अपेक्षा
जन्मास जसा येतो मानव
पडे गळा , अपेक्षांची माळ
स्व अपेक्षा पूर्ती साठी,पालक
पाल्यावरती ,लादती भार सदाकाळ .
बाल्य इच्छांना घालूनी मुरड
चढा ओढी पायी ,पालक
हिरावूनि घेती , तयांचे बालपण
कधी आनंदाने खेळणार बालक
जरी करिती कर्म अविरत
अपेक्षा विरहित हवे आवश्य
होता तयांचा , आकांक्षा भंग
पदरी पडते , नुसते नैराश्य .......
समाधानाची मनी , खेचता लकेर
अपेक्षा पूर्तीची नसे गरज
कामात न भासे , निरुत्साह
जोमाने कर्म होते सहज
अपेक्षा सुवर्ण पदक प्राप्तीची
करतील सारे सदा यशाची
तणाव न घेता , तिने साकारावी
हीच अपेक्षा असावी , सदिच्छांची ......
स्वच्छ भारत व मेक इंडिया
आहेत मोदीजींच्या अपेक्षा
प्रयत्नांची करू पराकाष्ठा
नागरिकांची हीच खरी परीक्षा.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा