उपक्रम
पांडुरंग
जिथे तिथे
पांडुरंग
भजनात
सारे दंग 1
पांडुरंग
तुची देवा
सदा घडो
तुझी सेवा 2
नित्य घ्यावे
विठू नाम
होती सारी
पूर्ण काम 3
विठू माझा
नयनात
देई सुख
जीवनात 4
पांडुरंग
विटेवरी
हात सदा
कटी वरी 5
काढा दृष्ट
माऊलीची
घाई झाली
दर्शनाची 6
लागे मज
एक आस
दर्शनास
आले खास 7
आस मनी
दर्शनाची
पांडुरंग
पहाण्याची 8
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा