सोमवार, २९ एप्रिल, २०२४

शाखा

लावियलेले रोप सानुले,
बहरले आज, वृक्ष रुपात 
तया सम, शब्दगंध समूह 
झळकतोय त्याच्या यौवनात 


काव्यसंग्रहे,काव्यांच्या ध्वनी मुद्रिका
घेतल्या पहा किती भरारी 
बहरलेल्या जणु तयाच्याच फांद्या शाखा
सारस्वतांना देत सदा उभारी

जरी जाता  तया सोडून दूर 
शब्द रुपानी जीव भेटण्या आतूर 
दूरदूर परदेशी पसरल्या फांद्या 
शब्दांना भैटण्याची मनी हूरहूर 



समूह देतो विविध विषय
देतो संधी दाविण्या चुणुक 
सारस्वतांना मिळता खाद्य 
लेखणी सरसावे होऊन उत्सुक 


दरवळणारा शब्दगंध वृक्ष
करितो सेवा माय मराठीची
नको नुसते बोलणे मुखाने          
संवर्धन ,जतन करी मायबोलीची 

किती वर्णू ,   करू गुणगान 
असाच वृध्दिंगत  होवो सदैव 
दरवळावा तयाचा  किर्ती सुगंध
 Mms शब्दगंध  असे एकमेव.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
२५\४\२४



खोपा सुगरणीचा
21/4/24


पाहूनी चित्र  मी रमले
रमले, खोप्यातच मन
किती पक्षी हा कलावंत 
कलावंत, तो सुगरण

पिले सुरक्षित राखण्या.       
राखण्या,  मऊ ते आसन.       
कसा विणला पहा खोपा
खोपा , केला विना साधन


आणी तृण पाती चोचीने.                  
चोचीने गुंफली सुबक                    
 केली येण्याची जागा आत                        
आत, पहा मऊ बैठक 


ईवले पिल्लू  भिरभिरे
भिरभिरे, पहाण्या आई
आई दरडावूनी सांगे
सांगे, आतच  रहा बाई
l

 कुठलीही    आई असो
असो, पक्षी वा मानवात
काळजी  घेण्याची वृत्ती
वृत्ती, दिसते  अभिजात 

बहिणाबाईं  काव्ये खोपा.  
खोपा वर्णिलेला सुंदर 
नसता हात बोटे  तरी 
 तरी,विणीला मनोहर

वैशाली 



बुधवार, २४ एप्रिल, २०२४

चित्र काव्य खट्याळ मुलगा


सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित चित्र काव्य 
     *खट्याळ मुलगा* 


     नित्य उद्योग रोजचा
     असे  काढण्याचा खेळ 
     घेऊनिया डोई वरी
.    कसा घालवितो वेळ 

    वदतो पहा कसा तो
   आहे मी तर बलवान 
    सर्व खेळतील वस्तू 
     भासे मजला लहान 

  घेतो पूर्णतः खेळणी
  डोईवरी उचलून 
  घर भर फिरवितो
  हसतो स्वतः खळाळून 

  हसताना  गेला की तोल
  पसरला खेळ घरभर
  भरण्याची चिंता  मनी 
 भांबावला क्षणभर 

असता हुकमाचा एक्का हाती
 सुरू करितो रडण्याचा डाव 
धावून येतातच सारी मंडळी 
चेहऱ्यावर साळसूदीचे भाव 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

शेल काव्य. खोपा सिंगापूर शब्दगंध शेल रचना

        खोपा
 21/4/2024.  चित्र काव्य 
पाहूनी चित्र  मी रमले
रमले, खोप्यातच मन
किती पक्षी हा कलावंत 
कलावंत, तो सुगरण

पिले सुरक्षित राखण्या.       
राखण्या,  मऊ ते आसन.       
कसा विणला पहा खोपा
खोपा ,तयार  विना साधन

आणी तृण पाती चोचीने.                  
चोचीने गुंफली सुबक                    
 केली येण्या जागा आत                        
आत, पहा मऊ बैठक 

ईवले पिल्लू  भिरभिरे
भिरभिरे, पहाण्या आई
आई दरडावूनी सांगे
सांगे, आतच  रहा बाई

 कुठलीही    आई असो
असो, पक्षी वा मानवात
काळजी  घेण्याची वृत्ती
वृत्ती, दिसते  अभिजात 

बहिणाबाईं  काव्ये खोपा.  
खोपा वर्णिलेला सुंदर 
नसता हात बोटे  तरी 
तरी, विणीला मनोहर.






गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

लेख. ...आईचा खिसा

खिसा
    आजचा विषय आईचा खिसा .
होता एक काळ जेव्हा स्त्रिया शिक्षित नव्हत्या.कमवत्या नव्हत्या. चुल मूल मधे च रमलेल्या होत्या. पुरुष जे पैसे देत त्यातच  घरखर्च चालवित घर संभाळित. व त्या पैशातून थोडे फार पैसे वाचत.असायचे.  ते कुठे तांदळाच्या डब्यात वा त्यांचे साम्राज्य असायचे त्या  स्वयंपाक खोलीत.. कुठल्या कुठल्या डब्यात पैसै ठेवीत. शिक्षीत नव्हत्या..!. त्यामुळे बॅकेचा विचारच  करणेच नाही. ..आणि ते  वाचविलेले पैसे मुलांचे लाड  करण्यात ,त्यांचे हट्ट पुरविण्यात तर कधी काही गरजा पुरवण्यासाठी वापरीत.  .तेव्हा... तोच त्यांचा  पैशाचा आर्थिक खिसा होता.  
       पण आता काळ बदलला शिक्षणाने  स्त्रिया घरा बाहेर पडून नोकरी करून स्वतः साठी. व  कुटुंबाला पण आर्थिक दृष्टया  मदत रुप होत आहेत.  बदललेल्या  काळात,आर्थिक दृष्टया स्वत:पण सबळ झाल्या.आहेत. आता तर खिशांच्या पलीकडे डेबीट क्रेडिट कार्डाने त्यांचे खिसे पुरूषांच्या जोडीनै. ... तोडीचे झाले आहेत 
     पण मी म्हणते पूर्वीच्या वेळीस  व आता पण  स्त्रियांना खिसे आहेत व होते.  जसा आईचा तसेच बाबाना , पण. होता , पण आज आपण इथे आईच्या खिशांचे बोलत आहोत म्हणून म्हणते.की. प्रत्येक आईचा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, ममतेचा आणि सर्वात महत्वाचा संस्काराचा खिसा. जो तेव्हाही होता आजही आहे . प्रेमाने दिलेले संस्कार, शिकवण ज्याच्या जोरावर ती आपणास घडविते व   ती  प्रत्येकाची आई पाल्यास घडविते. .
       आणि  खरच तिच्या त्या बळकट खिशाने ,मी  पण आज स्वतः च्या पायावरच नव्हे तर कर्तबगार बनून जीवनात यशस्वी झाले.
आणि आता आईची   आजी होऊन.  माझ्या सारख्या अनेक आज्या.. त्यांचे त्या आज्यांचे  खिसे पण चांगले मजबूत आहेत . मुलांना पण शिक्षीत करून त्यांचे पण खिसे तगडे केले आहेत. 
एकूण काय काळ बदलला  .. शिक्षणाने रहाणीमान बदलले .  तरी बालपणीच्या तिच्या खिशाचे.. मनात स्वरूप  बचतीचा खिसा तेच आहे .

वसंत फुलला/गच्चीत फुलला वसंत/चाहूल वसंताची


पीत वर्णात बहावा
डौलदार बहरला
निसर्गात पानोपानी 
पहा वसंत फुलला 


जणु भासती झुंबरे 
लाविलीत सुशोभित 
करी रंग उधळण
मन झाले पुलकित 

वारा  तयांना झुलवे
डौलताती अलवार 
 भासे मोहक डौलणे
वा-याच्या तालावर

निसर्गही साधतोय 
पहा रंगाची संगती
पीत फूले, हरित पाने
किती सुंदर दिसती

खरा जादुगार असे
दावी तयाची किमया
जसा बदलतो ऋतू  
 स्फुरे काव्य  वर्णावया


वैशाली वर्तक 
अहमदाबाद १७\४\२४

वसंत फुलला 

मम गच्चीतली बाग
कशी राहिल वंचित 
सृष्टी फुलली   वसंते
 गंध पसरला खचित 

लाल ,गुलाबी, श्वेत 
पहा जास्वंद मोहक
सोनचाफ्याचा गंध 
सदा चित्ताला वेधक


मंजी-या सह तुळशी 
बहरली तुळस  छान 
 शोभिवंत तबकात.                   
वाढवी सुमनांची शान

मधोमध गुलाब राजे
झाले  पहा   स्थानापन्न
 फेर धरून गोकर्ण 
मन  झाले ना प्रसन्न ?
वैशालीवर्तक




चाहूल वसंताची 


येता  ऋतू शिशिर
सुरू झाली पानगळ 
दिसती केविलवाण्या तरूलता
भासे संपली निसर्गी हिरवळ

पण लागताच चाहूल वसंताची
पोपटी रंगी पर्ण चिमुकली 
तरूच्या सुक्या  फाद्यांना नटविता
काही तांबुस लाल रंगात सजली

पहा डौलदार झुंबरे लटकती
पित वर्णी बहरला  बहावा
लाल  रंगात आकर्षक पळस
 कडुलिंब  शोभे हिरवा हिरवा

राने वने उपवने सारी
दावी विविध  सुमनांचे रंग 
येता सण रंगाचा
निसर्ग पण  रंगउत्सवी दंग


मोगरा जाई रातराणी गंधाळली
सुगंधाने आसमंत दरवळला
 बहरता आम्रतरुचा मोहर
आनंद देते कोकिळ कूजन जन मनाला

सहा ऋतूंचे सहा सोहळे
वसंताचे रुप च आगळे
बहरण्या  निसर्ग सृष्टीला वसंत
 तर ,नटण्यात नसे सृष्टी ला उसंत

वैशाली वर्तक 


भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच महाराष्ट्र राज्य
आयोजित उपक्रम १४५
विषय .. ऋतू वसंत


येता  ऋतू शिशिर
सुरू झाली पानगळ 
दिसती केविलवाण्या तरूलता,
भासे संपली निसर्गी हिरवळ.


पण, लागताच चाहूल वसंताची
पोपटी रंगी पर्ण चिमुकली .
तरूच्या सुक्या  फाद्यांना नटविता
काही तांबुस लाल रंगात सजली.



पहा , डौलदार झुंबरे लटकती
पित वर्णी बहरला  बहावा.
लाल  रंगात आकर्षक पळस
कडुलिंब  शोभे हिरवा-हिरवा

राने-वने, उपवने सारी
दावी विविध  सुमनांचे रंग 
येता सण  तो रंगाचा,
निसर्ग पण  रंगउत्सवी दंग.


मोगरा ,जाई ,रातराणी गंधाळली
सुगंधाने आसमंत दरवळला
 बहरता आम्रतरुचा मोहर
आनंद कोकिळ कूजनाचा मनाला ,


सहा ऋतूंचे सहा सोहळे
 पण, वसंताचे रुप च आगळे
बहरण्या  निसर्ग सृष्टीला, वसंत
 तर ,नटण्यात नसे सृष्टी ला उसंत

वैशाली वर्तक
अहमदाबाद


वसंत फुलला 

पीत वर्णात बहावा
डौलदार बहरला
निसर्गात पानोपानी 
पहा वसंत फुलला 


जणु भासती झुंबरे 
लाविलीत सुशोभित 
करी रंग उधळण
मन झाले  पुलकित 

वारा  तयांना झुलवे
डौलताती अलवार 
 भासे मोहक डौलणे
वा-याच्या  त्या  तालावर

निसर्गही साधतोय 
पहा रंगाची संगती
पीत फूले, हरित पाने
किती सुंदर दिसती

खरा जादुगार असे
दावी तयाची किमया
जसा बदलतो ऋतू  
  काव्य स्फुरे  वर्णावया.

वैशाली वर्तक






मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 
दि 25/3/25
विषय ... रंग वसंताचे
शीर्षक.. वसंत फुलला 

पीत वर्णात बहावा
डौलदार बहरला
निसर्गात पानोपानी 
पहा *वसंत फुलला* 


जणु भासती झुंबरे 
लाविलीत सुशोभित 
करी रंग उधळण
मन झाले  पुलकित 


वारा  तयांना झुलवे
डौलताती अलवार 
 भासे मोहक डौलणे
वा-याच्या  त्या  तालावर


निसर्गही साधतोय 
पहा रंगाची संगती
पीत फूले, हरित पाने
किती सुंदर दिसती

चाहूल ती वसंताची 
पाने डुले  चिमुकली .             
रूक्ष वृक्षा नटविण्या
 रंगी तांबूस सजली

खरा जादुगार असे
दावी तयाची किमया
 येता ऋतूची वसंत 
काव्य स्फुरे  वर्णावया.


वैशाली वर्तक
अहमदाबाद



शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

पाणपोई

वल्ड व्हिजन टाईम्स मधे प्रकाशित        

सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच 
आयोजित उपक्रम 
विषय...पाणपोई 

नाही सहन  होतोय
 गर्मी नि उन्हाळा 
होई अंगाची काहीली
वाटे यावो पावसाळा.

सूर्य ओकतोय आग
नाही जरा दया माया
भाजून काढी अंगाला
सारे जन शोधी छाया

ठेवा पाणी पक्षांना 
व्याकुळ होती तहानेने 
मिळता पाणी पहा कशी
भिरभिरती आनंदाने 

 
पथिकाची शमविण्या तृष्णा 
पाणपोई करा तयार 
पाणी पिऊन मिळे शांती
जल असे जीवन अपार 

गुरे शोधती निवारा
चारा सारा वाळलेला
ठेवा पक्षांना पाणी
उन्हाने जीव कासावलेला



वैशाली वर्तक
अहमदाबाद

लेख. अनुभुती

अनुभूती ही आपल्या विचारांना तसेच, आपल्याला विचार सरणीने म्हणा   वा  मनातील भावनांना ,आणि
 आपल्या विश्वासाला... श्रद्धेला,  जीवनात केलेल्या कामाची,  आपल्या इंद्रियांना जाण करून देणारी 
प्रक्रिया वा नकळत  घडणारा अद्भुत योग म्हणूया.   अनुभवावरून आपण तारतम्य काढू शकतो पण अनुभुती ही कदाचित नेहमीच्या अनुभवाने तयार झालेली दृढ विश्वासाने न घडणारी गोष्ट घडते व मनास आनंद देते. 
माणसाला कष्ट पडले वा  कष्टापेक्षाही दु:ख झाले ..... कठीण बाका प्रसंग आला.. तर लगेच आपण ईश्वरास स्मरतो. व त्याचा धावा करतो. व आपली श्रद्धा असतेच की देव नक्कीच मदतीस येईल . व त्या कठीण प्रसंगातून आपण तरून जातो . तेव्हा जो अनुभव आपणास भावनात्मक आनंद मिळतो. ती दु:ख दूर करणा-या देवाची आपणास झालेली सुखद अनुभुती होय.
       माझ्या मैत्रिणीला शिर्डी च्या साईबाबा वर खूप श्रध्दा. दर गुरुवारी ती साई मंदिरात जाणारच, घरी 
पण संध्याकाळी सांजवात करून गुरूवारी आरती प्रसाद ठेवणार. काही मनाजोगे होता शिर्डी ला पण जाणारच. ..असतो ना? काही लोकांचा पूर्ण विश्वास जणु की त्यांच्याच मुळे काम होत आहेत अशी मनी धारणा असते.
   असेच आम्ही तिच्या बरोबर  शिर्डी स गेलो.  खर तर शिर्डी हा प्रोग्राम मधे नव्हता ,पण इतक्या जवळ आलो आहोत तर दर्शन घेऊन जाऊ, हा तिचा हट्ट .  .सर्वांना माहीत च आहे .साई भक्त किती सारे आहेत. दर्शन घेणे फार वेळ घेणारे काम . आणि आमच्या जवळ वेळ कमी . भक्तांची गर्दी ,नेहमी प्रमाणे रांग च राग.जोडून सुट्टी आल्याने पण गर्दी फार होती. दर्शन कसे होणार या विवंचनेत आम्ही होतो.काय करायचे. असे विचार करत उभे असता एक स्वच्छ कपड्यात माणूस जवळ  आला. मैत्रीणीच्या नव-यास म्हणाला
 या दर्शन करायचय ना ?,
आम्ही हो म्हटले. 
त्याच्या मागे मागे गेलो. थोड्या वेळात मूर्ती समोर आलो. मूर्तीचे दर्शन घेतले. पण तो माणूस कुठे केव्हा गायब झाला कळलेच नाही .
 दर्शन घेऊन पुन्हा परतण्यास गाडीशी आलो  . मनात दर्शन घडल्याचा आनंद होता.
गाडी सुरू केली. गाडी ने वेग घेतला तर तोच माणूस दिसला. हसत मुखाने त्याने हात हलविला.
पुन्हा पहावे तर तिथे कोणी नाही. 
 माझी मैत्रीण म्हणाली पहा माझी तीव्र इच्छा होती व श्रध्दा पण आहेच  साई बाबांनी
आपल्यास दर्शन घडविले.
   तर ही असते अनुभुती ...दृढ श्रद्धा असेल तर कधी कधी अशी अनुभूती येते. व आपणास आपल्या मनातील भावना अजून दृढ करते.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 



अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...