रंग चाराक्षरीचे
आयोजित उपक्रम
विषय.. घालमेल
घालमेल
स्थिती कशी
भयभीती
मनी अशी
सुचेनासे
होई मना
न उमजे
क्षणो क्षणा
वर खाली
होई जीव
आठवे तो
सदाशिव
विचारांचे
ते थैमान
विसरुन
देह भान
घालमेल
ही जीवनी
नको होई
मनोमनी
ठेवा मन
सदा शांत
ठेवू नये
कधी भ्रांत
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सूर्यौदय
उठा उठा
रवी आला
सूर्यौदय
पहा झाला
किती छान
दिसे प्रभा
पाहण्यास
सदा ऊभा
वसुंधरा
प्रकाशली
शलाकांनी
तेजाळली
तृणपाती
चमकती
प्रकाशाने
उजळणी
रवी आणखी
नव आशा
दूर सारी
त्या निराशा
रान फुले
उमलली
हसूनिया
ती डौलली
दृश्य पहा
मनोहर
सृष्टी दिसे
ती सुंदर
विश्व लेखकांचे!
आयोजित चाराक्षरी काव्य प्रकार
विषय ...पहाट वारा
शीर्षक. प्रसन्नता
येता रवी
संपे निशा
उजळते
नभी उषा
मंद थंड
वाहे वारा
अंगी उठे
तो शहारा
इवल्याश्या
पानांतून
कळी पाही
डोकावून
पहाताच
अलवार
फूल झाले
हळुवार
किलबिल
वाटे गोड
रे मानवा
झोप सोड
शीत वारा
गाई गाणे
पहाटेला
ते तराणे
आसमंती
दरवळ
जाई दूर
मरगळ
प्रसन्नता
देई मना
पहाटेचा
वारा जना
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा