवाची गोष्ट. आपल्या पंत प्रधानजींनी सांगितल्या प्रमाणे दिवा लावण्यासाठी एक पणती तेल घालून वात घालून तयार केली .माझा ४ वर्षाचा नातू समोर आला व म्हणाला,
आजी , " दिवा का लावावायाचा ?
मी म्हटले ," बेटा , दिवा अंधारातून उजेडाकडे नेतो.
उजेड म्हणजेच सुख अंधार तिमीर म्हणजे दुःख . तसेच अंधार म्हणजे अज्ञान आणि उजेड म्हणजे ज्ञान.
तर अंधाराकडून उजेडाकडे , अज्ञानातून ज्ञानाकडे... दुःखापासून सुखाकडे .. नेणारी ही पणती ..दिवा .
तिची ज्योत म्हणजे ज्ञानाचे ..प्रकाशाचे ..आनंदाचे उजेडाचे प्रतीक आहे. तर सध्या जी सर्व जगावर आलेली व्याधी
  महामारी  आली आहे ना. . व बंदिस्त राहून मन उबले आहे. तर हा दिवा आपल्यास आशेचा किरण देतो. ही रोगराई महामारी दूर होणार ....पुन्हा सारे जग आनंदित होणार
दुःख दूर सरणार याची ग्वाही देण्यासाठी , सकारात्मक भाव जागृत होण्यास मदत रुप ठरतो.
                   "सारे सुखीना सन्तु सारे सन्तु निरामया
                   सारे भद्राणी पशन्तु मा कस्मिन दुःख आप्नुयात"
      या श्लोका प्रमाणे सारे जन सुखी होवोत.... सारे शुभ पाहोत.... कोणालाही दुःखी न येवो
अशा श्रध्दा ठेवून दिवा लावला.
        आणि तुला एक सहज पणती दिसली म्हणून पणतीची गोष्ट सांगते. आम्हाला लहान पणी पाठ्य पुस्तकात कविता होती...... मला अजून पाठ आहे त्यातील सार तुला सांगते.
         फार पूर्वी........ तू आता दिव्याचे हे जे बटण दाबताच ,लाईट चमकतो. सर्वत्र झगमगाट होतोना. तसे पूर्वी लाईट नव्हते.
        पूर्वी  ती दिवटी च्या रुपात होते. दिवटी पेटवायचे ..जणू मशाल .त्यातून उजेड पडायचा ...ती शेतकऱ्यांची आवडती होती. मग पणती ची कल्पना मानवास आली. घराघरात मिणमिणता प्रकाश आला .मग  तिला समईचे रुप मिळाले व देवा जवळ मंद प्रकाशात तेवू लागली , मग  तिला काचेच्या घरात रहाण्याचे मिळाले म्हणजे तिची  रुप कंदील झाले . छान कांचेचा जणु महालच तिच्या भोवती बांधला . आणि त्यास कंदिल असे संबोधू लागले. असे होत पुढे तिला गँस बत्तीचे रुप मिळाले. लग्न सराईत ..कार्यक्रमात लग्न वरातीत तिला डोई घेवून वरातीत तिचा  प्रकाश पडायचा. . तिचे काम प्रकाश देणे. पुढे तिची  रुपे बदलत गेली  
        मग तिला वीज .....बिजली म्हणू लागले .मग तर  तिचा लखलखाट वाढला. तिने जगच उजळून टाकले
 तिची  रुपे कितीही बदलली तरी ..तिचे काम एकच स्वतःजळो पण जग मात्र प्रकाशित होवो.
          तेव्हा ही छोटीशी पणती किती गुणाची आहे ना !
      आणि तू पण सांजवेळी देवाशी दिवा लावला की ,
             " शुभं करोती कल्याणम् " म्हणून, आई बरोबर देवाला नमस्कार करुन, सर्वांना सुखी कर असेच म्हणतोस ना. तर हा दिवा शुभ चे मांगल्याचेच प्रतीक आहे
       आजी तू मला "आधी होते मी दिवटी "कविता शिकव ना. हो ऐवते लहान पणी पाठ्य पुस्तकात होती आम्हास ऐक....

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

लोभस हास्य निसर्गाचे

विषय- लोभस हास्य निसर्गाचे

काव्य रचना

होता आगमन रवीचे नभी
सृष्टी पहा कशी उजळली
 लोभस हास्य निसर्गाचे
उषा पण अलवार हसली

मंद पवन वाहे सभोवती
 सुखद भासे क्षण उषेचे
फुले डौलती वेली वरती
लोभस हास्य निसर्गाचे

कृष्ण मेघांची होता गर्दी
येता श्रावण ऋतू बरवा
चिंब भिजवी या अवनीला
जणू पांधरण्या शालू हिरवा

सागराची दिसे भव्यता
 जोमानी लाट येई ऊफाळून
येता किनारा गेली विरुन
भासे चूरचूर झाली लाजून

डोंगरातूनी झरे वाहती
भासती शुभ्र दुग्ध धारा
लोभस हास्य निसर्गाचे
गीत गाई मंजूळ वारा


वैशाली वर्तक



स्वप्न गंध  समुह आयोजित
चित्र  -***अष्टाक्षरी काव्य रचना**

   **लोभस निसर्ग* 
येता रवि राजे नभी
सडे केशरी गगनी
फुले फुलली सुंदर 
उजळली पूर्वा झणी

पानोपानी बहरली
पुष्पे न्यारी चहुकडे
रंग हिरवा सर्वत्र 
वाटे पाहु कुणीकडे

रुक्ष धरा, येता वर्षा
पहा कशी बहरली 
ओली चिंब झाली धरा
तृणांकुरे अंकुरली

रुप पहा वसुधेचे
कसे झाले मनोहर
जणू हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर


रान माळ हिरवट 
वृक्ष  वेली बहरल्या
रंग एकच धरेचा
भासे पाचू पसरला

झरा वाही खळखळ
वाटे गातो संथ गाणे
हास्य लोभस निसर्ग 
ऐकू वा-याचे तराणे



वैशाली वर्तक  15/10/20

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...