सुरकुत्यांची कहाणी
सहज गुगल फोटो निहाळत होते.त्यात दोन वर्षा पूर्वी चे फोटो आले. पाहून मन हरकले, .मी मनात म्हटले," अरे वा
दोन वर्षांपूर्वी आपण छान दिसत होतो की ! खरच या मोबाईल ने फेसबुक ने आपल्या ला दोन.. तीन.. काय 8/10वर्षापूर्वी आपण कसे दिसत होतो ह्याच रूप क्षणात दाखवितो.
मी जस जसे जून्या काळात गेले, तर मनी हर्ष वाढतच गेला, मग मनाशी म्हटले,
"म्हणजे आता आता म्हणजे दोन वर्षा पूर्वी या सुरूकुत्या कमी होत्या .आता मी प्रत्यक्ष हाता कडे नजर टाकली व मनाला. समजावले , "बाई साहेब आता वृध्दत्वाकडे झुकत चाललात बरं का ! शरीरावरच्या झुर्या झुर्या पहा ..सांगत आहेत .कितीही केस काळे करा सुरुकुत्या कुठे लपवणार ? त्या तर त्यांचे अस्तित्व तीव्रतेने दाखविताच आहेत.
खरय या सुरूकुत्याच जीवनात. घेतलेले ,सुख दुःखाचे क्षण . किती आनंद अनुभवले किती कष्ट साहिले , यांची कथा आहे.
आपल्या जीवन काळाचा भुतकाळ सामावला आहे. त्यांना प्रेमाने मी गोंजांरले . जरा तेलाचा हात प्रेमाने फिरविला . स्नानाला जायचेच होते. तर नीट कांतिला तेल लावले. स्नायूंना पण व्यायाम झाल्याने स्नायू पण जरा ताठरले . .
अंघोळी नंतर अंगणात आले तूळशीला पाणी घातले व सहज लक्ष इतर लता -वेली ,वृक्षांकडे गेले तर काही झाडांची पाने सुरकतून क्षीण भासली. तर काही निखळली होती. सहज संदेश ल्या वेलीलतांनी , निसर्गाने दिला,
ऋतूचक्र चालत रहाते. वाढ वृद्धी. झीज हे चालत रहाणार. मग या सुरकुत्या पण त्यातील एक भाग आहे .
काळ किती लोटला याची त्या पावत्या देताहेत. क्षण न् क्षण आनंदाने जगून घे. लेखणीला धार देत रहा. अनुभवाचे गाठोडे जपत रहा.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा