गुरुवार, २५ जून, २०२६

चित्र काव्य


 भासे हिमगिरी अचल

स्वरूप पाही जलाते 

पुन्हा पुन्हा निरखुनी

येता रवी राजे नभाते


नाना रंगी उधळण

केली रवीने  नभात 

भासे चित्ताला वेधक.

आशा देतसे मनात 


तरू जणु उभे रांगेत 

 पुष्पें पहा उमलली 

करी स्वागत रवीचे 

 भासे ऊषा हासली


केली तयाने तयार

कुठे अथांग सागर

 घनदाट ती वनराई 

तर उंच उत्तुंग शिखर

  


रूप  पाहून सृष्टीचे

 कर सहज जुळती

 किती सुंदर निसर्ग 

जाणा देवाची महती


वैशाली वर्तक

गाऊ गुणगान बॉरडरलेस पॅन्थर्सचे

 बॉडरलेस पॅन्थर्स साहित्य परिवार आयोजित 

स्पर्धा, उपक्रम क्रमांक १७

दि ९\५\२६

विषय ...बॉरडरलेस पॅन्थर्स सामाजिक साहित्य चळवळ

शीर्षक. *गाऊ गुणगान बॉरडरलेस पॅन्थर्सचे*


 बॉरडरलेस पॅन्थर्स समूहच असा की 

साहित्या संगे करे,सामाजिक कार्य हमखास.

त्यात माणुसकी रूजविणे वाढविणे 

हेची असे ध्येय समूहाचे खास.


चौथ्यावर्षात  केले पदार्पण 

स्नेह संमेलनासाठी सहभागी झाले गोळा

शेतकीय, वैद्यकीय, शैक्षणिक मदत करत

समूहाने केला साजरा  सोहळा.


समूहात आहेत दाते पण अनेक 

करीती अन्न वैद्यकीयदान तसेच वृक्षाचेरोपण 

असा बहुगुणी बॉर्डरलेस  पॅन्थर्स समूह हो!

ज्ञान ,सणवार,व्यायाम सह, जपतो पर्यावरण .


समूही पूजा ताई रांगोळी कलावंत 

सजविते वारीत पथ कलाकृतीने सुंदर 

साहित्या संगे रोज  द्या, बुध्दीस चालना 

अन् खाद्य पदार्थांची चव घ्यावी पळभर


रात्रीस चारोळी समूह मजेचा

सारस्वतांना मिळे लेखणीचा  मान

देत प्रतिक्रिया एकमेकांना 

करी लेखन राखून  वेळेचे भान


असा हा बॉर्डरलेस पॅन्थर्स समूह 

किती करावे त्याचे गुणगान 

झाला आहे जग विख्यात 

आहे मी सदस्य याचा मज अभिमान 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

बुधवार, २४ जून, २०२६

म्हणी वरून ... प्रयत्नाती. परमेश्वर

 अभा म सा प समूह महाड तालुका

26/5/21

विषय - प्रयत्ननांती परमेश्वर


 काहीच प्रयत्न  न करिता  

नशीबात असेल तर मिळणार 

म्हणून बसता आरामात

हाती काही नाही येणार


जसे  प्रयत्न कराल कामात

यश देव देत  असतो

प्रयत्नांची करा पराकाष्ठा

हसतमुखे देव दिसतो 


 न हलवता हातपाय पाण्यात

 कसे तरुन जाणार किनारा

करिता प्रयत्न   अखंड मग

, मिळेल देवाचा सहारा


शिक्षक सांगती करा यत्न

मिळवाल सारे सुंदर  यश

राहू नका देवावर विसंबून 

येईल मग  खचितच अपयश



कितीदा पडतो खाली

साधा किटक  कोळी 

तरी प्रयत्न  न सोडी

बांधतांना त्याची जाळी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सोमवार, २२ जून, २०२६

अष्टाक्षरी. मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 
काव्य लेखन 
विषय .. मौन 
२२\६\२६

मौन पाळणे उत्तम 
वाद होतात स्थगित
पण सर्वच ठिकाणी 
  नसे योग्य सदोदित 

जेथे निषेध दाविणे
असे अगदी उचित 
 विनये बोलून पहा
काम  होते ची खचित

 
 गांधीजीनी बनविले
 होते ना एक खेळणे
 मौन धरावे सदैव 
 हेच तयांचे सांगणे

मौनात असते शक्ती 
नको सदा दुराग्रह 
रहा जरा वेळ शांत 
साध्य कामास आग्रह 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

शनिवार, २० जून, २०२६

ओळखीचा

ओळखीचे तर असतातच आधार देण्यासाठी.तयात नवल नाही. पण जो जाणतो नाही. अपरिचित आहे असा आधारास उभा रहातो तेव्हां त्यांचे जास्त कौतुक वाटते.
पण सध्याचे जीवन वा सर्व चे वातावरण जरा कलुषित झालेले आहे. त्या मुळे अनोळखी जरा मदतीस उभा राहिला तरी मन आपले साशंक होते आपण लगेच त्याचा अधार घेऊ इच्छित नाही.
कारण काळच बदलला आहे. त्यामुळे पटकन त्याच्या आधार आपण  नकोम्हणतो वा  टाळतो.
       आपल्या बालपणी शेजार पातजारांवर, आपले पालक मुले ,घर सोपवून जात. अजून ही ती संस्कृती flat मधे आहे. नाही असे नाही.  पण तेव्हाही आपल्याला अनोळखी माणसाने काही दिले वा. काही माहिती विचारली तर देऊ नको ही शिकवण तेव्हाही होती आज ही आहे.
    कारण लबाडी. फसवणूक हे दिवसैदिवस वाढत आहे. त्यामुळे जागरूक. सावलीची ही बाळगावीच लागते.
अनोळखीशी जरा दोन हात लांबच रहावे लागते.
        पण आता विज्ञानाने फारच प्रगत केले आहे जगताला. हे face book, insta , Whatsapp वगैरे तून सर्व माहिती सहज मिळू शकते. व अनेक fraud वाट फसवा फसवी चाली आहे. त्यामुळे अनोळखी पण उतराई ने आपणास फसवू शकत आहे. तेव्हा आपला ओळखीचा आपल्या सतत हाताय   आपला श्वास बनून रहाणा-या मोबाईल ला जपा संत statu टाकून आपली माहिती इतंबुत कळणार नाही ची काळजी घ्या 
ओळखीचा. नाही तर आधार तोडणारा होईल

शुक्रवार, १९ जून, २०२६

गझल..... वृत्त अनलज्वाला.

 गझल.....................

गझल
अनलज्वाला  ८-८-८

कष्ट करूनी यश मिळवाया झगडत गेलो
भौतिक सुखात नकळतची मी हरवत गेलो.

मान मिळविला  हजारो गुन्हे  करूनी जगी.  
  लोकांना मी सत्याचे पाठ शिकवत गेलो
                                            
 क्षणभर येता  दिन दु:खाचे  कष्टी जीवा
हास्य किस्से सांगूनी मी हसवत गेलो.

केला प्रयत्न सदा उजळण्या  जीवन सारे.        
कुसंगतीने  व्यसनात  पहा अडकत गेलो.

वृक्ष तोडून  सिमेंट राने किती बांधली
पर्यावरणा जपता धान्ये उगवत गेलो.

सोमवार, १५ जून, २०२६

सुरकुत्यांची कहाणी

सुरकुत्यांची कहाणी
सहज गुगल फोटो निहाळत होते.त्यात दोन वर्षा पूर्वी चे फोटो आले. पाहून मन  हरकले, .मी मनात म्हटले," अरे वा
दोन वर्षांपूर्वी आपण छान दिसत होतो की !  खरच या मोबाईल ने फेसबुक ने आपल्या ला दोन.. तीन.. काय 8/10वर्षापूर्वी आपण कसे दिसत होतो  ह्याच रूप क्षणात दाखवितो.
     मी जस जसे जून्या काळात गेले, तर मनी हर्ष वाढतच गेला,  मग मनाशी म्हटले,
"म्हणजे आता आता म्हणजे दोन वर्षा पूर्वी या सुरूकुत्या कमी होत्या .आता मी प्रत्यक्ष हाता कडे नजर टाकली व मनाला. समजावले , "बाई साहेब आता वृध्दत्वाकडे झुकत चाललात  बरं का  ! शरीरावरच्या  झुर्या झुर्या पहा ..सांगत आहेत .कितीही  केस काळे करा    सुरुकुत्या कुठे लपवणार ? त्या तर त्यांचे अस्तित्व तीव्रतेने दाखविताच आहेत.
     खरय या सुरूकुत्याच  जीवनात. घेतलेले  ,सुख दुःखाचे क्षण . किती आनंद  अनुभवले   किती कष्ट साहिले , यांची कथा आहे. 
आपल्या जीवन काळाचा भुतकाळ सामावला आहे.  त्यांना प्रेमाने मी गोंजांरले . जरा तेलाचा हात प्रेमाने फिरविला . स्नानाला जायचेच होते. तर नीट कांतिला तेल लावले. स्नायूंना पण व्यायाम झाल्याने स्नायू पण जरा ताठरले . .
        अंघोळी नंतर अंगणात आले तूळशीला पाणी घातले व सहज लक्ष इतर लता -वेली ,वृक्षांकडे गेले तर काही झाडांची पाने सुरकतून क्षीण भासली. तर काही निखळली होती. सहज संदेश ल्या वेलीलतांनी , निसर्गाने दिला, 
ऋतूचक्र चालत रहाते. वाढ वृद्धी. झीज हे चालत रहाणार.  मग या सुरकुत्या पण त्यातील एक भाग आहे .
काळ किती लोटला याची त्या पावत्या देताहेत.   क्षण न् क्षण  आनंदाने जगून घे. लेखणीला धार देत रहा. अनुभवाचे गाठोडे जपत  रहा. 


-

सौजन्य

स्पर्धेसाठी  कमल विश्व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित  मासिक काव्य लेखन स्पर्धा  विषय ... सौजन्य  सौजन्य गुण स्वभावाचा, प्रत्येकाच्या बालपणी. जश...