शनिवार, २० जून, २०२०

तुळस

 तुळस अष्टाक्षरी

   तुळस

शोभा वाढवी घराची
जेथे तुळस अंगणी
सदा राखते आरोग्य
जपा तिला मनोमनी

सांजवेळी लावताच
दिवा ज्योत वृंदावनी
 घरातून प्रसन्नता
राहे सदा मनातूनी

नाव घेता प्रसादाचे
 तुळशीचे हवे पान
होत नाही पूर्ण तोची
असा तिचा असे मान

जपताना पवित्रता
आरोग्यास गुणकारी
सर्दी खोकला पळवी
देई स्वास्थ्य घरीदारी

विठ्ठलाच्या शोभे गळा
 सदा तुळशीच्या माळा
आवडीने अर्पिलेल्या
दिसे सुंदर सावळा

वैशाली वर्तक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...