सोमवार, १३ एप्रिल, २०२०

लोभस हास्य निसर्गाचे

विषय- लोभस हास्य निसर्गाचे

काव्य रचना

होता आगमन रवीचे नभी
सृष्टी पहा कशी उजळली
 लोभस हास्य निसर्गाचे
उषा पण अलवार हसली

मंद पवन वाहे सभोवती
 सुखद भासे क्षण उषेचे
फुले डौलती वेली वरती
लोभस हास्य निसर्गाचे

कृष्ण मेघांची होता गर्दी
येता श्रावण ऋतू बरवा
चिंब भिजवी या अवनीला
जणू पांधरण्या शालू हिरवा

सागराची दिसे भव्यता
 जोमानी लाट येई ऊफाळून
येता किनारा गेली विरुन
भासे चूरचूर झाली लाजून

डोंगरातूनी झरे वाहती
भासती शुभ्र दुग्ध धारा
लोभस हास्य निसर्गाचे
गीत गाई मंजूळ वारा


वैशाली वर्तक



स्वप्न गंध  समुह आयोजित
चित्र  -***अष्टाक्षरी काव्य रचना**

   **लोभस निसर्ग* 
येता रवि राजे नभी
सडे केशरी गगनी
फुले फुलली सुंदर 
उजळली पूर्वा झणी

पानोपानी बहरली
पुष्पे न्यारी चहुकडे
रंग हिरवा सर्वत्र 
वाटे पाहु कुणीकडे

रुक्ष धरा, येता वर्षा
पहा कशी बहरली 
ओली चिंब झाली धरा
तृणांकुरे अंकुरली

रुप पहा वसुधेचे
कसे झाले मनोहर
जणू हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर


रान माळ हिरवट 
वृक्ष  वेली बहरल्या
रंग एकच धरेचा
भासे पाचू पसरला

झरा वाही खळखळ
वाटे गातो संथ गाणे
हास्य लोभस निसर्ग 
ऐकू वा-याचे तराणे



वैशाली वर्तक  15/10/20

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...