शनिवार, २९ एप्रिल, २०२३

स्वप्न साकार करताना


साहित्य दर्पण कला मंच नागपूर
आयोजित उपक्रम क्रमांक ४०

विषय..स्वप्न साकार करताना
शीर्षक.. स्वप्न पूर्ती 

 मनात मी रंगविली स्वप्ने
 साकारताना  तया जीवनी
अनुभवले गोड कटू क्षण
घेतला आढावा मनोमनी

मनीच्या स्वप्नांची पूर्तता
झाली मज सहजीवनी
लाभली साथ सख्याची
आनंदले साकारता मनी

तडजोड काही स्वप्नांशी
 काहीची सहजच पूर्तता
मनी बाळगले समाधान
राखली कुटुंबी कार्य दक्षता


भाव  जाणिले सख्याने 
देत  मजला सदैव साथ
सप्त रंगी रंगलेल्या स्वप्नांची
 केली बरसात देता हाती हात


साकारणे स्वप्ने नसे कठीण
  स्वप्नात रंगणे आवडे खचित
वृत्ती विचारी  व समाधानी 
साकारण्या हवी हे उचित

वैशाली वर्तक
अहमदाबाद

आज्ञा

आज्ञा

शब्द उच्चारता आज्ञा
नजरेस येते बालपण
पाळावी आज्ञा मोठ्यांची
हीच मिळाली शिकवण

शालेय जीवनी झालो
 सदासाठी आज्ञांकित 
अर्ज करता वापरला
तोच शब्द सदोदित

 आज्ञांकित रामाने केले 
 वडिलांच्या आज्ञेचे पालन
 गेले वनवासात बारावर्षे
  न दाखविता कारण

   सध्या मात्र आईबाबा 
  पोरांना वागवितात जोडीने
   आज्ञा पालन आले संपुष्टात
  बाबा मुलगा लागती मैत्री ने

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

बाल कविता घड्याळ दादा

 अ भारतीय ठाणे जिल्हा समूह १

आयोजित उपक्रम 

बाल कविता 

घड्याळ दादा 



दिवस भर चालू टिकटिक

क्षणभराची न घेता विश्रांती

पहा या घड्याळ दादांचे

काटे सदोदित फिरत रहाती.


आहेत तीन पोरं दादांची

सेकंद मिनिट तास नावे

एक  आहे फारच आळशी

तासाभरात थोडासा धावे


सारखा काळ चालला पुढे 

 जग धावे याच काट्यावर

गेला क्षण न येती परतून

ध्यानी ठेवा हेच निरंतर


  शिकवण घड्याळ दादाची 

रहा सदा सेवेला हजर

 वेळ आहे सदैव अनमोल

जग नाचे माझ्या तालावर


  घड्याळ दादाची गरज

 भासते सर्व ठिकाणी

जन्म मृत्यू वा शुभ कार्य

 टिकटिक ऐकू येते कानोकानी


वैशाली वर्तक

अहमदाबाद

मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

चाराक्षरी घालमेल. पहाट वारा

रंग चाराक्षरीचे
आयोजित उपक्रम
विषय.. घालमेल 


घालमेल 
स्थिती कशी 
भयभीती
मनी  अशी

सुचेनासे
होई मना
 न उमजे 
क्षणो क्षणा

वर खाली
होई जीव
आठवे तो
सदाशिव 

विचारांचे
ते थैमान
विसरुन 
देह  भान    

घालमेल
 ही जीवनी
नको होई
मनोमनी

ठेवा मन
  सदा शांत
ठेवू नये
कधी भ्रांत


वैशाली वर्तक
अहमदाबाद


सूर्यौदय 


उठा उठा 
रवी आला
सूर्यौदय 
पहा झाला 

किती छान 
दिसे प्रभा
पाहण्यास
सदा ऊभा

वसुंधरा 
प्रकाशली
शलाकांनी
तेजाळली

तृणपाती
चमकती 
प्रकाशाने
उजळणी

रवी आणखी
नव आशा
दूर सारी
त्या निराशा

रान फुले 
उमलली 
हसूनिया
ती डौलली

दृश्य पहा
मनोहर 
सृष्टी दिसे
ती सुंदर




विश्व लेखकांचे!
आयोजित चाराक्षरी काव्य प्रकार 
विषय ...पहाट वारा
  शीर्षक.  प्रसन्नता 

येता रवी
संपे निशा
उजळते
नभी उषा

मंद थंड 
वाहे वारा
अंगी उठे
तो शहारा 

इवल्याश्या 
पानांतून 
कळी पाही
डोकावून 

पहाताच
अलवार 
फूल झाले 
हळुवार 

किलबिल
वाटे गोड 
रे मानवा
झोप सोड


शीत वारा 
गाई गाणे 
पहाटेला
ते तराणे


आसमंती
दरवळ
जाई दूर
 मरगळ

प्रसन्नता 
देई मना
 पहाटेचा
वारा जना

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

दारिद्रयाची भळभळ

लोकशाही विचार धारा हा मंच
आयोजित उपक्रम
दि २०\४\२३
विषय ... दारिद्रयाची भळभळ


देवा ठेव सर्वांना सुखी
संपवावी दरिद्रता ही आस
पोटा पुरते मिळूदे सर्वा
हेच मागणे तुजला खास

सर्व जन राहो आनंदी
मिळो  कष्टाची भाकरी
स्वकष्टाने व्हावे मोल
हीच ईच्छा सदा अंतरी


पाहूनी द्रवते मम हृदय 
दारिद्रयाची भळभळ
सारी तुझीच लेकरे असता
का रे दिसे रस्त्यावर तळमळ

किती करिता कष्ट जीवनी
नाही येती कष्ट फळाला
सल दारिद्र्याची  राही मनी
वाटे कधी येईल अंत दारिद्रयाला

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

चित्र काव्य कटपुतली

फुलोरा कलेचे माहेरघर 
आयोजित
एक पाऊल परिपूर्णते कडे
चित्र काव्य 

       

आहे वाखाणण्या जोगी 
बोटांच्या हालचालीची कला
उभा करी हुबेहूब प्रसंग
कटपूटली खेळ पाहू चला


नाना रंगी कापडांची
पहा बाहुली आकर्षक 
नटविली  दागिन्यांनी
दिसते चित्त वेधक.

कथानकाची चाले कथा
दोरीच्या बळावर पडद्या मागे
मनोरंजन होई जनांचे
करी हालचाल बोटांचे धागे

देव निर्मीत आपणही
आहोत बाहुल्या सारे 
संपण्या आधी येथील खेळ
उपभोगू जग न्यारे.


वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३

प्रवास जागा खिडकीची

मोहरली लेखणी साहित्य समूह

आयोजित उपक्रम 761

विषय..प्रवास 


होतो मनाला आनंद

उच्चारता शब्द प्रवास 

होते मनी नियोजन

सुखकर होण्या खास


खुष आहे मनातून

जागा मिळता खिडकीची

नाही गरज  सोबतीची

मजा लुटू निसर्गाची


धावू लागताच गाडी

नजर  पळत्या झाडांकडे

मोहविते हिरवळ मनास

वाटे निसर्ग किती पाहू गडे.


किती वेळ गेला तरी

उमजेना कधी क्षणाला

एका नंतर एक ठिकाण

जाता विरंगुळा जीवाला


आला संपत प्रवास

भानावर आली क्षणात

इच्छित ठिकाण येता

आनंदली ती मनात


वैशाली वर्तक

अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...