खोपा
21/4/2024. चित्र काव्य
पाहूनी चित्र मी रमले
रमले, खोप्यातच मन
किती पक्षी हा कलावंत
कलावंत, तो सुगरण
पिले सुरक्षित राखण्या.
राखण्या, मऊ ते आसन.
कसा विणला पहा खोपा
खोपा ,तयार विना साधन
आणी तृण पाती चोचीने.
चोचीने गुंफली सुबक
केली येण्या जागा आत
आत, पहा मऊ बैठक
ईवले पिल्लू भिरभिरे
भिरभिरे, पहाण्या आई
आई दरडावूनी सांगे
सांगे, आतच रहा बाई
कुठलीही आई असो
असो, पक्षी वा मानवात
काळजी घेण्याची वृत्ती
वृत्ती, दिसते अभिजात
बहिणाबाईं काव्ये खोपा.
खोपा वर्णिलेला सुंदर
नसता हात बोटे तरी
तरी, विणीला मनोहर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा