सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९

चाराक्षरी पांडुरंग

उपक्रम
पांडुरंग

जिथे तिथे
पांडुरंग
भजनात
सारे दंग         1

पांडुरंग
तुची देवा
सदा घडो
तुझी सेवा       2
      

नित्य  घ्यावे
विठू नाम
होती सारी
पूर्ण  काम       3

विठू माझा
नयनात
देई सुख
जीवनात     4

पांडुरंग
विटेवरी
हात सदा
कटी वरी        5

काढा दृष्ट
माऊलीची
घाई झाली
दर्शनाची        6

लागे मज
एक आस
दर्शनास
आले खास          7

आस मनी
दर्शनाची
पांडुरंग
पहाण्याची    8

वैशाली वर्तक

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

गोष्ट एका लग्नाची (विस्तृत लेख)

गोष्ट एका लग्नाची
नोकरी निमित्त मुंबई सोडून दुसऱ्या गावात जावे लागले . नवे शहर.पण ओळखीच्याकडून माहिती काढली....मराठी विस्तारात एक गेस्ट हाऊस आहे ....मराठी वस्ती व मालक पण मराठी .....मी तेथे रहावयास गेलो. गेस्ट हाउस चा मालक गप्पीष्ट..रोज आजुबाजुच्या रहाणा-या लोकांची माहिती देई . " ही बाजुला रहाते ना ! ती नर्स आहे . दिसायला सुरेख आहे बर का! "आणि ,"ती... अगदी समोर रहाणारी ...उभी आहे बाहेर कामात..हुशार आहे ..सर्वीस पण छान आहे ..चार चौघीत उठून दिसणारी आहे..... पण जरा गर्विष्ट आहे.. ..आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे , " तिचे वडिल शिस्तीचे .अहो rss विचाराचे. जरा मुली कडे नजर केली तर दणकाच पडेल . तसे प्रेमळ आहेत. महाराष्ट्र समाजात पण कार्यकारी मंडळात आहेत. दरारा पण आहे त्यांचा." गेस्ट हाउस मघे आम्ही बाहेर गाव ची आलेली मंडळी एकत्र व्हायचो . रोज मालकाच्या गप्पा ऐकायचो.. तो रंगून सांगायचा व आम्ही ऐकायचो. सहज आमच्याच शर्यत लागली ... कोण आहे ही एवढी अक्कड. गर्वीष्ट ....चला ...तिच्याशी जो बोलून दाखवेल त्यास 500रु.मिळणार.. हो त्या वेळी 500 फार मोठी रकम होती. मी पण तयार झालो. ...लागली शर्यत. आमच्या घरा कडे म्हणजे गेस्ट हाउस कडे येतांना तिचे घर आधी यायचे.. त्यामुळे तिच्या घरावरून च पुढे यावे लागे...सहज येता जाता नजरानजर होई ..पण मालकाने सांगितले शब्द कानीं येत . ओसरीत तिचे वडिल व ती , बाजेवर संध्याकाळी बसलेले असत... .कधी भाऊ बहिण, तर कधी आई वडिल ..नेहमी दिसायचे ,जणु तिचे गार्डच असायचे .त्यामुळे तिच्याशी बोलायचे कसे होणार .. व काय बोलणार ..हा सदा प्रश्न च होता. तशी मुलगी खरच छानच होती. आकर्षक ..व खरच स्वतः च्या तो-यातच असायची. मी सहजच आमच्यातील दोन जणांना घेउन.. वडिल व ती ओसरीत बसली असता गेलो.... ,पण.. लगेच ति-हाईक व्यक्ती आल्याने ती उठून आत गेली . मी बोलणे काढले ....सुरु केले की, "आमच्या मालकाने सांगितलं की आपण समाजात कार्यकारी मंडळात आहात ...आम्ही बाहेर गावचे... आम्हाला सभासद होता येईल का ?" वडिलांशी निमित्त काढून बोलणे झाले. मग त्या गावात बाजार कुठे ? पहाण्याची ठिकाणे कोणती? अशी विचार पूस करुन ..सहजता बोलण्यात दाखविली व परत रुम वर आलो. पण बाकीची मंडळी म्हणाली यात मुलीशी तर बोललाच नाहीत.. .....शर्यत तिच्याशी बोलण्याची आहे. झाsssले. परत दोन दिवसांनी वडील व ती बसली असता मी एकटाच गेलो. ती नेहमी प्रमाणे उठून आत गेली.... मग मी स्वतःच , मी कुठला ..नोकरी कुठे... वगैरे सांगून . बोलणे वाढविले व सहज विचारले .की, ,"तुमची मुलगी बँकेत आहेना सर्वीस ला.? कारण माझा एक मित्र येथे बदलून आला आहे .तो त्यांच्याच बँकेत आहे का ? " तिच्या बाबांनी तिला बाहेर बोलविले तर ती उत्त्तरली ,"माहीत नाही... स्टाफ मोठा आहे .पूर्ण नाव माहीत पाहिजे. म्हणत आत निघून गेली .आज तर मी शर्यत दोन वाक्य का होईना बोललो. व . जिंकलो होतो तिच्याशी बोलून ..सरळ रुम वर येउन बाकी मंडळींना सांगितले की मी पैज जिंकलो आहे. पण या पैज जिंकण्यात मला पण ती आवडू लागली होतीच. व तिच्या बाबांशी म्हणजे वडिलांशी वारंवार बोलून माझी पण माहीती देउन मी लग्नाच्या बाजारात उभा आहे ची कल्पना दिली .व त्यांना पण माझ्यात ..त्यांना जावई जसा हवा होता तो मिळतोय याची मला अंधुकशी . कल्पना आली...मुलगी आई वडिलांच्या कह्यात होती. ते जे दाखवतील ते तिला पटणारे होते. व माझे व्यक्तीमत्व पण तितकेच होतेच की पसंत पडण्या सारखे.. असे होत शेवटी .पुढे पुढे....ती पण मी कधी आलो की एकत्र बसू लागली कारण आता गोष्ट .....बोलणी साखर पुड्या पर्यंत आली होती. सहज मी विचारले ,जायचे का शनिवारी सिनेमाला. दोन तिकिट आणली आहेत ..तर वडिलच आधीच म्हणाले नको .साखर पूडा होउ दे. आज तिकीट आहेत तर माझा मुलगा ....तिचा भाऊ वाटले तर येईल.....जरा तुमच्या सम वयस्करांच्या गप्पा पण होतील व ओळख वाढेल. . .मी नाईलाजाने ..होsss हो ssचालेल की करत निघालो. पुढे सर्व बोलणी साखरपुडा पार पडला व यथा सुमुहुर्तावर लग्न पण पार पडले व आज सुखाचा संसार चालू आहे .तर अशी गंमतीदार ... मेरे सामने वाली खिडकी ची.... गोष्ट एका लग्नाची

गोष्ट एका लग्नाची ( प्रसंग )

बरsss झाले वाङनिश्चय आदल्यादिवशी झालेला होता...... हो पुण्यास साधारण पणे आदल्या रात्री करतात. एक दिवस अगोदर हाॕल घेतलेला असतो.... मुंबईत काय !.. एका दिवसात लग्न आटपते.... सकाळीच वाङनिश्चय ...मग लग्न ... .... आणि एका बाजूस आॕफीस मंडळी ची जेवणे .... दुस-या बाजुला लग्न लागल्या नंतर चे विधी. .....की झाले , ...संपले लग्न... पण आमचा वाङनिश्चय लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळीच छान व्यवस्थित पार पडला . वाङनिश्चया नंतर व्याही भेटी चा कार्यक्रम झाला .दोन दिवस हाॕल घेतला होता. आदल्या दिवसा पासून लग्न गाजत होते. . ..पाहुणे मंडळी गावातली होती ती घरी झोपायला गेली ,पण ...बाहेर गावाहून आलेले नातेवाईक हाॕलवरच थांबले होते. त्यांचे मस्त गप्पा टप्पा ..हास्य विनोद चालले होते. आम्ही मात्र घरी झोपायला गेलो. घरी गेल्या गेल्याच बहिणी ने ," चला लवकरच झोपा ....उद्या सकाळी उठून जायचय. सर्वांच्या अंधोळी वेळेत झाल्या पाहिजेत . " असे उवाच्य केले. उद्या ची बॕग प्रत्येकाने नीट तपासून घेतली . हवे ते कपडे प्रसंगानुसार बदलण्याचे घेतले आहे ना..? पुन्हा एकदा चेक केले. व.... झोपण्यास गेलो. सकाळी लवकर उठून तयार होऊन देवास नमस्कार करुन निघालो. त्यावेळी माझी (आमची ) स्वतःची गाडी नव्हती. तेव्हा कुठे इतकी आर्थिक परिस्थिती .... गाडी स्वतःची असण्याची.... पण बहीणीला तिचे ओळखीचे स्नेही ...जोशी यांनी लग्नासाठी... गाडी ड्रायव्हर सह दिली होती. सकाळी निघालो.. आमच्या जवळ मुलीला देण्याचे दागिने तशीच आईच्या व ताईच्या दागिन्या ची जोखमी बॕग होती. ... ..अर्धे अंतर आलो असू , तर गाडी तिचे रुप दाखवू लागली .तशी गाडी नुकतीच गॕरेज मधून सर्वीस करुन आणलेली होती. पण मग त्या गाडीत काय प्रोबलेम होत आहे कळेना. ...काय माहित...मधेच आचके देत थांबायची. थोडा वेळ असेच चालले. जवळ सोने नाणे त्याचे टेंशन..आणि वेळेवर लग्नास पोहचण्याचे टेंशन मनात सुरु झाले. घरी जरी गाडी नव्हती तरी मी गाड्या हाताळल्या होत्या.. स्वतःला mechanical मधे रस होता.व आहे . स्वतः mechanical engeer तसेच आटोमोबाईल चे पण ज्ञान होतेच. व शिक्षण पण घेतले होते. आई बहिण.... गाडी चालू होईना म्हणून चिंतेत पडल्या ..कसे लवकर पोहचणार ...बर त्यावेळी फोन... मोबाईलस् तर नव्हतेच ... तो ड्रायव्हर प्रयत्न करत होता. मधे कुठेच गॕरेज पण दिसत नव्हते. की ,...जिथे गाडी दाखवावी. शेवटी मीच ..बाह्या वर चढवून ... गाडीत काय प्रोबलेम तो पहावयास घेतला. ज्याचे 2/3 तासावर लग्न ....अन् तो 'मुलगा काय करतोय ?..तर गाडी दुरुस्त करतोय ....क्षणभर वाटले उगाच रात्री घरी झोपण्यास आलो. त्यापेक्षा तिकडे हाॕलवर झोपलो असतो तर बरे झाले असते. मस्त हाॕलवर झोपलो असतो ..मित्रां बरोबर शेवटीची बॕचलर लाईफ ... हसी मजाक मधे घालविली असती ..पण आमच्या ताई बाई यांनी नको ...चला घरी चा हट्ट धरला ...असो. शेवटी गाडीचा प्रोबलेम कळला .इंजीन गरम होत होते ...गाडी मधे एखादी मोठी रिकामी बाटली पण नव्हती .... की कुठून पाणी आणावे. तेवढ्यात कुठेतरी construction चाललेले दिसले . ...तेथे ड्रायव्हर ला पाठवून पाणी मिळविले व कशी तरी गाडी सुरु झाली . व हाॕलवर पोहचलो .तेव्हा कुठे हाश झाले. लगेच fresh होऊन दुसरे कपडे चेंज करुन आलो. पण हाॕलवर पोहचलो तर सारे नातेवाईक माझे रुप पाहून विचारात पडले.. हात काळे ..घामाघुम .कपड्यास पण गाडीच्या बोनेटचे डाग... हा लग्न मुलगा ? प्रश्न पडला. मुलाची आई व बहीण पण घामाघुम ... त्यांच्या सर्व मेकअप ची वाट लागलेली. माझ्या पायावर सासुरवाडीच्या लोकांनी दुध पाणी टाकून ....औक्षण वगैरे आटपले. आई व ताई पण फ्रेश होण्यास पळाल्या.. कारण लग्न मुहुर्त साधला पाहिजेना ..आपल्यात मुहुर्ताला महत्व असते. उष्टी हळद मुलीच्या रुम वर पाठवली .ती मंडळी तेथेच रात्री राहिली होती. तिचे पण पटपट आटपते केले. गुरुजी म्हणाले हरकत नाही आपण वैदिक पध्दतीने करु. प्रत्यक्ष लग्न विधीचा मुहुर्त आधी साधूया....मग नंतरचे विधी..... असे म्हणत एकदाच्या लग्न मुहुर्तावर मी बोह-यावर चढलो. आणि मुहुर्तावर माझ्या डोक्यावर अक्षता पडल्या.. व लग्न संपन्न झाले.

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

पाठीराखा माझा विठूराया

उपक्रम
ओळ काव्य
पाठीराखा माझा विठूराया
--------------------------------
दृढ विश्वास असे विठूवर
पाठीराखा माझा विठूराया
तोचि माझा  असे सदा श्वास
मजवरी त्याची सदा छत्र छाया
छाया करी तो जगतावरी
असे तो जगताचा पालक
नसावी चिंता उरी कधी
तोची सा-या विश्वाचा मालक
मालक जरी असे विठू

दया दावितो सर्वांसाठी
असता तयाची कृपादृष्टी
भय नुरते , तो उभा  पाठी

पाठी राखा माझा विठू
किती वर्णू तव गुण गाथा
शरण मी तुला विठूराया
तुझिया चरणी ठेवितो माथा

वैशाली वर्तक...8/11/2019

नशीब

 
     
      साप्ताहिक काव्य उपक्रम      
                     
                        **विषय ---   नशीब **
     
            असेल हरि तर देईल खाटल्यावरी
            म्हणत, निवांत विसंबतो नशिबावरी 
            पण ,नशीब -नशीब म्हणजे तरी काय ? 
            यशाची  प्रयत्ना अंती मिळणारी खाण हाय.

            न करिता शिकस्त प्रयत्नांची 
           होते का कधी नशीबाची साथी
          परिश्रमाने घडवावे लागते नशीब, 
           मग मिळे शाबासकी, ती नशीबा-माथी.

          कधी कोणास मिळते चिमूटभर
           तर कोणास मिळते ओंजळभर 
           ते तर असते, संचित कर्माचे-फळ, 
          तया लागे गंगाजळी, सत्कर्माचे बळ

           म्हणती वृषभ रास , असे नशीबवान, 
           चुकले का तयांना ,दुःखाचे पहाड. 
           देवत्व पावुनही , कृष्ण अन् रामाला
           सुटली नाही दुःखाच्या नशीबाची धाड


           नैसर्गिक आपत्तीत माणसे दगावतात 
           कधी बालके वाचतात कृपेने देवाच्या 
           तिथे म्हणावा खेळ असे नशीबाचा 
           न करिता कयास जीव वाचण्याचा

           घडायचे ते घडणार , ते नाही चुकणार 
           विश्वास हवा बाहुवर, नको हस्तरेखांवर 
           अन् ठेवावी सदा दृढ श्रध्दा देवावर 
          मग नशीबाने होते कृपा-दृष्टी, आपणावर.
       
         वैशाली वर्तक.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

अष्टाक्षरीजिजाऊ माता/ अष्टाक्षरी..राजमाता जिजाऊ


........... धर्म योध्दा पेपरात 22/2/25

           कर्तृत्ववान  महिला  माता जिजाऊ


      आठविता शिवरायांचे प्रताप

      उभे रहाते माता जिजाऊंचे मूर्तीमंत  रुप

      तुजला कर्तृत्वान  मातेचा सदा किताब

      दिधलात तुम्ही पूत्र शिवबा ,अवध्या महाराष्ट्रास.


      शिवारायांनी स्थापिले हिंदवी स्वराज्य 

      तव कृपेच्याच शिकवणी प्रसादानं

      शिवराय  झाले "शिव छत्रपती "महान

      तुझेच कर्तृत्व  झाले बिंबीत तयात.


      महाभारत-रामायणातील ,कथा सांगूनी 

      जिजाऊंनी रुजविलेत,  संस्कार  तयांचे मनीं

      धर्म , दया , समभावाच्या  देऊनी शिकवणी

      बाळकडू पाजियले शिवबांना बालपणी.


      धडे घेऊन शूर वीर लढवैय्यांचे 

      तयार केलेत, सवंगड्यांचे शिवबांनी शूर  मावळे 

      जे होते  तयांना , प्राणाहून प्रिय असे

      लढण्यास सदा तत्पर असती, बलीदानाते.


      परस्त्रीला देऊन मातेचा मान 

      परत दिधली , सन्मानाने कल्याण सुभेदारांची सून

      स्त्रियांचा  सदा राखिला मान सन्मान

      हीच शिकवण तुमची "जिजाऊ माते," महान.


      तव स्फूर्ती ने केलेत गड सर 

      अद्दल घडविली शाहिस्तेखानास

      एक- एक करूनी ,जिंकला सिंहगड पण

      अन् मराठे शाहीचा फडकविला ध्वज.


     जिच्या हाती पाळण्याची दोरी 

     ती जगताते उध्दारी

     हीच  म्हण खरी ठरविली

     "जिजाऊ राजमाते" तुम्ही तुमच्या कर्तृत्वानी.


                        ...............वैशाली वर्तक




अभा  ठाणे जिल्हा समूह 1

राज्य स्तरीय  अष्टाक्षरी  काव्यलेखन स्पर्धा

12/1/22

विषय - राजमाता जिजाबाई

       *कर्तृत्ववान माता*

      

नाव घेता शिवबांचे

जिचा पूत्र यशोवंत

राजमाता जिजाबाई

रूप दिसे मूर्तीमंत             1


धर्म  दया समभाव

दिल्या सदा शिकवणी

बाळकडू पाजियले

शिवबांना बालपणी    2



गिरविले बालपणी

तव कृपा प्रसादान

कथा शौर्याच्या ऐकून

राजे घडले महान      3


सारे केले गड सर

ध्वज हिंदवी राज्याचा

तव स्फूर्तीने चढला

छत्रपती शिवबांचा          4



राजमाता जिजाबाई

दाखविली म्हण खरी

हाती पाळण्याची दोरी

तिच जगता उध्दारी         5



वैशाली वर्तक 

अहमदाबाद


भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच महाराष्ट्र राज्य आयोजित काव्य लेखन स्पर्धा 

विषय .. कणखर स्री 

शीर्षक. कर्तृत्ववान स्त्री 

 

नाव घेता शिवबांचे

जिचा पूत्र यशोवंत

राजमाता जिजाबाई

रूप दिसे मूर्तीमंत             1


धर्म  दया समभाव

दिल्या सदा शिकवणी

बाळकडू पाजियले

शिवबांना बालपणी    2



गिरविले बालपणी

तव कृपा प्रसादान

कथा शौर्याच्या ऐकून

राजे घडले महान      3


सारे केले गड सर

ध्वज हिंदवी राज्याचा

तव स्फूर्तीने चढला

छत्रपती शिवबांचा          4



राजमाता जिजाबाई

दाखविली म्हण खरी

हाती पाळण्याची दोरी

तिच जगता उध्दारी         5



वैशाली वर्तक 

अहमदाबाद


बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

चाराक्षरी कथा आधारित

चाराक्षरी  कथाआधारित

रानीवनी
झाडावरी
घरटे ते
पहा तरी

सुबक ते
विणलेले
पिल्लू आत
झोपलेले

चोचीतून
आणियला
दाणा पाणी
देण्या पिला

सायंकाळी
परतली
कोटरी ती
न दिसली

झाडाखाली
पडलेली
कोटरी ती
मोडलेली

कुठे गेली
माझी  पिले
आत्ता तर
दाणे दिले

कुठे शोधु
कोणी नेली
माझी पिले
कुठे गेली

अजूनही
पाखरास
पिलांची त्या
मनी आस


वैशाली वर्तक

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...