बुधवार, २१ जानेवारी, २०२६
ती न संपणारी कविता
रविवार, १८ जानेवारी, २०२६
खेळ
मोहरली लेखणी साहित्य समूह
17/1/26
विषय.. खेळ
खेळ म्हणता आठवे
दिन ते बालपणीचे
कधी सांजवेळ होता
घरी जाणे नावडीचे
किती ते खेळ असती
खोखो कबड्डी लंगडी
शारीरिक ऊर्जा देई
एकत्र होता सवंगडी
होते शरीर सौष्ठव
शिकवण देती खेळ
द्यावी साथ एकमेका
जमवाया हवा मेळ
पत्ते सापशिडी गोटया
असती बैठकी खेळ
सारे खेळ खेळण्यात
मजेत जातो ची वेळ
जीवनात महत्त्वाचे
स्थान असे खरोखर
खेळ खेळत जगावे
मोद मिळे निरंतर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गुरुवार, ८ जानेवारी, २०२६
विविधा वर्धापन दिनानिमित्त
चिरंतर राहो विविधा
दिन असे आनंदाचा
करु साजरा मिळूनी
देउ विविधेस शुभेच्छा
आनंदाने काव्यातूनी
विविधा आलीय यौवनात
भासे जणु नव तरूणी
नाव तिचं घेता ओठी
शोधण्या नसे कुठेच उणी
तिचाच समूह तो *सांगते ऐका*
व्यक्त होतात सख्या बोलून
कल्पना शक्तीला मिळे चालना
वकृत्व गुणास देतो उजळून
*अभिव्यक्ती* दुजा आणिक
जिथे होते गुणांचे दर्शन
गायन, वाचन ,संस्कृती जतन
विविध रंगी कला प्रदर्शन
*Only विविधा मिटींग* समूह
पहा ते शिस्तबद्ध आयोजन
देतो कार्यक्रमाच्या सूचना
गुणगान गातात *विविधाचे* जन
आज तिच्या वर्धापन दिनी
किती गाऊ गुण गान
झालीय विख्यात अहमदाबादमधे
वैविध्यपूर्णतेत तिजला मान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
3/1/26
सोमवार, २९ डिसेंबर, २०२५
वृत्तबध्द......आनंद कंद वृत्तात. कविता(5).1दु:ख. 2दुनिया 3 मी देव पाहिला 4कविता
वृत्त आनंद कंद
लगावली गागालगा लगागा
5. आई
आईच शब्द कानी, ऐकून मोद दाटे
पाहून तव मुखाला, भेटीस वाट पाही
मिळवून सर्व काही, हर्षीत मी मनाने
स्वर्गीय तोष लाभे ,आईस भेटण्याने
चिंतेत जीव तीचा , हाची विचार राही.
पाहून तव मुखाला भेटीस वाट पाही
नजरेत तीच येता , मन हर्षते खुशीने
सुखस्वर्गची पहाते ,माझेच मी मजेने
शब्दात सांगण्याते, अपुरेच शब्द राही
पाहून तव मुखाला , भेटीस वाट पाही
गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५
किंमत. ( कशा कशाची)
मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित
विषय
किंमत. ( कशा कशाची)
वेळ ,व्यक्ती ,वस्तू ,पैसा ,श्रम
सर्व सर्वची असे बहु मोल
कशा कशाची किंमत मोजणार
जगी काही नाही अनमोल
होता सकाळ घाई कामाची
नास्ते ,डबे , स्वयंपाक कामाची
जाणावी किंमत वेळेची
शाळा ,कचेरी ,उद्योगास जाण्याची
महिना संपताच घराचे रेशन,
घरभाडे घरखर्च दावे किंमत पैशाची
स्वतः साठी कुटुंबासाठी वेळ देता
धावपळीत समजेल किंमत वेळेची
देवे दिधला जन्म मानव
जाणा किंमत जीवनाची
सत्कर्म करून आनंदे राहू
ठेव जपू संचित कर्माची
पाणी हे निसर्ग दत्त
तरी जाणा त्याचे मोल
जल जिरवा मातीत
राखू निसर्गाचा तोल
माय बाप गुरू यांची
सदैव हवी जाण जीवनी
ठेवून किंमत त्यांच्या कष्टाची
ऋण मानावे मनोमनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सोमवार, २२ डिसेंबर, २०२५
पंचाक्षरी...तलाव
रविवार, २१ डिसेंबर, २०२५
मोहपाश
अलिप्तता व दुर्लक्षता
अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत. .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही तो लहानाचा मोठा होतो. ...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...

