बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

प्रेमातील गोडवा

सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित स्पर्धा 
स्पर्धा क्रमांक 1
काव्यप्रकार पारंपारिक 
विषय. ... प्रेमातील गोडवा

   शीर्षक...प्रेम भावना

प्रेमच असे उत्कट भावना
कसे करु  तिचे गुणगान
होत नाही  कधी किंमत प्रेमाची
प्रेम देई मनाला समाधान

अंतरी वाटे सदैव एकभाव
प्रेमात नसे कधी मी तू पण
जणु  असूनी दोन जीव 
वसती, जैसे एकच आपण

*प्रेमाचा गोडवा* दावी आपुलकी 
स्वार्थी भावाचा असे अभाव.
दिसे सर्वस्वाचा त्याग 
नसे आप मतलब ठाव

आपुलकीची भावना मनी
प्रेमात दिसे सदैव तत्पर
करुणा, दयेचे,  प्रेमळ झरे
वहाताती सदैव निरंतर

जशी नदी साहूनी कडे-कपारी
येता धावत  नसे खंत 
तिच भावना एकमेकासाठी
कष्ट करण्यात नसे उसंत

असा प्रेमाचा गोडवा 
वसे प्रेम  चराचरात
देई आनंद भरभरूनी
भरलेले प्रेम  चराचरात 

वैशाली वर्तक .
अहमदाबाद .
8141427430

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

सहाक्षरी. सोनेरी पहाट./ माहेर / समजून घ्यावे

विश्व लेखकांचे 
आयोजित उपक्रम 
षडाक्षरी काव्य लेखन 
विषय .. सोनेरी पहाट 


शशी मावळला
मंदावले तारे
थंड  ती लहर
झोंबे अंगा वारे


झाली झुंज मुंज 
 प्राची उजळली
रवीची किरणे 
नभी पसरली

केशराचे सडे
सोनेरी पहाट
पक्षी करितात
तो  किलबिलाट 


दरवळे गंध
सुमने फुलली
सोनेरी पहाट 
मंडळी जाहली.

वैशाली वर्तक 



अहमदाबाद*स्पर्धेसाठी* 
अभामसाप धुळे जिल्हा 
सहाक्षरी. काव्यरचना
विषय ... माहेर 
 *आवडीचे स्थान*

शब्दची माहेर 
करी आठवण 
उभे डोळ्यापुढे 
सारे बालपण.

प्रेमाचा तो हात
भासे अंगावरी
आईचा फिरला
पहा क्षणभरी

क्षणोक्षणी सय 
आजीची ती माया
मनात दडली
ममतेची छाया

दिन ते मौजेचे
ओढ सदैवाची
मनी लागलेली 
आस माहेराची


लेक सोडूनिया
स्वतःचे माहेर 
जणु सासराला
असे तो आहेर

खुशाली कळता
 जीव आनंदतो
तरी भेटीसाठी 
सदा आतुरतो.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



विषय.   समजून घ्यावे
शीर्षक    सुखमय जीवन 

सुखाने जगण्या
हवी तडजोड 
होतसे जीवन
आंब्याची फोड


ऐकता दुजांचे 
गवसे कल्पना
देत असे आशा
नव्या संकल्पना 
घ्यावे समजून 
उत्तमच ठरे 
नसे आपलेच 
सदा साठी खरे.

समजून घेता
कळते क्षणात 
उगाच धरिला
हट्टची मनात.

मीपणा सोडून 
घे ना समजून 
सुसंबद्ध वाद
दोघां च्या कडून 

माझे तुझे सोड
व्हावे  सहमत
व्हा समजदार 
होते एकमत 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
8141427430


. सिंगापूर शब्दगंध भान

शब्दगंध सिंगापूर 7/10/24

भान

प्रसंग, घटना ,अस्तित्वाची
मानवाच्या चित्ताची  जाण
 वा, तयाच्या अंतर्मनातील 
एक जाणीव, ते असे भान

जाण,  लक्ष , ध्यान सारेची
दाखवीती   चित्ताचे भान
 मन असता एकाग्र कामात 
 मानव  विसरे देहभान 

 
रोजच्या दैनंदिन जीवनात 
वागताना जरूरी असे भान
आपापली कर्तव्ये समजून 
वागावे , न होता बेभान 

मराठी भाषेला मिळालाय
दर्जा अभिजात, ठेवून ती जाण
मराठी बोलून वाचून लिहून 
भाषेचे जतन करण्याचे राखू भान

 भक्तीत लीन मीराबाई 
 विसरूनिया देहभान 
विसर पडे काळ वेळेचा
 भक्तीरसात सदा  रममाण.

 
वैशाली वर्तक

भान. सिंगापूर शब्द गंध 28/10/24

शब्दगंध सिंगापूर 7/10/24

भान

प्रसंग, घटना ,अस्तित्वाची
मानवाच्या चित्ताची  जाण
 वा, तयाच्या अंतर्मनातील 
एक जाणीव, ते असे भान

जाण,  लक्ष , ध्यान सारेची
दाखवीती   चित्ताचे भान
 मन असता एकाग्र कामात 
 मानव  विसरे देहभान 

 
रोजच्या दैनंदिन जीवनात 
वागताना जरूरी असे भान
आपापली कर्तव्ये समजून 
वागावे , न होता बेभान 

मराठी भाषेला मिळालाय
दर्जा अभिजात, ठेवून ती जाण
मराठी बोलून वाचून लिहून 
भाषेचे जतन करण्याचे राखू भान

 भक्तीत लीन मीराबाई 
 विसरूनिया देहभान 
विसर पडे काळ वेळेचा
 भक्तीरसात सदा  रममाण.

 
वैशाली वर्तक

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

सुख.... सुख आले माझ्या दारी/क्षण सुखाचे सखाचे चांदणे

सिध्द साहित्यिका समूह
आजचा उपक्रम अष्टाक्षरी रचना
विषय- **सुख आले माझ्या  दारी**

सुख वसे मनातच
सांगे साधु संत जना
नका शोधु तया जगी
आहे ते आपुल्या मना

हेच भाव मनी माझ्या 
राखियले मी संसारी
भासे मजला सदाची
**सुख आले माझ्या  दारी**

कृपा दृष्टीही देवाची
मजवरी सदा साठी
नाही भासली उणीव
हरी उभा माझ्या  पाठी

भाग्यवान  मी मानीते
वाहे आनंद  सरिता
सर्व  सौख्य लाभे मज
सांगे ही मम कविता

वैशाली वर्तक
=============

क्षण सुखाचे*
================
क्षण सुखाचे शोधावे
भरलेल्या  जीवनाते
आनंदाने सदा जगा
बहरतील ते क्षणाते

पहा ऊषा उजळली
घेत नव्या आशेचा  साज
क्षण सुखाचे वेचावे
आनंदाचा लावूनी ताज

 होता मना सारखे वाटे
सुख आले माझ्या  दारी
 उपभोगा क्षण सुखाचा 
मनी समाधाने वाटे भारी

ऊषे नंतर येता निशा
टिपूर चांदणे मोहीते मन
लुटा अनामिक आनंद 
वाटती हे पण सुखाचे क्षण

भरले हे जग मोदाने
नको  उदासिनता मनात
मोद विहरतो चोहीकडे
 मिळतात सुखाचे क्षण क्षणात

वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)      29/10/20



विषय .. सुखाचे चांदणे 


सुख वसे मनातच
सांगे साधु संत जना

नका शोधु तया जगी
आहे ते आपुल्या मना

हेच भाव मनी माझ्या 
राखियले मी संसारी 
भासे मजला सदाची
सुख आले माझ्या  दारी

कृपा दृष्टीही देवाची
मजवरी सदा साठी
नाही भासली उणीव
हरी उभा माझ्या  पाठी

दिले संस्कार मातेने
राहा सदा समाधानी
तेच ठसविले मनात
 सुखी आहे मनोमनी


  फुलले सुखाचे चांदणे
वाहे आनंद  सरिता
सर्व  सौख्य लाभले मज
सांगे ही मम कविता

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
============

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

हरभ-याचे रोप

मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 
उपक्रम स्पर्धेसाठी दि २३\१०\२४
विषय ..हरभ-याचे झाड

आवडे मजला बागकाम 
लावली होती रोपेअनेक
त्याच उत्साहात पेरले 
हरभरे  मूठ भरून एक

फुटले अंकुर चण्याला 
डोकवू लागले मातीतून 
मन झाले आनंदित 
 हरभरे  येतील भरभरून 


चला आता एक कडधान्य 
असेल हजर दिमतीला सहज
सदा वाण्याकडे जाण्याची 
आता नसेल गरज

 आला अवकाळी पाऊस 
झोडून काढली रोपे सारी
किती गोड दिसत होती 
हिरवी हिरवी न्यारी न्यारी 

केली पावसाने आडवी
आधीच नाजूक  रोपे
त्राण नुरला ताठ उभे रहाण्या
रोपे झाली सदा साठी झोपे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...