शनिवार, २९ एप्रिल, २०२३

स्वप्न साकार करताना

साहित्य दर्पण कला मंच नागपूर
आयोजित उपक्रम क्रमांक ४०

विषय..स्वप्न साकार करताना
शीर्षक.. स्वप्न पूर्ती 

 मनात मी रंगविली स्वप्ने
 साकारताना  तया जीवनी
अनुभवले गोड कटू क्षण
घेतला आढावा मनोमनी

मनीच्या स्वप्नांची पूर्तता
झाली मज सहजीवनी
लाभली साथ सख्याची
आनंदले साकारता मनी

तडजोड काही स्वप्नांशी
 काहीची सहजच पूर्तता
मनी बाळगले समाधान
राखली कुटुंबी कार्य दक्षता


भाव  जाणिले सख्याने 
देत  मजला सदैव साथ
सप्त रंगी रंगलेल्या स्वप्नांची
 केली बरसात देता हाती हात


साकारणे स्वप्ने नसे कठीण
  स्वप्नात रंगणे आवडे खचित
वृत्ती विचारी  व समाधानी 
साकारण्या हवी हे उचित

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...