बुधवार, २७ जुलै, २०१६

nivaant क्षणभर थांब

                                                                   निवांत
        जून महिना होता. आकाशात काळे ढग गर्दी करू लागले होते . थंडगार वारा व पावसाने  दर्वळेला मातीचा सुगंध  जीवास प्रसन्न करत होता . वातावरण पण कसे आल्हादकारक भासत  होते .राधिका ऑफिस मधून परतत होती.  रस्त्यात चालतांना समोरच्या बाल्कनीत आजी व आजोबा खुर्च्या टाकून चहाचा एक- एक घोट घेत गप्पा करीत निवांतात बसलेले होते . राधिका मात्र पटपट पावले उचलत घराकडे धांव घेत होती . दिवसभराच्या दगदगीने थकलेली होती . तिला क्षणभर त्या निवांतात बसलेल्या आजी आजोबांचा हेवा वाटला .  थंड गार  वारा , हातात चहाचा कप , आजूबाजूला हलणारी झाडे , आकाशातील ढग, पंख पसरून उंच आकाशात  विहंग करणारे पक्षी  पहात निवांतात कसे  क्षण घालवीत आहेत ना !
       राधिका घरी आली . घरात येऊन मुलांचे व स्वत:चे ,चहा पाण्याचे पटकन आटपून रात्रीच्या जेवण्याचे  पाहू लागली . नवरा आल्यावर रात्रीची जेवणे आटपून बिछान्यावर आता निवांत पडली.   पण हा निवांतपणा म्हणजे  थकलेल्या  शरीरास विश्रांती देणारा निवांत क्षण होता . मानसिक विश्रांती तो खरा निवांतपणा . असे विचार करता करता राधिका निवांताच्या विचारात मग्न  झाली. व झोपी गेली.
      खरच ! आयुष्यभर  आपण नुसते भरघाव गतिने जीवन जगत असतो, नाही का? व त्या जीवनात आपण आनंद ,सुख शांती मिळावी याचा अतोनात प्रयत्न करत असतो . जीवाचा आटापिटा करत असतो .पण खर पहिले  तर  आनंद  काय, सुख , शांति  काय ,ही तर त्याच्या मनांतच दडलेली असतात.  मनांत नीट डोकावून पहिले तर हे सर्व त्याला त्याच्या मनाकडूनच मागितले  गेले  असते  वा इच्छित , अपेक्षित असते.व  आपले मन ते आपल्याला देऊ पण शकते व देत पण असते . पण आपली,प्रत्येक  माणसाची मानसिक भूक, गरज, वा तृष्णा असते ती निवांतता मिळवण्याची . तो निवांतपणा प्रत्येकास हवा हवासा वाटतो . रोजच्या चाकोरीतून सुटकारा  मिळवून  निवांत क्षण  मिळवण्याचा प्रयत्न करतो.त्यासाठी बरेचदा 10/15 दिवस  बाहेर जाऊन रोजच्या रुटीन मध्ये  बदल  करून पुन्हा रुटीन आयुष्य जगण्याने ताजे तवाने  होतो . त्या बदलात  निवांतता आपण मिळवू शकतो.
     ह्या निवांताची गरज पशु पक्षामध्ये  पण पहावयास मिळते . पक्षी  आकाशात मजेत विहार करतांना , मजेत दाणे  टिपतांना दिसतात . चिमण्या  अथवा इतर पक्षी मातीत वा पाण्यात पंखांची फडफड करतांना दिसतात. गुरे नाही का झाडांचा आडोसा शोधून निवांतात रवंथ करतांना आढळतात . ते पण निवांतपणा  मिळवतातच ना ! इतकेच काय सृष्टी कडे पहा.सूर्य दिवस भर प्रकाशमान होऊन  संध्याकाळी  आपल्या  तत्प किरणांना शमवून सृष्टिच्या  कुशीत, डोंगराच्या आड , सागर काठी अस्ताला जातो. जणू काही तो पण निवांतता  मिळवू पाहतो. वनस्पतींची पाने पण मिटतात .  संध्याकाळी  पक्षी पाखरे  आपल्या कोटरा कडे कडे गुरे आपल्या निवा-याकडे धाव घेतात .
     शालेय जीवनातील W.H.Divies यांची कविता आठवते.  
       what is this life full of care
      we have no time to stand and stare .
    आयुष्य नुसते  चिंता काळजी मन:स्तापाने  भरलेले असेल , तर त्या जीवनाचा काय अर्थ? आपल्या आजूबाजूच्या   सृष्टीत , निसर्गात,  नव- नवीन ऋतु प्रमाणे होणारे बदल पहावयास हवेत . आपल्या भोवतालची  झाडे, वेलीत ऋतूप्रमाणे होणारे बदल ,वसंतातील बहरणारी   झाडे, त्या पानांचा बदलणारा हिरवा पोपटी रंग , सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील बदलते रंग , वर्षा  ऋतूतील ढगांनी भरलेले आकाश  व त्या ढगांचे बदलते आकार ,तळ्याच्या पाण्यात उठणारे तरंग ,फेसाळलेला समुद्र ,हे सारे पहावयास हवे नुसते भरधाव  गतीने जगणे हे जीवन जगणे नव्हे .म्हणूनच W.H.Divies
     A poor life this if ,full of care
    we  have no time to stand and stare
        तेव्हा निवांतपणा ,फुरसत मिळ्त  नसते .तर  तो मिळवावा लागतो .व हा निवांतपणा मिळाला की माणसाची  मानसिक  तृष्णा   शमते  व   मनास  नवीन  उभारी  , हुशारी मिळते.




विषय - क्षणभर थांब 

     *निवांत*
किती पळशील
 सदा जीवनात
क्षणभर थांब
जरा निवांतात      1

बघ उगवता
सूर्य  गगनात
निहाळ तयाच्या
प्रभा आनंदात       2

पहा झुळुझुळु
वाहे तो निर्झर
 निनाद ऐकण्या
थांब   क्षणभर      3

सांजवेळी बघ
नभातील पक्षी
किती मनोहर
दिसतेय नक्षी        4

येता रवी  नभी 
कळ्या अलवार
फुलूनी डौलती
 फुले  हळुवार       5

बघ ही किमया
पहा  खरोखर 
क्षणभर थांब
आहे मनोहर          6
 

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...