गुरुवार, २७ मार्च, २०२५

काव्य रचना. शब्द सरी बरसल्या

सावली प्रकाशन समूह
काव्य लेखन 
उपक्रमासाठी
16/12/21
विषय - ओळ कविता
ओळ - शब्द सरी बरसल्या
     *काव्य रचना*
       
  मनी दाटलेले भाव
हाती घेता लेखणीला
*शब्द  सरी बरसल्या*
धारा भेटल्या मातीला

असे गुज अंतरीचे
उमटवे ती लेखणी
शब्द सरी बरसता
भासे मजला देखणी

अशा  नवरस पूर्ण 
*शब्द सरी बरसल्या* 
जणु मेघवर्षा आल्या
मन भावन ठरल्या

शब्द सहज  झरता
 दावी हृदयाचे भाव
शब्द शब्द जोडुनिया
घेई अंतरीचा ठाव

शब्द  असती सुमने
नाना रंगी उधळण
भक्ती, शौर्य ,धैर्य ,शांत
जणु शब्द पखरण

पहा शब्द एक-एक
झरला लेखणीतूनी
झाली कविता तयार
मोद झाला मनातूनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

आठवण (बालपणीचा काळ)

                     आठवण
अजुन आहे स्मरणात, ते दिन  बालपणीचे
कसे जड़लो घडलो , आजच्या या मितीचे.

अचूक वेळ सांगणे, आठवते ते आजीचे
बिनकाट्यांचे घड्याळ ,होते तिचे उन्हाचे.

जीभेवर रेंगाळतेय ती चव , पोळीच्या लाडूची
अन खमंग त्या  कुरमु-याच्या  चिवडया ची.

गुळ पोळीची सात्विक गुंडाळी ,असे न्याहरिला
मागे टाकेल चवीत, सध्याच्या  या फ्र्ँकीला.

पत्ते,लगोरी डाव ,रंगले असत दिवसभर
मोबाईल्स् गेम्सना, कधीच येणार नाही ती सर,

सांजवेळी म्हटली जाई ,घरात शुभंकरोती
तर आता,वेळ सुरु होते , टिव्हीच्या मालिकेंची

मातीनी ,गेरूनी बनविलेले ओटे न् किल्ले
नव्हते सर्वत्र चायनीजचे लाईटींगचे जाळे.

घरोघरी मित्रांसवे , चाले दिवाळीचे फराळ
अभ्यंग स्नाना वेळी, वाजवायचे फटाके बार

आता राहिल्या,नुसत्या आठवणी
"ती" मजाच न उरली , "त्या" काळाची.
 असे म्हणत फक्त, आठवण काढायची
गत काळाची , अन् जुन्या दिवसांची.





गुरुवार, २० मार्च, २०२५

लेख आठवणीतील होळी. ...होळी सण

लेख    आठवणीतील होळी.


  दरवर्षी होळी सण येतो. होळी  म्हटली कीं, विविध रंगानी ,  तसेच गुलालाने

 तबके भरलेली , व  त्याच बरोबर विविध आकारात रंग उडविण्याच्या पिचका-यां नी भरलेली ,सजलेली दुकाने . तसेच साखरेच्या माळींनी भरलेली दुकाने असे चित्र  डोळ्यासमोर उभे रहाते.  हो या साखरेच्या माळा गुजरात मधे आताच  मिळतात  मग आपल्याला गुडी पाडव्यास लागतात तेव्हा नसतात. येथे गुडीचे महत्व नाही ना.

       कसे आहे ना ....आपले  भारतीय सण ऋतुंशी पण संबधीत साजरे करीत असतो. होळीच्या सुमारास पानगळ झाल्याने झाडांची पाने गळून गेली असतात.

फांद्या  निष्पर्ण झाल्या असतात . तेव्हा त्या वाळक्या  फांद्यांची कापणी  केली की झाडांना छान नवी पालवी  फूटू लागते . तर होळी च्या वेळी वाळक्या फांद्यांची लाकडे , व पाना पाचोळा पेटवून तसेच नको असलेल्या वस्तू दहन म्हणजे होळी. 

होळीला पौराणिक महत्त्व आहेच.जे आपणा सर्वांना माहित च आहे. 

       त्याच पौराणिक  पारंपरिक  स्वरुपा ची होळी आमच्या लहानपणी दोन / तीन घरी प्रगटवायचे.  रीतसर घरा समोर खड्डा करुन तेथील जागा स्वच्छ करून   थोडी लाकडे व भोवताली गौ-यांची चड लावून, पाट मांडून यथा सांग शास्त्रोक्त पूजा करायचे. घरची बाई पुरळ पोळीचा नैवेद्य  दाखवून  भक्ती भावे नमस्कार करून  मग सर्व जण प्रदक्षिणा घालयचे. 

     तसेच सार्वजनिक  स्वरुपाची पण होळी व्हायची .सोसायटी ची मुले वर्गणी

गोळा करून, लाकडे आणून, होळी प्रगटवायचे. मग मुलांचे रात्री जागरण चालायचे .पौर्णिमा असल्याने रात्री उजेड पण असायचा. होळी पेटविल्यावर  सुरुवातीला छान खेळ वगैरे व्हायचे .  पण, मग मोठ्या लोकांची  झोपा झोप झाली कीं हळूच आवाज न होवू देता , कोणाचे  तरी कोळश्याचे पोते, तर कोणाची बाहेर राहिलेली लाकडी वस्तू उचलून सरळ होळीत टाकायचे. .त्यावेळी तसे करण्यात  काय आनंद  मिळत होता .?.........देव जाणे.  पण वात्रटपणा अथवा खोडकर पणाच होता.....  म्हणायचा. बालपणातील अशा खोडकर आठवणी अजून आठवितात.


        पण होळी म्हटले की मला शाळेत असतांनाची एक आठवण अजून येते. होळीची दोन दिवस सुट्टी असायची. त्यामुळे आदल्या दिवशी रंग खेळायचा मुड असायचा. काही जणी गुलाल पुडी घेऊन यायच्या. काही जणी सुके रंग.

       शाळा सुटल्यावर शाळेच्या आवारात गुलालाने एकमेकीस रंगवायचो. असेच रंग  खेळता खेळता एका मुलीने गुलाल संपला .... तर, शाईची पेन काढली .

         हो  !  त्यावेळी आत्ता सारख्या बाॕल पेन नव्हत्या.शाईचीच पेन वापरणे सक्तीचे होते.   त्यामुळे ती प्रत्येकी कडे असायचीच.  एका मुलीच्या  सुपीक  डोक्यात कल्पना आली .

   तिने लगेच फाउंनटन पेन काढली. व टोपण बाजूस काढून ,

    ज sssरा जोरात झटकली. .

 समोरच्या मुलीवर  शाईचे शिंतोडे उडाले.  .......झाssले .  लगेचच  तशीच  रंगपंचमी  सुरू झाली. 

       पण हे करतांना शाळेच्या  भिंतीवर 2/4 शिंतोडे उडाले. प्रथम  कोणाच्या लक्षात आले नाही. पण नेमका त्याचवेळी शाळेचा शिपाई तेथून जात होता .त्याने पाहिले. त्याला गयावया करून हाता पाया पडून आमचे नांव सांगू नको. करत पळ काढला. पण  वरती बाल्कनीतून शिक्षकांनी पाहिलेच.

 . त्यामुळे शिक्षिका बाईंनी खाली येऊन शाळा आपली स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य  आहे.  तुमचे हे वर्तन अयोग्य आहे वगैरे  वगैरे ..लेक्चर तर  दिलेच .आणि  भले 2/4 शिंतोडे पण चूक तर केलीच आहे तर ..... .  शिक्षा  पण भोगावीच लागेल म्हणत  ,  दोन दिवसाच्या सुट्टी नंतर  तुम्ही प्रतिज्ञा 5 वेळा लिहून आणायची  अशी शिक्षा  पण फर्मावली. 

        दोन दिवसा नंतर   वर्गात येताच मुले  आमच्या मिळालेल्या शिक्षे बद्दल हसली याचे वाईट वाटले.व त्या पेक्षाही अपमान वाटला. व घरी आईने युनीफाॕर्म धुवावयास लावला  व हवे तेवढे तोंड सुख घेतले हे वेगळेच ..

    आणि ..   आता ...नातवंडे रंग खेळतात. तर लगेच, "अरे!  अरे  ! ओट्याच्या खाली उतरा. 

  घराच्या भिंती खराब होतील." असे शब्द काढतांना शाळेची ४/५ शिंतोडे उडलेली भिंत आठवते.

  आणि होळी तर पेटविणे व्यर्थच वाटते.   उगाचच  झाडे कापणे .

अशी पण सिमेंटच्या जंगलाने  झाडे कमीच झाली आहेत. त्यात लाकडे जाळून प्रदुषणात वाढ. व पर्यावरण ची हानी करणे वाटते. 

   आणि रंग खेळून पाण्याची नासाडी .त्यामुळे  लगेच कोणी  तरी  म्हटलेल्या ओळी आठवितात   कोणी नव्हे माझ्याच की....

         

                साजरी करायची होळी तर,

                करुया जतन, वन- पर्यावरण

                  दहन करूनी, भेद वर्ण जाती

                   जागृत करु, एकात्मतेचे वातावरण.


                 ...............  वैशाली वर्तक




मोहरली लेखणी साहित्य समूह 

उपक्रम क्रमांक 1228

विषय ... होळी 


 शीर्षक...रंगून जाऊ रंगात*


आला   हो सण रंगाचा

*रंगून जाऊ रंगात*

फुलली विविध फुले

आनंद  होतो मनात


 सण हा येता रंगाचा

  रंगोत्सव   खेळे सृष्टी 

 विसरून सारे जाती भेद

समतेची ठेवुया दृष्टी 


करुया संवर्धन  वनश्रीचे

लोभ मत्सराचे करु दहन

नको तोडणे जाळणे वृक्षाचे

करु पर्यावरण जतन


येता  ऋतुंचा राजा

 वसंत फुलला मनोमनी

ऐका कोकीळ कुजन

मोहर दिसे वनोवनी


पळस बहावांचे सुंदर

  रंग आकर्षती मनाला

रंगून जाऊ रंगात

नको  निराशा  जीवाला


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

ओळकाव्य ) देवा सुरू दे माझे मी पण.


 --देवा सरु दे माझे मी पण

ओळ काव्य


देव जर मला भेटला

सांग तव ईच्छा म्हणाला

आधी मागीन मी  तयाला

संपव माझ्यातील मी पणाला


  षडरीपूंनी जग हे भरलेले

  दूर तया  सारण्या दे शक्ती     

  तूच भर भाव मम हृदयी

 मी पण  सारण्या घडो भक्ती


विसर न व्हावा कधी तुझा

घडू दे निरंतर तव सेवा

सरू दे माझे मी पण

 द्यावा हाची कृपेचा ठेवा


 वृक्षलता करती उपकार

तशीच घडो सेवा हातूनी

न दाविता अहम भाव

सरु दे  मी पण मनातूनी


हेची दान दे देवा आता

आले मी तुला शरण नाथा

सरु दे देवा माझे मी पण

टेकवीते  तव चरणी माथा


    वैशाली वर्तक

शनिवार, १५ मार्च, २०२५

का. ? ( शब्दगंध सिंगापूर)

शब्द गंध. सिंगापूर 
विषय.... का?


शब्द... का ?असे प्रश्नाथीं 
शब्दच दावी दाटलेल्या जिज्ञा
उचंबळती मनीच्या भावना अन,
जाणण्यासाठी करी शब्दातून आज्ञा.

का? ....शब्द असे आज्ञार्थी पण,
नकार देण्यात  पुढे सदा
न दाविता सरळ नकार 
अनिच्छा  दाखवी सर्वदा 

क  शब्दाची बाराखडी 
लहान मुलांची  होते सुरु 
का ,कधी,  केव्हा कोणी 
कुठे ?कशाला? प्रश्नावली निघे  चुरूचुरू

क अक्षर  असे उचापतीचे
सर्व प्रश्न तेच सुरू करे 
अन् शंका निरसन होईस्तोवर 
अक्षर क चे पोट न भरे


जग एवढे  जाहले प्रगत
का? या  प्रश्नानेच खरंतर
 का खालीच पडते फळ झाडावरुन ?
शोधक शब्दांस दिले गुरूत्वाकर्षणाने उत्तर .

तसेच केव्हा ,कधी ,कोठे, कोणात ,
शब्दे  तयार जाहला  भुगोल ,इतिहास 
अन् या क च्या बाराखडीनेच
मानवाचा झाला बौद्धिक विकास ,

तर सांगणे हेची.उरते
देऊन ताण बुद्धीला व्हावे विचारवंत
नका अव्हेरु *का* शब्दाला
अजून शोध लागता होऊ भाग्यवंत .


वैशाली वर्तक
अहमदाबाद 

बुधवार, १२ मार्च, २०२५

चित्र काव्य ...अभिलाषा



स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित 
उपक्रम २४८
विषय ....चित्र काव्य 

         अभिलाषा 

रस्त्यावर चालता चालता 
पाहिलाआरसा  समोर. 
मन गुंतले विचारात 
नाचे मनी कल्पनांचा मोर.

शिकून जर झाले  डॉक्टर 
चालीन ऐटीत हर्षात 
कशी दिसेन रूबाबदार 
अन्, रुप दिसले की आरशात .!


 स्टेथोस्कोप गळ्यात 
पांढरा अंगरखा अंगावर
दोन हात टाकलेले खिशात 
प्रसन्न हास्य  दिसे मुखावर 

केस पहा  चापून चोपून 
दिसताहेत  एकदम छान 
क्षणभर हर्ष दाटे मनी
होईल मी डॉक्टर महान

पूर्ण करणार  परमेश्वर 
हिच्या मनातील तीव्र आशा
न होता ती कधीच निराश 
पूरी व्हावी तिची अभिलाषा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


प्रतिसाद अभिप्राय. कैलास सोनावणे...
ही कविता एका स्वप्नाळू मनाच्या अभिलाषेचे सुंदर चित्र उभे करते. रस्त्यावरच्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहताना निर्माण होणारी डॉक्टर होण्याची उत्कट इच्छा यात प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. प्रतिमा आणि कल्पनांचा मोहक वापर, विशेषतः स्टेथोस्कोप, पांढरा अंगरखा आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व यामुळे कविता अधिक जिवंत वाटते. शेवटच्या ओळीत आशेचा आणि परमेश्वरावरील विश्वासाचा उल्लेखही प्रेरणादायी आहे. एकंदरीत, स्वप्न आणि प्रयत्नांची जाणीव करून देणारी हृदयस्पर्शी रचना!

शनिवार, ८ मार्च, २०२५

ऑन लाईन खरेदी


विश्व लेखकांचे स्पर्धा मंच 
लेख लेखन स्पर्धा 
विषय ..ऑन लाईन शाॅपींग

      अगं  बाई!उशीर झाला आज उठायला. घाईने चहाचे आधण ठेवत. फ्रीज मधून दूध बाहेर काढत आणि दूध .गरम करायला गॅसवर ठेवले तर पहाते तर काय !  बाईssबाई दूध नासल की!   चहा कसा होणार आणि तो डीप डीप  चहा तर अजिबात आवडत नाही . त्यापेक्षा गरम पाणी पिणे परवडले. असे विमलताई बडबडल्या.
    तेवढ्यात सून विभावरी आली म्हणाली ,"नका काळजी करू.आता ८ व्या मिनीटात 
दूध येईल. Blinkit सेवेला आहेना!  मग काळजी कसली!
    आणि खरच आधणात साखर, किसून आले,व चहा टाकस्तोवर दारात दूधाच्या पिशव्या हजर.
     असे सुख या online खरेदीने प्राप्त झाले आहे. शरीरास कष्ट न देता ,धावपळ न करता सहज वस्तू हजर होत आहेत. त्यात अमूक एक रकमेची खरेदी केली तर आणणावळ पण लागत नाही.
       तसे online   खरेदी ने घरा बाहेर जाणे नको .वेहिकल चालवणे नको, पेट्रोल ची बचत.   हे सुखावहच  झाले आहे. तसेच  किराणा माल  कपडे खरेदी, साडी , ड्रेस वगैरेची  पण online खरेदी छान होते.   
   रंग नाही मना सारखा अथवा माप नाही योग्य, तर बदलून पण  वा  आवडली नाही वस्तू तर परत पण घेतली जाते.  
   मग सध्याचे जनरेशन काय.. वा    जे आधुनिक टेक्नॉलॉजीशी समरस  झाले आहेत ते सारे  वाटच पहात  असतात.  आणि खुशीने online खरेदी करत आहेत.    व   online खरेदीला प्रोत्साहन देत आहेत.
       पण स्वतः हून बाजारात जाऊन वस्तू वा  कापड पारखून घेणे , खूप निवड करण्याची संधी,    सा-या जातीच्या व.  अनेक प्रकारचे सामान् हाताळताना हवे तेवढा   खरेदीला choice. मिळणे.   हे प्रत्यक्ष खरेदी तच मिळत, जसे एका साडी शी 10/12 साड्या  वा ड्रेस... हे  प्रत्यक्ष खरेदी तच शक्य होत असते. 
   दुकानदारांशी बोलून भाव कमी जास्त , करून..धासाधिशी. करुन ,कसे आपण विक्रेत्या स आपल्याला  हव्या त्या किमतीत वस्तू घेतलीचा  आनंद.... online मधे मिळत नाही,
      आणल्यानंतर खरेदीतील मजा रंगवून सांगण्याची मजा तर प्रत्यक्ष खरेदीतच येते.
जसे लग्न कार्याची खरेदी... सर्वांना बरोबर घेऊन केलेल्या खरेदी ची मजा काही आगळीच .
       शिवाय विंडोज शॉपिंग ची  प्रत्यक्ष जाऊन पायपीट करून,दहा दुकान पालथी घालत शेवटी कंटाळून काही पण न घेता परत यावे 
  आणि. घरी एसीत बसल्या बसल्या मुलीने.  आपण  बाजारात पाहिलेली वस्तू सहज आपण. यावयाच्या आत  टेबलावर  online खरेदी ने  केलेली पहावी.    तेव्हा online खरेदी झिंदाबाद शब्द  तोंडातून निघतात.
      तर असे आहे. पण online खरेदीत.  मोबाईल हाताळण्यात काळजी ध्यावी लागते.सध्या  मोबाईल fraud वाढत आहेत. त्याची नीट काळजी घेणे जरुरीचे आहे.
 उगाच आपला नंबर  इथे तिथे झाला तर आपली सारी माहिती... नको तिथे मिळते व fraud होतात.
    पण बदल हवाच ना. विज्ञानाची प्रगती अनुभवली तर पाहिजे च ना,
   पण या online खरेदीने छोटे व्यापारी दुकानदार यांचे नुकसान होत आहे,
सहज माल हाती मिळत असल्याने दुकानात विक्री कमी होते. पण हे सारे
व्यापार चक्र आहे ...असे चालतच राहणार.
जमानेके साथ चालना चाहिए ना .

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...