शनिवार, २० जून, २०२०

तुळस

 तुळस अष्टाक्षरी

   तुळस

शोभा वाढवी घराची
जेथे तुळस अंगणी
सदा राखते आरोग्य
जपा तिला मनोमनी

सांजवेळी लावताच
दिवा ज्योत वृंदावनी
 घरातून प्रसन्नता
राहे सदा मनातूनी

नाव घेता प्रसादाचे
 तुळशीचे हवे पान
होत नाही पूर्ण तोची
असा तिचा असे मान

जपताना पवित्रता
आरोग्यास गुणकारी
सर्दी खोकला पळवी
देई स्वास्थ्य घरीदारी

विठ्ठलाच्या शोभे गळा
 सदा तुळशीच्या माळा
आवडीने अर्पिलेल्या
दिसे सुंदर सावळा

वैशाली वर्तक


चित्र काव्य प्रौढ शिक्षण

उपक्रम
चित्र काव्य

बघा कशा ताई माई
मिळूनी अक्षरे गिरविती
मनी दृढ ईच्छा शिकण्याची
साक्षरतेची महती जाणिती

वयाचे नसते शिकण्या बंधन
असता मनी ईच्छा प्रबळ
प्रौढत्वातही होऊन शिक्षीत
करु उर्वरीत आयुष्य उज्वल


 नसे कमी पणा केव्हाही शिकण्यास
ठोठविले द्वार प्रौढ शाळेचे आता
होऊनी साक्षर दावु समाजास
शिक्षीत होऊ जाता जाता

शिक्षण सदा असे फायदेमंद
नको वाटे ते परावलंबी जीणे
साध्या सोप्या व्यवहारास्तव
नको दुजा ओंजळीने पाणी पीणे

म्हणूनच आलो सा-या मिळूनी
घेण्या शिक्षण प्रौढ शाळेतूनी
लावू एक एक साक्षर पणती
मिण मिणेल ती घरा -घरातूनी

वैशाली वर्तक

शनिवार, १३ जून, २०२०

गुलमोहर

सिद्ध लेखिका समूह आयोजित उपक्रम
काव्यलेखन
विषय-गुलमोहर
      *स्थितप्रज्ञ*
लालबुंद पाकळ्यात
उभा स्थित प्र ज्ञ जसा
टळटळत्या उन्हात
दावी जीवनाचा ठसा


साहूनिया तप्त झळा
उन्हाळ्यात बहरतो    
काय असते जगणे
सर्व जनास दावतो


थकलेल्या भागलेल्या
 जीवा देतोस दिलासा
दुःख सहून मगच
जगी सुखाचा खुलासा

 हर्ष दाटे पाहताच
वाटे मना क्षणभर
 पाहूनीया तो मोहर
दूर होईना नजर

लागे मनास वेडच
लालकेशरी रंगात
सर्वाहूनी वेगळाच
भासे आगळ्या ढंगात

वैशाली वर्तक

गुरुवार, ४ जून, २०२०

मानव झाला दानव

चित्र काव्य


***मानव झाला दानव**

असा कसा तू रे मानव
माणुसकी ला कसा विसरला
काय दोष त्या मुक जीवाचा
का त्याचा प्राण घातक ठरला

किती आनंदाने केले सेवन
झाला तयास मनोमनी संतोष
पण मग जळता मुख
सैरावेरा धावे होऊन बेहोष

नाही केला आक्रोश तयाने
लाही लाही झाली सर्वांगाची
दिसता पाणी भरले मुखात
धाव घेतली जलाशयाची


जीव वाचविण्या बाळाचा
शेवटी मातृत्व जपण्यास
पण मानव ठरला दानव
मुक जनावराचा जीव घेण्यास

मानवाने सोडला धर्म माणुसकीचा
काय मिळाले तयास मारुन
का खेळ खेळलास जनावराशी
मुक प्राण्याचा जीव घेऊन


वैशाली वर्तक

सोमवार, १ जून, २०२०

नव्या युगाच्या उंबरठ्यावर

नव्या युगाच्या उंबरठ्यावर


नव्या युगाच्या उंबरठ्यावर
टाकुया दृढ निश्चयाचे पाऊल
पळून जातील सारी संकटे
सर्वत्र भासेल यशाची चाहुल

जरी कितीही अंधारल्या रात्री
ग्रासती आहेत सा-या जगताला
 नक्कीच मार्ग मिळेल यातूनी
हिंमतीने पार करु संकटाला

मानवता हाची खरा धर्म
घासातील घास करुनी अर्पण
जाणूनी जीवनाचे खरे मर्म
नव्या युगात करु पदार्पण

विज्ञानाची धरूनीया कास
 नावे प्रगतीच्या नको निसर्ग -हास
लक्षात घेऊ पर्यावरण विकास
मनी राखूया सदा उत्कर्षाचा ध्यास


उत्तम संस्कार देऊनी बाळांना
पावले उचलण्या स्व-हिंमतीवर
उद्याचे पहातील उज्वल भाग्य
नव्या युगाच्या उंबरठ्यावर

वैशाली वर्तक

गणित जीवनाचे



























स्पर्धे साठी

गणित जीवनाचे

गणित विषय म्हटला की
उठतो पोटात  भयाचा गोळा
मग "गणित जीवनाचे "म्हणत
का  करिता आयुष्याचा चोळा- मोळा.

जीवन गाणे , हसत खेळत रमणे
अशा नावाने संबोधा की तयाला
मग, कसे आनंदी होईल आयुष्य
सदा मिळेल विरंगुळा मनाला.

आशा आकांक्षाची नकोच बेरीज
वाढविते उगाचच  दुःखाची घागर
शोधा सुख  समाधानी राहून
जीवनी अंती मिळे सुखाचा  सागर


ठेविले अनंते तसेची  रहावे
न  रचिता पर्वत मनोरथांचे
कर्मात सदा देवाला पहाता
सहज उकलेल गणित जीवनाचे

वैशाली वर्तक.
अहमदाबाद (गुजरात  

मी गणित तज्ञ कसे म्हणू
गणित विषयात नाही मती
 सदा समाधानी वृत्तीची बेरीज 
आयुष्यात मिळाली चांगली गती

खुराडे

खुराडे

सुरुवातीला नाही वाटले वावगे
रहा घरात म्हणण्याचे
पण जसे दिन गेले वाढत
कठीण झाले की जगण्याचे

नाही घरातून निघणे
सदा बसणेची घरात
खिडकीतून बाहेर पाहता
वर्दळ गर्दी नाही रस्त्यात

कसे रहात असतील
गर्दी गर्दीत एका खुराड्यात
नाही जागा मोकळ्याने   श्वासघेण्यास
तसेच काहीसे झाले घरा घरात

काय वेळ आणलीस रे देवा
सारेची बंद खुराड्यात
जसे कोंबड्यांना ठेवतात
एका बंदिस्त खोपट्यात

कधी संपेल हा कोरोना
पूर्ण दिवस घरात बसून
रहायचे घरकाम करत
जीव गेला आता ऊबून


 गेली नजर पाळलेल्या पोपटा कडे
  भासले मीच आहे पिंज-यात
पाहे तो केविलवाण्या नजरेने
पाडले मला विचारात

चित्र काव्य करू हितगुज

शब्द रजनी साहित्य समूह पुणे  चित्र काव्य  अष्टाक्षरी  शीर्षक  ... करु हितगुज  हात  हातात घेतला जाऊ समुद्र  किनारी मौज लाटांची पहात बसु बाळुत...