शनिवार, १५ मार्च, २०२५

का. ? ( शब्दगंध सिंगापूर)

शब्द गंध. सिंगापूर 
विषय.... का?


शब्द... का ?असे प्रश्नाथीं 
शब्दच दावी दाटलेल्या जिज्ञा
उचंबळती मनीच्या भावना अन,
जाणण्यासाठी करी शब्दातून आज्ञा.

का? ....शब्द असे आज्ञार्थी पण,
नकार देण्यात  पुढे सदा
न दाविता सरळ नकार 
अनिच्छा  दाखवी सर्वदा 

क  शब्दाची बाराखडी 
लहान मुलांची  होते सुरु 
का ,कधी,  केव्हा कोणी 
कुठे ?कशाला? प्रश्नावली निघे  चुरूचुरू

क अक्षर  असे उचापतीचे
सर्व प्रश्न तेच सुरू करे 
अन् शंका निरसन होईस्तोवर 
अक्षर क चे पोट न भरे


जग एवढे  जाहले प्रगत
का? या  प्रश्नानेच खरंतर
 का खालीच पडते फळ झाडावरुन ?
शोधक शब्दांस दिले गुरूत्वाकर्षणाने उत्तर .

तसेच केव्हा ,कधी ,कोठे, कोणात ,
शब्दे  तयार जाहला  भुगोल ,इतिहास 
अन् या क च्या बाराखडीनेच
मानवाचा झाला बौद्धिक विकास ,

तर सांगणे हेची.उरते
देऊन ताण बुद्धीला व्हावे विचारवंत
नका अव्हेरु *का* शब्दाला
अजून शोध लागता होऊ भाग्यवंत .


वैशाली वर्तक
अहमदाबाद 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...