रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

अपेक्षा

                                                            अपेक्षा 
          जन्मास जसा येतो मानव 
          पडे  गळा , अपेक्षांची माळ 
          स्व अपेक्षा पूर्ती साठी,पालक 
          पाल्यावरती ,लादती भार सदाकाळ .

          बाल्य इच्छांना घालूनी  मुरड 
          चढा ओढी पायी ,पालक 
          हिरावूनि घेती , तयांचे बालपण  
          कधी आनंदाने खेळणार बालक

          जरी करिती कर्म अविरत 
          अपेक्षा विरहित  हवे आवश्य
         होता तयांचा , आकांक्षा भंग 
         पदरी पडते , नुसते नैराश्य .......

         समाधानाची मनी , खेचता लकेर 
        अपेक्षा  पूर्तीची नसे गरज
        कामात  न भासे , निरुत्साह 
        जोमाने कर्म होते सहज

        अपेक्षा सुवर्ण पदक प्राप्तीची 
         करतील सारे सदा यशाची
         तणाव न  घेता , तिने साकारावी 
         हीच अपेक्षा असावी , सदिच्छांची ......

         स्वच्छ  भारत व मेक इंडिया 
         आहेत मोदीजींच्या अपेक्षा 
         प्रयत्नांची  करू पराकाष्ठा 
         नागरिकांची हीच खरी परीक्षा.......

बुधवार, २७ जुलै, २०१६

nivaant क्षणभर थांब

                                                                   निवांत
        जून महिना होता. आकाशात काळे ढग गर्दी करू लागले होते . थंडगार वारा व पावसाने  दर्वळेला मातीचा सुगंध  जीवास प्रसन्न करत होता . वातावरण पण कसे आल्हादकारक भासत  होते .राधिका ऑफिस मधून परतत होती.  रस्त्यात चालतांना समोरच्या बाल्कनीत आजी व आजोबा खुर्च्या टाकून चहाचा एक- एक घोट घेत गप्पा करीत निवांतात बसलेले होते . राधिका मात्र पटपट पावले उचलत घराकडे धांव घेत होती . दिवसभराच्या दगदगीने थकलेली होती . तिला क्षणभर त्या निवांतात बसलेल्या आजी आजोबांचा हेवा वाटला .  थंड गार  वारा , हातात चहाचा कप , आजूबाजूला हलणारी झाडे , आकाशातील ढग, पंख पसरून उंच आकाशात  विहंग करणारे पक्षी  पहात निवांतात कसे  क्षण घालवीत आहेत ना !
       राधिका घरी आली . घरात येऊन मुलांचे व स्वत:चे ,चहा पाण्याचे पटकन आटपून रात्रीच्या जेवण्याचे  पाहू लागली . नवरा आल्यावर रात्रीची जेवणे आटपून बिछान्यावर आता निवांत पडली.   पण हा निवांतपणा म्हणजे  थकलेल्या  शरीरास विश्रांती देणारा निवांत क्षण होता . मानसिक विश्रांती तो खरा निवांतपणा . असे विचार करता करता राधिका निवांताच्या विचारात मग्न  झाली. व झोपी गेली.
      खरच ! आयुष्यभर  आपण नुसते भरघाव गतिने जीवन जगत असतो, नाही का? व त्या जीवनात आपण आनंद ,सुख शांती मिळावी याचा अतोनात प्रयत्न करत असतो . जीवाचा आटापिटा करत असतो .पण खर पहिले  तर  आनंद  काय, सुख , शांति  काय ,ही तर त्याच्या मनांतच दडलेली असतात.  मनांत नीट डोकावून पहिले तर हे सर्व त्याला त्याच्या मनाकडूनच मागितले  गेले  असते  वा इच्छित , अपेक्षित असते.व  आपले मन ते आपल्याला देऊ पण शकते व देत पण असते . पण आपली,प्रत्येक  माणसाची मानसिक भूक, गरज, वा तृष्णा असते ती निवांतता मिळवण्याची . तो निवांतपणा प्रत्येकास हवा हवासा वाटतो . रोजच्या चाकोरीतून सुटकारा  मिळवून  निवांत क्षण  मिळवण्याचा प्रयत्न करतो.त्यासाठी बरेचदा 10/15 दिवस  बाहेर जाऊन रोजच्या रुटीन मध्ये  बदल  करून पुन्हा रुटीन आयुष्य जगण्याने ताजे तवाने  होतो . त्या बदलात  निवांतता आपण मिळवू शकतो.
     ह्या निवांताची गरज पशु पक्षामध्ये  पण पहावयास मिळते . पक्षी  आकाशात मजेत विहार करतांना , मजेत दाणे  टिपतांना दिसतात . चिमण्या  अथवा इतर पक्षी मातीत वा पाण्यात पंखांची फडफड करतांना दिसतात. गुरे नाही का झाडांचा आडोसा शोधून निवांतात रवंथ करतांना आढळतात . ते पण निवांतपणा  मिळवतातच ना ! इतकेच काय सृष्टी कडे पहा.सूर्य दिवस भर प्रकाशमान होऊन  संध्याकाळी  आपल्या  तत्प किरणांना शमवून सृष्टिच्या  कुशीत, डोंगराच्या आड , सागर काठी अस्ताला जातो. जणू काही तो पण निवांतता  मिळवू पाहतो. वनस्पतींची पाने पण मिटतात .  संध्याकाळी  पक्षी पाखरे  आपल्या कोटरा कडे कडे गुरे आपल्या निवा-याकडे धाव घेतात .
     शालेय जीवनातील W.H.Divies यांची कविता आठवते.  
       what is this life full of care
      we have no time to stand and stare .
    आयुष्य नुसते  चिंता काळजी मन:स्तापाने  भरलेले असेल , तर त्या जीवनाचा काय अर्थ? आपल्या आजूबाजूच्या   सृष्टीत , निसर्गात,  नव- नवीन ऋतु प्रमाणे होणारे बदल पहावयास हवेत . आपल्या भोवतालची  झाडे, वेलीत ऋतूप्रमाणे होणारे बदल ,वसंतातील बहरणारी   झाडे, त्या पानांचा बदलणारा हिरवा पोपटी रंग , सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील बदलते रंग , वर्षा  ऋतूतील ढगांनी भरलेले आकाश  व त्या ढगांचे बदलते आकार ,तळ्याच्या पाण्यात उठणारे तरंग ,फेसाळलेला समुद्र ,हे सारे पहावयास हवे नुसते भरधाव  गतीने जगणे हे जीवन जगणे नव्हे .म्हणूनच W.H.Divies
     A poor life this if ,full of care
    we  have no time to stand and stare
        तेव्हा निवांतपणा ,फुरसत मिळ्त  नसते .तर  तो मिळवावा लागतो .व हा निवांतपणा मिळाला की माणसाची  मानसिक  तृष्णा   शमते  व   मनास  नवीन  उभारी  , हुशारी मिळते.




विषय - क्षणभर थांब 

     *निवांत*
किती पळशील
 सदा जीवनात
क्षणभर थांब
जरा निवांतात      1

बघ उगवता
सूर्य  गगनात
निहाळ तयाच्या
प्रभा आनंदात       2

पहा झुळुझुळु
वाहे तो निर्झर
 निनाद ऐकण्या
थांब   क्षणभर      3

सांजवेळी बघ
नभातील पक्षी
किती मनोहर
दिसतेय नक्षी        4

येता रवी  नभी 
कळ्या अलवार
फुलूनी डौलती
 फुले  हळुवार       5

बघ ही किमया
पहा  खरोखर 
क्षणभर थांब
आहे मनोहर          6
 

वैशाली वर्तक

बुधवार, २० जुलै, २०१६

नाती शृंखला

                                                           नाती शृंखला   
 मी माहेरी आले होते .मैत्रिणींना भेटणे वगैरे झाल्यावर एक दिवशी जुन्या कपाटा-कडे गेले. जेथे माझ्या जुन्या वस्तू ठेवल्या होत्या . त्या कपाटात हुसका हुसकी करता  एक डबा मिळाला .ज्यात चिमुकला संसार लिहिलेला खोका होता. मी लगेच तो उघडला . तर त्यात माझी बालपणीची खेळ बोळकी मिळालीत. मी अधीरतेने सर्व खेळणी बाहेर काढून त्यावरून हात फिरवू लागले.  तो तवा ,तो कुकर , चिमटा ,शेगडी सर्व तसेच होते. त्यावरून हात फिरविता फिरवता  मला बालपण डोळ्या समोर आले . त्या खेळा  बरोबर मी दिवसाचे किती तरी तासन तास खेळले होते. माझी मामे बहीण  स्नेहा पण यावयाची. आम्ही  दोघी मिळून आईच्या साड्या नेसून ,  नेसून कसल्या गुंडाळून खेळायचो.  मग मी आईच्या भूमिकेत  शिरावयाची व आई ज्या प्रमाणे बोलते  तिच्याच पध्द्तीने , आटपा लवकर  मला ऑफिसला जावयास उशीर होत आहे, किती कामे बाकी आहेत वगैरे तिची वाक्ये बोलायची . आज आता आम्ही दोघी आपापल्या संसारात रमलो आहोत .
       खरच, आई माझ्या साठी किती करावयाची, सतत  आमच्या मागे पुढे असावयाची . आई शिवाय क्षणभर पण करमायचे  नाही . लहान पणी मी, तशी म्हणे रडकीच होते. आई जरा दिसली नाही तर झाले.  संपले. रडून गोंधळ  घालायची. सर्व जण मला आईचे शेपूट म्हणून चिडवावयाचे . कित्येकदा तर आई पोळ्या करताना मला तिच्या जवळ दुपट्ट्याने बांधून ठेवावयाची . पुढे मला भाऊ पण झाला . बहीण- भाऊ या नवीन नात्यात बांधले गेले . त्याच्या बरोबर खेळण्यात, मस्ती करण्यात , भांडण्यात वेळ जावयाचा . आमच्या शेजारीच आमची आत्या रहावयाची . आई ऑफिसला जातांना शेजारच्या मावशींकडे आम्हास ठेवायची . पुढे शाळेतून आल्यावर आम्ही त्या मावशीं  कडे खेळावयाचो. व.  आई येताच तिला बिलगावयाचो  .
         हळू हळू मी व भाऊ मोठे झालो. मोठे होताना आई बाबा , आत्या , शेजारच्या मावशी  याशिवाय  आमचे पण वेगळे मित्र मैत्रिणींच्या नात्याचे   नवे वर्तुळ तयार होत गेले . मनुष्य जन्मास येतो त्याला तीन जणांचे ऋण असते . पाहिले आई बाबा तसेच नातेवाईक जे त्याच्या आगमनाची वाट पाहत असतात व समाज ज्यात आपण वावरतो, मोठे होतो. तेव्हा माझे पण तसेच झाले. या नात्याच्या गोतावळ्यात अडकत गेले. पुढे शालेय , महाविद्यालयाचे शिक्षण संपवून मी  नवीन नात्यात , संसारात गुरफटले . त्यामुळे अजून नवीन नात्याचे अनेक पदर वाढत गेले . पती, सासू- सासरे, दीर, नंणद, जाऊ, भाचे अशी अनेक   नात्यांची गुंफण वाढत गेली. व लहानपणी भातुकली खेळणारी मी ,ख-या आई व मुलीच्या नात्यात पदार्पण  करती  झाले .  तासन तास घर घर खेळणारी आता प्रत्यक्षात आईच्या भूमिकेत येऊन ठेपले. गोंडस मुलीची आई झाले. तेव्हा मला  तीव्रतेने आईची आठवण झाली. आई म्हणते, त्या प्रमाणे तिने किती रात्र रात्र माझ्या साठी  जागून  काढल्या असतील , मोठे करताना तिला किती कष्ट झाले असतील याची जाणीव झाली. प्रत्येक आई आपल्या पाल्यांवर जिवापार प्रेम करतेच . तसेच माझे झाले आहे. . मला पण दोन गोंडस मुली झाल्यात . त्यांना गोंजारण्या . मोठे करण्यात , वाढविण्यात, त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्यात दिवस जात आहेत . जे काही आपल्यास  नाही मिळाले ते सर्व मुलींना मिळावे यात मी लक्ष देत आहे. कधी तरी एखाद गोष्टींकडे लक्ष देण्यात कमी पण पडते.  कारण नौकरी करून घरदार, पै- पाहुणे,येणारे - जाणारे , सर्व पहात संसार सांभाळणे , म्हणजे तारेवरची कसरत असते, पण माझा जोडीदार माझा सखा  'पती' या   दृढ नात्याची  मला योग्य व सतत साथ करतो. तसेच माझे आई- बाबा, व त्याच प्रमाणे सासू- सासरे यांची फार फार मदत होते. सासूबाई तर अति उत्साहाने  माझ्या मुलींना अवांतर शिक्षण देण्यात  दंग असतात. त्यामुळे मी या सर्व नात्यांच्या  शृखंलेत अडकून  आनंद उपभोगते  आहे,अनुभवते आहे. आता मोठी मुलगी पण समंजस झाली आहे . ती पण धाकटीला छान सांभाळते. काळजी घेते. लहान असताना तर माझ्याच प्रमाणे ती लहान बहिणीस थोपटवून अंगाई गीत गाऊन झोपवावयाची. तिचे ते छाया- चित्रण मी जपून ठेवले आहे व बरेचदा  ती  चित्र फीत   मी  पहाते.
             सुरुवातीस या सिंगापुरात आल्यावर ,कोणी ओळखीचे नव्हते पण महाराष्ट्र मंडळात येऊन मला अनेक मैत्रिणी मिळाल्या  व मैत्रीचे नाते वाढत गेले. अजून  आमचे नाते गुंफण चालूच आहे व  यातून आनंद मिळविणे हेच खरे जीवन  आहे ना  !    

शनिवार, ११ जून, २०१६

लेख. थंड पाण्याचा ग्लास

                                   
                                                                  ** थंड पाण्याचा ग्लास**    

              मार्च महिन्याची ३१ तारीख होती .  उन्हाने  जीव घाबराघुबरा  होत होता . मी बँकेत आले. खुर्ची सरसावून शांत खूर्चीत बसले . एसी च्या  गारव्याने मन संतोषले . जरा हु ssश झाले. आज  नोकरीचा शेवटचा दिवस होता. म्हणजे रिटायरमेंटचा दिवस होता .
      " हं ,पाणी घ्या ताई "म्हणत हिराबाई पाण्याचा ग्लास धरून उभ्या होत्या . क्षणभर मी त्या ग्लासकडे पहातअसता, मला बँकेत रुजू झाल्याचा  पहिला दिवस आठविला . जेव्हा मी  तोंडी ,लेखी सर्व परीक्षा  पार  करून नियुक्तीचे पत्र घेण्यासाठी   बसले होते.
      माझ्या नावाचे  उच्चारण करत चपराशी आला . व म्हणाला," तुम्हाला कॅबीन मध्ये बोलविले आहे".
मी उठून आत गेले.
    आत गेल्यावर  म्यानेजर जर साहेबांनी बसावयास सांगितले
मँनेजर साहेब म्हणाले ," अभिनंदन. हे घ्या तुमचे नियुक्ती पत्र"
  त्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिले . चपराशाने पाण्याचा ग्लास पुढे केला . त्या पहिल्या ग्लास  पासून ते  हा आजचा ग्लास मी SBI चे नियमित पाणी पीत होते. काय योगायोग पहा ! पहिला व आजचा शेवटच्या दिवशीचा थंड पाण्याचा ग्लास .. या दोन्ही  ग्लासांनी मला  बालपणाच्या आठवणीत ओढून नेले.

          क्षणात  शालेय जीवन डोळ्यासमोर उभे झाले . शाळेत असतांना त्यावेळी आमच्या शाळेत, रीसेस मध्ये पाणी पिण्यास रांगेत उभे राहून, क्रमाने पाणी प्यायला मिळायचे. . पाणी वाल्या ताराबाई प्रत्येकास पाणी प्यायला द्यावयाच्या.  हो......त्यावेळी हल्ली सारखे वॉटर बॉटल घेवून जाणे फार प्रचलित नव्हते .
      सकाळी  ते संध्याकाळी ५ ची शाळा असावयाची . दोन लहान सुट्ट्या व एक मोठी डबा खाण्याची सुट्टी . माझे घर तर शाळेच्या अगदी जवळ होते. इतके जवळ कीं  धावत जाऊन दोन मिनिटात पाणी पिऊन परत वर्गात येवू शकायची . मोठ्या डबा-खाण्याच्या सुट्टीत  तर, मी  घरी जायची,  आजीने पाट मांडलेला  असावयाचा खाऊ खाऊन परत  शाळेत यावयाची .
     खाऊ खाल्ला की आजी म्हणायची," हं , हे घे पाणी पी. आणि आजीने माठाला स्वच्छ ओले  कापड गुंडाळून, त्यावर सतत पाण्याची धार सोडून , ती कापड ओले ठेवावयाची, की जेणे योगे... पाणी माठात थंड राहील . कधी कधी पाण्यात ती वाळा पण टाकावयाची .त्यामुळे मंद सुगंधी पाणी पिण्यास मिळायचे.  माझ्या मैत्रीणी पण रीसेस मध्ये माझ्या  घरी पाणी पिण्यास यावयाच्या .
         असे सर्व असता आमच्या वर्गात एक जोशी नावाची मैत्रीण होती .तिचे वडील शाळेच्या जवळ पास असलेल्या बँकेत सर्वीस ला होते. ती पण त्या दिवशी माझ्या घरी पाणी पिण्यास आली होती . आम्ही मैत्रिणी माझ्या घरून पाणी पिऊन शाळेत परत जात होतो.
  ती सहज म्हणाली," मी आज आले तुझ्या कडे पाणी पिण्यास , पण माहित आहे का?. मी तर नेहमी माझ्या वडिलांकडे जाऊन पाणी पिऊन येते. वडिलांकडे म्हणजे कुठे माहित आहे का ? माझ्या बाबांच्या बँकेत .
 मी माझ्या बाबांकडे जाते .  मग ते चपराशास सांगून ,त्याचे करवी मला पाणी देतात.
  तो थंड पाणी आणून देतो. आणि काय सांगू ?..आत वातावरण वाळ्याच्या ताट्यानी कसे थंड असते. "
असे वर्णन करुन तिने सांगितलं .
 पुढे म्हणाली, " ए,ऐक ना, तुला यावयाचे आहे का ? माझ्या बाबांच्या बँकेत थंड पाणी पिण्यास ?
 मी तिला खुशीने हो ssओ   म्हणत ,मानेने होकार दिला .
  मग  ती ऐटीत ,आणि ठसक्यात म्हणाली ,"जाऊ  या तर, आपण माझ्या बाबांच्या बँकेत पाणी  पिण्यास ."
 मला पण मजा वाटली .
 ती पुढे थांबली, व म्हणाली," पण,...तुला एक काम करावे लागेल . "
 मी सहजतेने विचारले,"काय ग?"
 त्यावर ती म्हणाली, जेव्हा केव्हा माझा गृहपाठ बाकी राहिला असतो ना ,त्या दिवशी तू पूर्ण करून देण्यास मला मदत करायची. थोडे लवकर तर ,आपण शाळेत येतोच की .!  तेव्हा तू थोडा करावयाचा." .
मी लगेच म्हटले ," एवढेच ना ? करीन कीं त्यात काय मोठे ?"
तिचे घर   शाळे पासून बरेच लांब होते. त्यामुळे तिचा गृहपाठ बरेचदा बाकी रहावयाचा . काय करणार खेळण्यात अभ्यास राहू जायचा. शाळेत तर वेळेवर आले पाहिजे. ... पण मग आमचे ठरल्या प्रमाणे मी तिला नेहमी गृहपाठ पूर्ण करण्यात मदत करावयाची . आणि तिच्या बरोबर रीसेस मध्ये तिच्या बाबांच्या बँकेत पाणी पिण्यास जावयाची .
       काय मजा वाटायची  त्यावेळी . तिच्या बाबांच्या बँकेत जावयाचो . बँकेत दारात शिपाई उभा असावयाचा . तेव्हा कुठे माहित होते त्याला वॉचमन म्हणतात. त्याला ती तिच्या बाबांचे नांव सांगावयाची. बरेचदा ती जात असल्याने तो आता तिच्या ओळखीचा वा तो तिला ओळखू लागला होता. आम्ही तिच्या बाबांच्या टेबलापाशी जायचो . आम्हाला पाहून तिचे बाबा चपराशाला बोलवून सांगावयाचे कीं ," ये बच्चीयोंको  पाणी दे ना जरा."
. मग तो पितळी स्टान्ड मधे स्टीलच्या ग्लासात थंड पाणी घेऊन यावयाचा . तो पाणी घेऊन येई स्तोवर मी आजूबाजूलाच्या टेबलखुर्च्या , त्यावर काम करणारे लोक , हे पहात रहायची. पाहून मजा वाटायची सारे कसे खाली मान घालून काम करत असायचे .काही ठिकाणी टेबलाशी , खिडकीशी (तेव्हा त्याला काउंटर म्हणतात) हे पण माहित नव्हते. त्या काउंटरशी रांग असायची. हे सारे पहात, आतील थंड वातावरणाचे सुख अनुभवत उभी रहायची. बँकेची ही मजा अनुभवायला मजा वाटायची.
  असे आमचे त्या वर्षात अधून मधून चालले होते. पुढे  त्या मैत्रिणीच्या वडिलांची बदली झाली असावी आणि मी पण पुढे तिला बालपणात विसरले . मी पण तेव्हा फार तर 4/5 यत्तेत असेन त्यावेळी.
         पुढे मी माझे प्राथमिक शिक्षण , हायस्कूल चे तसेच महाविद्यालयाचे शिक्षणपूर्ण केले. पदवीधर   बी कॉम झाले. नोकरीसाठी अर्ज करत  होते . अर्ज करीत असता योगायोगाने  त्याच बँकेत पुढे नोकरीस लागले . जेव्हा मैत्रीणी   बरोबर थंड पाणी पिण्याच्या आशेने व बँकेच्या कुतुहलाने
 पाणी पिण्यास येत होते. आणि .....त्यासाठी तिचा होमवर्क करुन देत होते.. तेव्हा, कधी तरी वाटले होते का ? कीं  पुढे त्याच SBI  चे  मी ३१/३२ वर्षे पाणी पिणार होते म्हणून .
         मी मनात पाण्याच्या ग्लासाकडे पहात योगायोग वर हसले . आणि हिराबाईंने दिलेला थंड पाण्याचा ग्लास हाती घेतला व संतृप्त मनाने पाणी प्यायले.

  वैशाली वर्तक 















शनिवार, १४ मे, २०१६

kautukकौतुक

                                                                  कौतुक
                         सर्वांना आवडे सोहळा कौतुकाचा,
                         लहानास काय मोठ्यांना पण
                         वाटे हवा-हवासा .
                         पडता  पहिले पाऊल बालकाचे
                         असंख्य छायाचित्रे
                         घेतली जातसे.
                        अन  बोलता बोल बोबडे
                        ध्वनी अंकित होतात बोल तयाचे.
                        कौतुक करून घेणे कोणास न आवडे
                        अहो ! एवढेच काय  ,
                        देवास पण हवीच कीं हो
                       स्तुती स्तवने.
                       वाढ -दिवस असो
                       वा मंगल-कार्ये,
                       ती तर असती कौतुकाचे सोहळे
                       सध्याचे युग तर, निव्वळ कौतुकाचे,
                       पदो-पदी कौतुकच कौतुक नाचे
                      कौतुक-कौतुक पण, किती करावे?
                      स्व:ताच्या व्यक्तीचे  प्रेम पण
                      कौतुकाने  फेस बुक वर दाखवायचे.
                      अन किती लाईकस मिळाले ते पहायचे.
                      व्हॉंट- अप काय,
                      फेस बुक काय,
                      मनांत इच्छा असो वा नसो
                     लाईकस कौतुकाचा मिळणारच  देणारच तयास.
                     करता खाद्य पदार्थ नवा घरात
                     पहिले प्रसारित होतो व्हॉंट- अप वर खास
                     नैवेद्या सारखा चित्रित करून
                    मगच मिळतो
                    चवीस इतरांस
                    सोशिअल मिडीयाने
                    स्थान दिले कौतुकाला
                    कौतुक सोहळा अतीच फोफावला.
                    
                      
                     

बुधवार, ४ मे, २०१६

मान

                                     मान
वदनास  वाटे  माझ्यानेच,
मोजमाप  होते सौंदर्याचे.
पण नको करुस , गर्व वदना,
तव रूप  दावविण्यास  ,
आस्तिव हवे माझेच, ताठ मानेचे.
असती माझ्या नाना त-हा ,
कधी उंच सुरई  समान, 
तर कधी बाकदार ,
जशी शोभे राजहंसास 
हो, करिते मी  चाळे लाडिक ,
अन करिते, घायाळ जनास
देता हलकेच लाडिक झटका ,
होतात फिदा  आशिक क्षणात .
विचारांशी होता सहमत ,
मीच दाविते होकार निदर्शन
नकार दर्शविण्या-सुध्दा
करिते मी नन्हाचे प्रदर्शन .
मिळता  गौरव अथवा यश ,
मीच असते मला  उंचावून ,
पण, जरा पडता पाऊल चुकीचे ,,
मजला मीच, तुकविते लाजून .
जवाहिर तांना पण   माझाच  छंद ,
मम छायाचित्रे घेतात टिपून              
शोभा तयांच्या , आभूषणांची
करण्यास मीच असते तत्पर.
ठेविता  मान  इतरांचा , मान मिळे  स्वतःला ,
हाच गुरु मंत्र ठेवून घ्याना
आदराने द्यावा मान थोरांना. 
अन हेच रहस्य जीवनाचे,
ठेविते मी  सदा माझ्या  मनात

बुधवार, २ डिसेंबर, २०१५

स्वार्थ / ......अष्टाक्षरी स्वार्थ

                                       
                                                               
                                                                      स्वार्थ
                                        म्हणती जरी,मनी स्वार्थ  नसावा
                                        क्षणा क्षणा ला  नजरेस यावा
                                        वससी स्वार्थ सर्व कर्मातुनी
                                        स्वार्थ विरहीत कर्मची न घडी
                                                                म्हणती जरी मनी स्वार्थ  नसावा
                                       देवावरती ठेवती श्रद्धा
                                       श्र द्धेमागे स्वार्थ कर्मपुर्तीचा
                                       मदतीसाठी हात लांबविता
                                       स्वार्थ दडलेला सन्मानाचा, प्रतिष्ठ्तेचा
                                                                  म्हणती जरी मनी स्वार्थ नसावा
                                       निवांतपणा अनुभविता  सुद्धा
                                       स्वार्थ असे मन:शांतीचा
                                       माये पोटी नातीगोती सारी
                                       स्वार्थ तयात उद्याची आधार काठी
                                                                  म्हणती जरी स्वार्थ मनी नसावा
                                      घडविता बालक ज्ञानी -संस्कारी
                                      मोठे-पणाची  झालर जोडलेली
                                      ज्ञान संपदा, संपादन   करिता
                                      स्वार्थ असे  कर्तृत्व  बलाचा
                                                                 म्हणती जरी मनी स्वार्थ नसावा
                                      जग हे असे  बाजार स्वार्थाचे
                                      पदोपदी स्वार्थ भरलासे
                                      पण दुज- हितात स्वार्थ नसावा
                                     निस्वार्थी पण तिथे असावा
                                                       म्हणती जरी मनी स्वार्थ नसावा










प्रेमाची अक्षरे समुह 
राज्य स्तरीय स्पर्धा
महा अंतीम फेरी  1
अष्टाक्षरी काव्य

विषय......... स्वार्थ 
स्वार्थ
                                    
    स्वार्थ  नसावा कधीच
    स्वार्था विणा  नसे कर्म 
    क्षणा क्षणाला तो दिसे
    हेच कर्माचे ते मर्म            
                                      
              श्रध्दा असे देवावर
              स्वार्थ  तो ईच्छापूर्तीचा
              देती हात मदतीचा
              स्वार्थ , मान सन्मानाचा

   निवांतात सुध्दा वसे
   ईच्छा ती मनःशांतीची
   मायेपोटी नाती गोती
  काठी हवी आधाराची
              
               घडविता मुला ज्ञानी
               स्वार्थ रूळे कर्तव्याचा
               ज्ञान मिळवी मुले ती
               स्वार्थ  कर्तृत्व  बलाचा

   पदोपदी भरलेला
   दुजा हिता तो नसावा
   जरी बाजार  स्वार्थाचा
    तेथे  निःस्वार्थ असावा


 ......वैशाली वर्तक  5/11/2019








अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...