बुधवार, २१ जानेवारी, २०१५

कधी कधी असा ही प्रवास घडतो .


                                              कधी कधी असा ही प्रवास घडतो .
       प्रवास म्हटला की आयोजन आलेच . सर्व साधारण पणे  प्रवासास जावयाचे म्हणजे  निघण्याची तारीख नक्की करणे , तसेच परतीची तारीख पण नक्की करणे व  त्या प्रमाणे गाडयांची avaibility पाहून , आपल्या वेळे प्रमाणे  योग्य तशी सोयीची गाडी आहेना ? ते आपण पाहून घेतो.  व त्या प्रमाणे दोन्ही आरक्षण करतोच . सध्या  मुंबई काय , पुणे काय  वा इतर  सर्वच प्रवास reservation केले असले तर सुखदायी ,आरामदायी झालेले आहेत. मुंबई  अहमदाबाद  तर अगदी नेहमीच्या रुटीनचे  झाले आहे. आम्ही पण अहमदाबाद -मुंबईचे  व  तसेच  परतीचे पहिल्या वर्गाचे स्लीपर ए सी कोचचे reservation  करून ठरल्या दिवशी परतीचा प्रवास सुरु केला होता .
       शेवटी अहमदाबाद ला  पोहचलो . कधी एकदा अहमदाबाद येते असे झाले होते. आमच्या जवळ सामान विशेष नव्हते व आपल्याच म्हणजे स्वतःच्या शहरात परतत होतो ,त्यामुळे स्टेशन वर घेण्यास कोणीही येवू नका.  आम्ही आमचे येवू हे सांगितले होते .  त्यामुळे न  कोणाची वाट पहाता घरी पोहचलो .
        घरी पोहचल्यावर मुलांनी  विचारले कसा काय झाला प्रवास ? सुटकेचा  श्वास सोडत म्हटले कसले काय ! रात्र भर जागेच आहोत. लगेच मुलांची प्रश्नांची प्रश्नावली झाली . म्हणजे? फस्ट क्लास ए सी चे reservation   होते ना  ?  आणि तुम्ही आलात त्यावरून कळतय  की गाडी पण वेळेतच आलेली आहे . मग काय झाले? कुठे माशी शिंकली?
         अरे ! कसले reservation  विचारतो रात्र भराची झोप नाही. मुंबई  अहमदाबाद गाडीला सीझन असा नसतोच  नेहमीच  गर्दी.  सीटच्या एका टोकाला बसून , बसून कसले! कसे बसे बुड टेकवून रात्र काढली . बाजूची बाई जाम हलायला  तयार नव्हती . नेहमी जी स्टेशने झोपेत जातात ती सर्व स्टेशने  अगदी चक्क उघडया डोळ्यांनी पहिलीत .  मधेच एखादे पोर जोर जोरात रडत होते. खाली, माझ्या पायाशी बसलेली बाई माझ्या पायांना,गुडघ्यांना मान टेकविण्याचे साधन म्हणूनच वापर करत होती . त्यात चहा विकणारे त्या गर्दीत चहाची किटली सावरत ,"'चाय गरम,गरम चाय "ओरडत होते.  तर मधेच ताजा वडा  पाव , तर मधूनच पुरी भाजी असे ओरडत  विक्रेते विक्रीचे काम आणि पैसे वसुलीचे काम सराहित पणे करत होते. रात्र झालेली असून रात्र आहे का दिवस कळत नव्हते . उभे असलेले प्रवासी आशाळभूत  पणे बसलेल्या   लोकांकडे  पहात होते. पण कोणास दया येत नव्हती . चार जणांच्या सीट वर पाचव्या प्रवाशास  जागा ,कशी तरी मिळाली होती .  मिळाली कसली ?मिळविली होती .व तो प्रवाशी पण पुन्हा पुन्हा बसण्याची पोझिशन बदलत होता . मधेच एखादी बाई खाली बसलेल्या प्रवाशांना " जरा जाऊ   द्या ना " म्हणत कसरत करत कशी बशी टोयलेट पर्यंत जावून परत येत होती.  त्यात विकणारे होतेच . मधेच कुणीतरी खावून झालेला  खाण्याचा कागद इकडे तिकडे टाकण्याचा प्रयत्न करत होते . अथवा सीट  खाली जागा दिसेल तेथे ढकलत होते . गाडी थांबली  की  थंडीचे दिवस असून सुद्धा गर्मी जाणवत होती .
         अग पण  reservation होते ,फर्स्ट क्लास ए सी चे तिकीट होते त्याचे काय झाले ? तिकीट हरविले की विसरलात व गाडीत बसल्यावर कळले की तिकीट नाही व pan no.पण  नाही  म्हणून ? मुलांनी  एकदम प्रश्नांचा  बडीमार केला.
        नाही रे! या वेळी reservation आपण बोरीवली हून केले. कारण मुंबईची सर्व कामे आटपून उशिराची गाडी घेतली . नेहमी दादर अथवा मुंबई सेंटर पासून तिकीट घेतो. व त्या गाड्या रात्री १२ च्या आधी सुटतात . व त्या गाड्या बोरिवलीला येतात तोवर १२ वाजून जातात व दिवस बदलतो . तेच आमचे झाले . गाडी वेळेत च आली.तिकीट पण हातात होते. पण हातातील तिकीटाची तारीख आदल्या दिवशीची होती . त्यामुळे ते तिकीट निरुपयोगी ठरले . व आता मिळेल ती गाडी,  मिळेल ते  reservation , वा नाही  मिळाले तर  without  reservation  प्रवास करावा लागला ,कारण आज सकाळी पुन्हा येथे  येणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे नाईलाजाने का होईना फर्स्ट क्लास ए सी  चे तिकीट हातात असून with out reservation  अगदी असहाय्य होवून अगदी असह्य असा प्रवास केला .
          तेव्हा सर्व नीट planning  करून पण कधी कधी असाही प्रवास घडतो .

रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

gappa


                                              गप्पा

    भाजी मार्केट मधे भाजी घेऊन झाल्यावर, अचानक जुनी मैत्रीण भेटता ब-याच गप्पा झाल्या तरी, "चल ग ,

 आता  जाऊ या. आपल्या गप्पा काही संपणार नाहीत असे म्हणत ,पुन्हा तेथेच रेंगाळत , पाय  दुखू लागले तरी बाजूच्या कट्ट्याचा आधार घेत गप्पा करणा-या  मैत्रिणी आपण पहातो .अथवा आपण पण त्यातील एक, कधी कधी असतो  वा भेटलेल्या  दोन   मित्रात  एकमेकांना निरोप देता देता" या ना घरी, मस्त गप्पा करू यात" . असे उद्दगार ऐकू येतात .

             परवाची च गोष्ट बाजूच्या काकू चेहरा पाडून बसल्या होत्या.   काय झाले विचारले तर बसक्या आवाजात म्हणाल्यात, " काल रात्री,  आमच्या कडे गप्पा  रंगल्या होत्या  पण  माझा आवाज,घसा बसल्याने मी काहीच बोलूच शकले नाही ना !." किती विरस झाला माझा . नेमका सर्व  गप्पा मारावयास जमले होते  व  मी गप्पात सहभागी होऊ शकले नाही .

             खरच, गप्पा गोष्टी करण्यात काय  मजा असते ना !  ती गप्पीष्ट लोकांनाच त्यातील मजा कळते . मुखस्तंभा सारखे बसणा-यांना  त्याची मजा कळत नाही . म्हणतात  ना ' गाढवाला काय गुळाची चव"  तशातले आहे.

           दोन वा अधिक व्यक्तित,  जे भाष्य होते, ते संवाद वा संभाषण  वा गप्पा. एकटा  स्वत;शी बोलतो ते स्वगत . वाच्यता वा भाष्य करणे ही देवाने मानवास दिलेले अमुल्य वरदान आहे. त्यात मेंदू बहाल केल्याने मानवाने भाषा शोधली . त्यामुळे भाषेत शब्दांचे स्थान महत्वाचे आहे .योग्य ते शब्द रचून वा  जोडून मानव आपले विचार , मत , भावना  आपले ज्ञान ,व मंतव्य दुस-यास सहजतेने सांगतो, पटवितो,गळी  उतरवितो . विचारांचे आदान प्रदान करतो शब्दांना  शब्द जोडू गप्पा  रंगात  येतात . बोलण्यात , गप्पात शब्दाला महत्व असते

           गप्पा मारणे  प्रत्येकास आवडते . म्हणूनच तर "या ना  घरी गप्पा गोष्टी करू "असे उद्दगार कानीं येत असतात. आणि एकदा भेटले कीं गप्पांना विषय मिळत  रहातात . अगदी  राजकारण ,स्वयंपाक घर ,वाढती महागाई .दोन पिढीतील अंतर ,हल्लीचे मुलांचे वागणे ,सध्याचे हवामान,पाऊस ,गर्मी  पासून एवढेच काय हल्लीचे चित्रपट ,टी व्ही वर न चुकता पहाण्यात येणा-या मालिका (काय फालतू मालिका आहेत) म्हणत नाव ठेवत  मलिकांची चर्चा वा कामवाल्यांचा  त्रास , ते थेट  मोदीचा देशभर गवगवा  पर्यंत चौफ़ेर गप्पा  रंगतात . गप्पांना उत येतो. गप्पात चौफेर विषय हाताळले जातात .

            अगदी बालपणात पण डोकावून पाहिले अथवा  बालपण आठविले तर वर्गात शिक्षक शिकवीत असता बाजूच्या अथवा पुढच्या वा  मागच्या विद्याथ्याशी बोलल्याने व त्याच वेळी डोक्यात आलेला विचार त्यास  सांगणे आणि  शिक्षकांनी नेमके " अरे गप्पा मारू  नकोस , मी येथे शिकवीत आहे आणि गप्पा काय मारतोय  ,   उभे रहा ," अशा रीतीने त्यावेळी भोगलेल्या शिक्षेचे कारण पण गप्पा असायचे . पण गप्पा केल्या नाही तर आपले विचार दुस-यास  कसे कळणार ?

            टेलिफोन वरून अर्धा तास, पाऊण तास गप्पा  बसायची  सवय असते . त्यात तर भेटीचा आनंद मिळतो . सर्वाची खुशाली, खबरी कळतात  . पूर्वी पत्राव्दारे नंतर फोन.  आता तर social media मध्ये इतकी सुधारणा झाली आहे  कीं  क्षणात   साता समुद्रापार पण chating voicemail  आणि whatapp सारख्या माध्यमातून एकाशीस नाही तर ग्रुप बनवून गप्पा करू शकतात . एवढेच काय Skype तून तर थेट त्यांच्या घरात शिरून प्रत्यक्ष पाहत त्यांच्या समवेत गप्पा करण्याचा कार्यक्रम करतात , गप्पांचा मनसोक्त आनंद लुटून भेटीचा आनंद मिळवतात.

             महिलांची किटी वा भिशी  काय प्रकार आहे ? फुरसतीच्या वेळात, नव्हे तर वेळात वेळ  काढून गप्पा करण्याची बैठक च असते. प्रत्येक जण हिरीरीने गप्पात भाग घेत असतात.  महिनाभराने भेटल्याने आपले विचार ,अनुभव, दुस-यां  सोबत  शेअर करतात . खेडे गावात गावाच्या वेशीवर झाडाचा  पार म्हणजे    गावक-यांना  एकत्र होऊन  सुख दु:खाच्या गोष्टी करण्यास  खुशाली जाणण्यास  व खुशाली कळविण्यास   गप्पाची बैठक च असते . शहरात वाचनायाल ,बगीचे ,क्लब , सोसायटीचे कॉमन प्लॉट ही सर्व ठिकाणे देखील  गप्पांचे अड्डे च आहेत. तसेच शहरात पण कॅफे हाउस , किंव्हा चहाच्या टप-या काय , हल्ली तर चहाच्या आधुनिक chiawia सारख्या टप-या पण गप्पाची बैठक वा गप्पा रंगात  येण्याची ठिकाणे झाली आहेत.प्रवासात तर गप्पा मुळे  वेळ कुठे गेला कळत  नाही . नवीन ओळखी होतात .  बिझनेस करणारे तर गप्पा केल्या शिवाय राहूच शकत नाहीत . गप्पा हेच तर त्यांच्या जाहिरातीचे प्रमुख माध्यम  आहे .

              गप्पा करून मनास मनस्वी आनंद मिळतो जीवास विरंगुळा  लाभतो कित्याकदा मनातील साचलेले विचार बाहेर निघून मन स्वच्छ  होते.तसेच चार जणात गप्पा करून चार अनुभवाचे ,ज्ञानाचे कण  मिळतात . चांगले विचार कळतात.  गप्पा केल्यानी मनाची दारे उघडी होऊन गप्पातून चारलोकात बोलल्याने हृदये हलकी होतात . तेव्हा गप्पा करणे केव्हाही चांगलेच . जसे हसणे  आरोग्यास आवश्यक  आहे  त्यामुळे सध्या जागो जागी हास्य क्लब निघाले आहेत . तसेच गप्पा करणे पण जरुरी आहे . चला  तर मग मनसोक्त गप्पा मारुयात  .               
                                  वैशाली वर्तक                      

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०१४

pravasi nauka canada /us chi

                                                        प्रवासी नौका कॅनडा यूएस  ची 
Canada/ US ची  प्रवासी  नौका, तयार  केली धवल ने, 
हळूच  प्रवाह पतीत केली, कल्याणी नितीनने
अवीच्या साथीने  उलगडली, इतिहासाची पाने वैशुने ,
धवल  स्नेही,  पाठक कुटूंबियानी, केली मदत मनोमने 
शुभदा मनोहर कुटुंबीयांनी, आणली गप्पात रंगत,
घडविले  Ottava  दर्शन, देवून साथ अन संगत. 
खळदकरांनी   केली, साथ  प्रारंभा पासून 
मदतीचे   लांबविले हात , Toranto  मधून . 
मधु दादा प्रतिभा वहिनीनी, स्वागत केले सह्रदया ने
यशस्वी केली  ट्रीप, वेळात वेळ काढून श्रीधर ने . 
ओलांडूनी   कॅनडा, प्रवेशिते झालो सीमा कडे
अवनीश ने कवनाने ,स्नेहाकेदारने केक ने व मुलांनी भेटकार्ड ने
       भरघोस वर्षाव केला , अभिनंदनने  व  स्वागताने.  
भव्य दिव्य अमेरिकेचे, दर्शन करविले अवनीश ने
new york  चे रस्ते व इमारती, पाहून डोळे दीपले अमुचे 
चतुर्थीला  घडवून दर्शन पटवर्धननांच्या  , श्री गणरायाचे, .
भारतातच आहोत जणू ,भासविले सीमाने
वंदन करुनी गणेशाला , वाट चाल केली फ्लोरेडा कडे,
भरपूर आदरा तिथ्य  केल , हेमंत अन  रोहिणीने
सचिन अमिता ने दाविले ,वेडे वाकडे रस्ते  Sacramonto  चे
                    Golden Gate तर कधी ,  पुरातन कालीन  भली मोठी वृक्षे Big Basin Red Wood                      
तिन्ही भावांनी मिळूनी, अनुभवली दिवाळीची झलक
श्रेयश  सच्चीदानंदाने, जेवू घातले समूह जेवण   .
                                कधी नेले श्रेयस ने Microsoft  भूमीत (Yahoo, Google, Facebook)
तर कधी निसर्ग रम्य  Lake Tahoe च्या कुशीत
  श्रेयस च्या बेमालूम, driving च्या  skill  मधुन
                                     मीरा वर्तक, लिमये शुभदा च्या ,  भेटीचा योगआला  जुळुन                                         अविनाशने दिला जुन्या  आठवणींना  उजळा
बंधुराजाला पाहून, उषाच्या   प्रेमाला आला उमाळा. 
भालुने  सहर्ष स्वागताने, दाखविली कर्मभूमी
" असाच ये "पुन्हा पुन्हा, वदती झाली उषा भगिनी
गौरी ने केले हसत मुखाने स्वागत
         पाहून वैभव तिचे हरखले आमचे मन
            उषाने योग आणला विनय-रेखाच्या  च्या भेटीचा             
                                            दिलीपने साजरा केला वाढदिवस आई व मामाचा                                     
 प रत रमलो, सीमा सदनी
भव्य  दिव्य, अमेरिका पाहूनी
बसलो चौघे, मारीत गप्पा ,
काय सुंदर योग, आणलास  बाप्पा ,
                                    
                                                                                                वैशाली वर्तक
                                              
                                              

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

लेख. शिकवण

                                                                 शिकवण
        ऐ ," मला शिकवण  देऊ नकोस हं ! मला माहित आहे आणि कळतय पण, काय करावयाचे ते. जरा   काही झाले  की  , तुझा शिकवणीचा पाठ सुरु . म्हणे शिका आमच्या कडून .  अगोदर स्वत: ने काय केले ते पहा .शिकवण देणे सोपे आहे . " असे संवाद वारंवार घरा- घरातून ऐकू येतात. कोणास पण शिकवण दिलेली आवडत नाही . सूचना, उपदेश, साधे बोलणे वा  सुचित करणे शिकवणीत जमा होते . खरे पहिले तर शिकवण घेणे मोलाचे असते. पण आम्हास माहित आहे  अथवा मला माहित आहे ची भावना मनात घर करून असते . त्यामुळे अहंभाव जागृत होतो. वा आड येतो.  
        तसे पहिले तर प्रत्येक माणसाची त्याच्या आईची शिकवण ही पहिली शिकवण असते .अगदी  बोट घरून उभे करून चालण्यास शिकवण्या पासून संस्काराची बाळगुटी पाजून, प्रत्येक माता बालकास उत्तम संस्काराची शिकवण देते . ज्या शिकवणीच्या जोरावर जीवनाचा डोलारा उभा रहातो . पुढे गुरुजनांची शिकवण जीवन नौका तरून जाण्यास मदत रूप ठरते . एवढेच  नव्हे  तर शिकवण घेता घेता मित्रांची मैत्री रुपाची शिकवण पण खूप काही शिकवून साथ देते, तर एकजुटीची शिकवण  समाजा कडून प्राप्त होते .
       निसर्ग तर  क्षणा क्षणाला  न बोलता शिकवण देत असतो . साधा सूर्यच पहा ना रोजच नियमित पणाची शिकवण देतो . फुले,  पाने, वृक्ष , नदी सागर सर्वच आपापल्या परीने माणसास शिकवण देतात . आणि मनुष्य पण या निसर्गातून शिकवण घेत असतो  व त्याला  स्वत:च्या  जीवनात मानसिक आघार मिळतो .
       मुकी जनावरे जी अवती भवती आपल्या फिरत असतात ती पण शिकवण देत असतात . मानव स्वता:ला मेंदू असल्याने महान  समजतो . पण त्याला मुके जनावर कुत्रा, तो पण मालकाशी  इमानदारी कशी बाळगायची याची शिकवण देतो . साधे कीटक, मुंगी मध माशी काय,  सतत उद्योगी रहा तर   कोळी किटक स्वत:चे जाळे  विणताना कितीदा पडला तरी हार न मानता प्रयत्नशील रहाण्याची शिकवण देतो.
      तेव्हा आपण पदवीधर झालो ,मोठ्या पगाराच्या नोक-या  मिळाल्या व सर्व भौतिक सुखे प्राप्त करून नामांकित झालो म्हणजे दुस-यांचे शिकवणीचे बोल ऐकावयाचे नाही असे नसते पण तेथे आड येतो तो अहंभाव .
     तसेच अनुभवाने मिळालेल्या ज्ञानाचे  शिकवणीचे पाठ प्रत्येक  पुढचा मागच्यास देत असतो . ती  अनुभवाने  जास्त उन्हाळे पावसाळे पाहिल्याची  अथवा स्व:ताने अनुभवलेल्या ज्ञानाची शिकवण असते म्हणूनच  तर  पुढच्यास  ठेच  मागचा  शहाणा  असे  म्हणतात .  ते  काय  उगीचच .   तेव्हा   अनुभवाने  पण शिकवण मिळते त्याचा फायदा घेतला पाहिजे . व आपण तो घेत असतो . असेच अनुभावाचे बोल काही जण लिहून  काढतात ती पुस्तके लिखाण रूपाने आपणास   शिकवण  घेण्यास उपयोगी ठरतात . साधे सोप्या भाषेत लिहिलेले   रामदासांचे मनाचे श्लोक आधुनिक काळातील गीता च आहे .
    शिकवण ही अगदी अनादि काळापासून चालत आली आहे . कृष्ण सुदामांनी सांदिपनीच्या आश्रमात जाऊन तर  राम  लक्ष्मण  यांनी वसिष्ठ मुनींच्या आश्रमात जावून शिकवण घेतली .त्या  काळी गुरु घरी जावून शिक्षण  घेत व त्या शिक्षणाची , शिकवणीची गुरु दक्षिणा  देत . तेव्हा आपल्या संस्कृती त पण  "गुरु पौणिमा"गुरुनी दिलेल्या शिक्षणाची कृतध्नता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा करतात .
    तसेच धर्म म्हणजे तरी काय ? प्रत्येकाच्या रोजच्या जीवनातील चाली रिती . तेव्हा कुठला ही  धर्म असो पंथ  असो सर्व धर्माची शिकवण एकच असते . प्राणीमात्रांवर प्रेम करा , दया भाव ठेवा , विश्वबंधुत्वाची भावना मनी ठेवा ,चोरी करू नका, असत्य, दंभ ,मत्सरी पणा, अहंकृती सोडा . म्हणजे सर्व धर्माची शिकवण एकच असते आपल्याला  संत लोकांनी पण तीच शिकवण दिली आहे . त्या  शिकवणीच्या जोरावर  आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुतली आहेत.  कुठल्याही पंथात संतानी सांगितले की
                                 नको हेवे दावे ,नको भेद भाव ।
                                  सर्व धर्म समान , सांगे संत वाणी ।।
        महाभारतातच  पहा ना ! भर  रणांगणात,  कुरुक्षेत्रात आपलेच बांधव  पाहून, युद्धापासून विन्मुख झालेल्या अर्जुनास श्री कृष्णाने जीवनाचे सार , तथ्य  सांगितले . तीच महान 'गीता' आज आपणा  सर्वांना जीवन तरून जाण्यास बोध रूपाने अमृतमय 'शिकवण 'आहे .
      तेव्हा शिकवण ह्या शब्दाचा राग न करता अहंभाव दूर सारून शिकवण घेतली पाहिजे व तशीच दिली पण पाहिजे .

सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

sahjeevan

                                                                   સહજીવન
       દીસેંબર મહિનો હતો. હું  વરસના અંતે, છેલ્લી બાકી રહેલી આકસ્મિત રજા વાપરવાના મૂડમાં હતી. રજા લેવાની, તો પણ રજાનો મુડ ન લાવતા બધા કામ ઓફીસ ના સમયપર પતાવીને બહુજ  દિવસ પછી    પાસે પડેલું , માસિક હાથ માં લઈને  અને જુના ગીતો સાંભળવા બેસી। ધ્વની મુદ્રિકા ચાલતી હતી.હું ગીત   સાંભળતા સાંભળતા  25 વરસ પહેલાના  કાળ ખંડમાં,  વિચારોમાં ખોવાઈ ગઈ. એન્ગેજમેન્ટ નો દિવસ યાદ આવ્યો।  દોરી ના   રીળના   જેમ , કાળનું રીળ  વિચારોના તંદ્રીમાં ઉકલતું ગયું . 8 મી જુલાઈ   એન્ગેજમેન્ટ નો દિવસ, આખો સામે ઉભો થયો. અને એના પહેલા , એક બીજાને જીવન સાથી તરીકે પસંદ કરવા માટે કરેલી પહેલી મુલાકાત યાદ આવી. અને  તરતજ એન્ગેજમેન્ટના દિવસે, સાસુમા અને  નણંદબહેનનાં  એન્ગેજમેન્ટ માં ભેગા થયેલા એમના (હવે મારાપણ )સગા  સંબધી લોકોમાં ગૌરવ થી કહેતા શબ્ધ,"અમારા  કુટુંબમાં  શોભે એવી વહુ છે હોં , બન્નેની જોડી પણ સરસ છે અને સ્પોર્ટમાં પણ ઘણું નામ ક્માંવેલું છે। ભારત ભરમાં સ્પોર્ટમાં રીપ્રેઝેન્ટ  કરેલું  છે.સુવર્ણ પદકો  મેળવેલા છે।"  આવા શબ્ધ કાનમાં યાદ આવ્યા। પછી એન્ગેજમેન્ટ થી લગ્ન સમય , આ  અવધી  એટલે સુવર્ણ  કાળ  . જવાબદારી નહિ , તયાર  થવું ,હરવું ફરવું , હોટેલ  જવું , ખરેદી કરવી , આરામ થી નૌકરી  કરવી અને  ઘંટો  ગણિક  આવતી કાલના   સ્વપ્નોને  મનમાં વિચારતા બેસવું, કોક વખત બગીચા માં બેસી, તો કોક વખત રેતીમાં લીટા મારતા નદી કિનારે બેસી, બન્ને જણાએ ગપ્પા કરતા કરતા વીતેલી ઘણી સંધ્યા કાલ   ચિત્ર પટ  જેવી આંખો સામેથી  સરી .
         પછી  નક્કી થયેલા સુમુહર્ત  પર બે કુટુંબનું મિલન થયું । એક   ઘરની દીકરી, બીજા ઘરની મોટી
સ્નુષા કે ,વહુ તરીકે મેં ઘરમાં પ્રવેશ કર્યો।  નૌકરી ના  કારણે  અમારો ઘરસંસાર  બીજા ગામે કરવો પડ્યો। એટલે ઘરમાં રાજારાણી નું રાજ હતું। પોતાના મન  પસંદ થી ઘર લગાવતા નાન પણ માં  ઘર-ઘર રમતા દિવસ   યાદ આવ્યા। એક એક કરતા પુર્ણ સંસાર સુખ વસ્તુઓથી  ભરાઈ ગયો। પણ એ સંસાર લગાવતા બન્નેએ એક બીજાને આપેલી અને એક   બીજાથી મેળવેલી   સાથ , કોક વખત કરેલી કરકસર,   તો કોક વખત અમથા ઘરેલા  સ્ત્રી હટ્ટ ( હવે એ અમથા કે ખોટા કરેલા હટ્ટ લાગે છે)  પણ એ વખતના ખોટી જિદ્દ કરેલા  દિવસો  અને પછી એ જિદ્દ ના  કારણે રિસાઈ જઈને રાખેલો અબોલો , કોક વખત વાદ- વિવાદ અને છેવટે રડીને કરેલું સમાપન ,યાદ આવ્યું ,પણ લગ્ન વિધિમાં સુખી સંસાર ના, ગોર મહારાજાએ  કહેલા, સમજાવેલા સપ્તપદી એટલે  કયા સાતપગલા( સંયમ, સહનશીલતા, તડજોડ ,વિનય, ત્યાગ )વગૈરે સાત પગલા કોક વાર એમના પાસેથી તો કોક વાર મારા તરફથી  સહેજ તાથી અપનાવી ગયેલા પગલા પણ યાદ આવ્યા।
         આવી રીતે  સપ્તપદીની  વાટ ચાલ કરતા સંસારરૂપી  વેલી  પર પહેલું પુષ્પ ખીલ્યું। પછી તો એ પ્રથમ પુષ્પ ને  ઉછેરવામાં એના લાડ કરવામાં બન્નેનું  જીવન રસપ્રદ થયું। નવા  પુષ્પ ના લાડ લડાવવામાં એને   ઉત્તમ સંસ્કાર આપવામાં બંને કુટુંબના વડીલો  તત્પર , કાર્ય દ્ક્ષ હતા।  બન્ને  કુટુંબમાં એ પહેલું વહેલું મન રીઝવનાર હતું। આવી રીતે  સમય  આનંદ, સુખમય   વિતાવતા, સહજીવનના વેલી પર બીજું પણ  પુષ્પ ખીલ્યું  .પછી તો બન્નેને ધ્યાન આપી, નૌકરી કરીને, ઘરદાર  સંભાળી ,ઘરે   આવેલા મહેમાનોની  ખાતેદારી  કરી,  કોક વાર સામાજિક તો કોક વાર કૌટુંબિક પ્રસંગમાં  ભાગ લઈને, સંસાર કરતા એક બીજપાસે  જાણતાં  અજાણતા   ધ્યાન આપવાના ઓંછાં પડતા, એક બીજાની  મુશ્કીલી  ન સમજતા અરસપરસ   ધ્યાન આપવાના પડેલી તકલીફ ,(હા હવેનું  ગતિશીલ  જીવન છે ને ) એને  કારણે એકબીજામાં   થયેલા   શાબ્દિક    વાદ,    ચર્ચા  પછી   બન્નેનાં  ઊચાં  અવાજે  પણ  બોલેલા, થયેલા  સંભાષણો  અને છેવટે કોક વાર  ,ના...  ના, કોક વાર શાનું કાયમજ।  " પડ્યું પાનું નીભાવાનું" એમ કહેતા પુરા કરેલા વાદ્  ઝગડા પણ યાદ આવ્યા। હા ,મને નથી લાગતું  વાસણને વાસણ ન લગતાકોઈનો પણ સંસાર થતો હશે। કારણ ક્યાંય બે વ્યક્તિ સાથે આવે તો  વિચાર મતભેદ થાય અને થાયજ। ત્યારે કોક વાર તો કંટાળીને ,"હું તો કંટાળી આ સંસાર થી ,ક્યાંથી  આ લગ્ન કર્યું  અને આ વ્યાપમાં  સપડાઈ ગઈ .એના કરતા લગ્ન પહેલાનું જીવન કેટલું સારું હતું ।કેટલું મજાનું હતું। કોઈને પણ મને શું ત્રાસ પડે છે  એના સામે ધ્યાન આપવા કે સમજવા  સમયજ નથી। સાદા બે મીઠા શબ્ધ ની તો અપેક્ષા કરવાનીજ નહિ,ફક્ત દોષ અને ભુલોજ બતાવવાની।એવી રીતે કહેતા, આંસુ કાઢતા ઊંઘી ગયેલા રાત્રી પણ યાદ આવ્યા।  પણ સવારે જોઈએ તો એમને પોતેઉઠીને ચાય બનાવીને પ્રેમથી દીઘેલી સાદ, કાન પર આવતા,ગયા  રાત્રિનું સર્વ  ભુલી જઈને ફરીથી પૂર્વવત સવારના કામમા વ્યસ્ત   થઇને બંને જણાએ  ઓફીસ જવા માટે  હસતમુ ખે  લીધેલી , સવારની  વિદાય  ,પણ યાદ આવી.
           સંસારમાં સ્ત્રીને એની  છોકરી કે દીકરી થોડા સમય પછી બેનપણી જેમ હોય છે। સ્ત્રી પોતાનું બાળપણ દીકરીના બાળપણમાં જોતી હોય છે।  એના લાડ , એના હોસ મોજ પુરાવવામાં , એને તયાર કરવામાં સ્ત્રીપોતાને   જોતી  હોય છે। પોતાની બધી નાનપણની રહેલી ઈચ્છાઓ ,દીકરીની ઈચ્છાઓ પુરી ક્ર્વામાં  સમાધાન મેળવતી હોય છે .અને છેવટે  કન્યા દાનનું પુણ્ય મળે  છે, એ જુદુજ . દીકરી માટે એ "પિયર" નામનું  ઝાડ કે  વૃક્ષનું  જતન કરતી હોય છે।  અને મને પણ કન્યા રત્ન  પ્રાપ્ત  થયેલ છે  એટલે કન્યા દાનનું  પુણ્ય   હું  મેળવવાની છું  આ વિચારથી  હર્ષિત આનંદિત  થઈ।
           હવે  આ સંસાર વૃક્ષ  પૂર્ણ  વિકસિત થયેલો છે।  સાચે જોઈએ તો   નવા સગપણની  એટલે  કે સાસુ બનવાના  દિવસ પાસે આવ્યા છે। મારા કાલનાં  નાના ભૂલકાઓ  જ્ઞાની  સજાણ  થયા છે .એમને  પણ સ્વતંત્ર વિચાર શક્તિ  પ્રાપ્ત થયેલી  છે.  હવે એમના વિચાર, એમના મત સાંભળી   અને આગળ તો નવી આવનાર ગૃહ લક્ષ્મીને ધર  સોપી એમના લાડ કરવા , મોટા  મનની,  દિલની તયારી  કરવીજોઈએ.અત્યાર સુધી પોતાના સંસાર માં રમમાણ  થયાના કારણે  સમાજ , સમાજ સંસ્થા , સમાજ કાર્ય સાથે સમરસ થવા  ફાવ્યું નહિ , કે સમય ન મળતા  થયું નહિ। એવીજ રીતે કોક વાર આર્થીક  કે તો કોક વાર કૌટુંબિક જવાબદારીથી આ સુંદર જગત જોવાનું , ફરવાનું નિહાળવાનું બાકી રહી ગયું તો હવે પર્યટન કરવું જોઈએ।
        આવા વિચારોની તંદ્રીમાં હું ખોવાઈ ગઈ।  એટલામાં   બારણાની   બેલ  2-3 વખત કોઈકે  મારી
વગાડી એવું લાગ્યું  દોડતા જઈને  બારણું ખોલ્યુ  તો "એ "  બારણામા ઊભા હતા।
          અમને પુછ્યું , "શું કરતી હતી। હું ક્યારનો  બેલ  વગાડું છુ , ઉંઘેલી  તો લાગતી નથી , તો શું દીવા
સ્વન્પ જોતી હતીકે?
         મેં  હસતા જવાબ આપ્યો  ,'  ના ના। હું છે ને આપણા  વિતાયેલા  સહજીવન  ને ફરીથી અનુભવતી હતી" અને હવે  ભગવાન ને , ઈશ્વર ને પ્રાર્થના  કરું છું  કે મારા આ વૈભવ રૂપી  સંસારને  નજર ના લાગે।



बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

janiv

                                                                 जाणीव
                                     आपुलकी ,सदभाव , अस्तित्व ,करुणा,
                                     विविध भावना  असती मनाच्या.
                                     तशीच   जाणीव  ही मानसिक संवेदना
                                     पण भासते  जाणिवेची  उणीव ता     
                                                    जाणीव  असावी केलेल्या  प्रेमाची,
                                                    आई वडिलांच्या  प्रेमळ छत्राची,
                                                    भर भरून दिलेल्या मायेची,
                                                    पण, नुरते जाणीव पाल्यांची
                                     जाणीव ठेवावी मातेच्या उपकारांची,
                                     काळजाच्या तुकडा सम जपल्याची,
                                     बोट धरून उभे केल्याची,
                                     पण, विसर पडतो त्या जाणीवेचा .
                                                  जाणावी, जाणीव निसर्गाची ,
                                                  निसर्ग दत्त वायू जलाची ,
                                                  नैसर्गिक बदलत्या ऋतुचक्राची ,
                                                  पण, नसते जाणीव  पर्यावरणची  
                                   जाणीव ठेवावी प्रभू अस्तिवाची ,
                                   तयाने बनविलेल्या नभ-ता-यांची ,
                                   नित नियमित उगवण्या-या  रविची ,
                                  पण , जाणीव न रहाते प्रकृति  कर्माची .
                                                 जाणीव मात्र असते स्वकष्टाची ,
                                                 कयासाने कमविलेल्या धनाची ,
                                                 पराकाष्ठेने  मिळविलेल्या कीर्तिची ,
                                                 पण ,सदैव वसते जाणीव स्व त्वची .            
                                 जाणीव  नसते  नुसती मानवात ,
                                 तर वसते  ती प्राणी मात्रात ,
                                 उगीच का घार उडे आकाशात
                                पण ,चित्त  असे तिचे पिल्लात
                                                        
                  
                                    
                                    

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

कारण. कारणात खरोखर जग जगते

                                                             कारण
                         कारणात   खरोखर जग जगते
                         आघी कारण, मग कार्य घडते
                         कारणात   खरोखर जग जगते
                               जन्मा कारण , मरणा कारण
                               कर्म जरी असावे, फ़ल  निरपेक्ष
                               कारण मात्र असते, करण्या कर्म
                               हर कर्म, कारणानेच घडते
                          कारणात खरोखर जग जगते
                               कर्म न करण्या, पण  कारण
                               म्हणोनी जन, वदति  जनात
                               न करत्याचा असे ,वार शनवार
                               कर्म विनमुखास,  हवे कारण
                          कारणात खरोखर जग जगते
                              पानिपतात का अपयश ,  कारण
                              उतरत्या छपराची का घरे, कारण
                              विज्ञानात द्या  वैज्ञानिक , कारण
                              कारणांची नामावली, वाढते
                         कारणात  खरोखर जग जगते
                              घरात कारण,कचेरीत कारण
                              उशीर होता हवे ,साजेसे कारण
                              समाधान न होता , कारणाचे
                              त्रेधा  तिरपिट ,  मग उडते
                        कारणात खरोखर जग जगते








गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...