शिकवण
ऐ ," मला शिकवण देऊ नकोस हं ! मला माहित आहे आणि कळतय पण, काय करावयाचे ते. जरा काही झाले की , तुझा शिकवणीचा पाठ सुरु . म्हणे शिका आमच्या कडून . अगोदर स्वत: ने काय केले ते पहा .शिकवण देणे सोपे आहे . " असे संवाद वारंवार घरा- घरातून ऐकू येतात. कोणास पण शिकवण दिलेली आवडत नाही . सूचना, उपदेश, साधे बोलणे वा सुचित करणे शिकवणीत जमा होते . खरे पहिले तर शिकवण घेणे मोलाचे असते. पण आम्हास माहित आहे अथवा मला माहित आहे ची भावना मनात घर करून असते . त्यामुळे अहंभाव जागृत होतो. वा आड येतो.
तसे पहिले तर प्रत्येक माणसाची त्याच्या आईची शिकवण ही पहिली शिकवण असते .अगदी बोट घरून उभे करून चालण्यास शिकवण्या पासून संस्काराची बाळगुटी पाजून, प्रत्येक माता बालकास उत्तम संस्काराची शिकवण देते . ज्या शिकवणीच्या जोरावर जीवनाचा डोलारा उभा रहातो . पुढे गुरुजनांची शिकवण जीवन नौका तरून जाण्यास मदत रूप ठरते . एवढेच नव्हे तर शिकवण घेता घेता मित्रांची मैत्री रुपाची शिकवण पण खूप काही शिकवून साथ देते, तर एकजुटीची शिकवण समाजा कडून प्राप्त होते .
निसर्ग तर क्षणा क्षणाला न बोलता शिकवण देत असतो . साधा सूर्यच पहा ना रोजच नियमित पणाची शिकवण देतो . फुले, पाने, वृक्ष , नदी सागर सर्वच आपापल्या परीने माणसास शिकवण देतात . आणि मनुष्य पण या निसर्गातून शिकवण घेत असतो व त्याला स्वत:च्या जीवनात मानसिक आघार मिळतो .
मुकी जनावरे जी अवती भवती आपल्या फिरत असतात ती पण शिकवण देत असतात . मानव स्वता:ला मेंदू असल्याने महान समजतो . पण त्याला मुके जनावर कुत्रा, तो पण मालकाशी इमानदारी कशी बाळगायची याची शिकवण देतो . साधे कीटक, मुंगी मध माशी काय, सतत उद्योगी रहा तर कोळी किटक स्वत:चे जाळे विणताना कितीदा पडला तरी हार न मानता प्रयत्नशील रहाण्याची शिकवण देतो.
तेव्हा आपण पदवीधर झालो ,मोठ्या पगाराच्या नोक-या मिळाल्या व सर्व भौतिक सुखे प्राप्त करून नामांकित झालो म्हणजे दुस-यांचे शिकवणीचे बोल ऐकावयाचे नाही असे नसते पण तेथे आड येतो तो अहंभाव .
तसेच अनुभवाने मिळालेल्या ज्ञानाचे शिकवणीचे पाठ प्रत्येक पुढचा मागच्यास देत असतो . ती अनुभवाने जास्त उन्हाळे पावसाळे पाहिल्याची अथवा स्व:ताने अनुभवलेल्या ज्ञानाची शिकवण असते म्हणूनच तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे म्हणतात . ते काय उगीचच . तेव्हा अनुभवाने पण शिकवण मिळते त्याचा फायदा घेतला पाहिजे . व आपण तो घेत असतो . असेच अनुभावाचे बोल काही जण लिहून काढतात ती पुस्तके लिखाण रूपाने आपणास शिकवण घेण्यास उपयोगी ठरतात . साधे सोप्या भाषेत लिहिलेले रामदासांचे मनाचे श्लोक आधुनिक काळातील गीता च आहे .
शिकवण ही अगदी अनादि काळापासून चालत आली आहे . कृष्ण सुदामांनी सांदिपनीच्या आश्रमात जाऊन तर राम लक्ष्मण यांनी वसिष्ठ मुनींच्या आश्रमात जावून शिकवण घेतली .त्या काळी गुरु घरी जावून शिक्षण घेत व त्या शिक्षणाची , शिकवणीची गुरु दक्षिणा देत . तेव्हा आपल्या संस्कृती त पण "गुरु पौणिमा"गुरुनी दिलेल्या शिक्षणाची कृतध्नता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा करतात .
तसेच धर्म म्हणजे तरी काय ? प्रत्येकाच्या रोजच्या जीवनातील चाली रिती . तेव्हा कुठला ही धर्म असो पंथ असो सर्व धर्माची शिकवण एकच असते . प्राणीमात्रांवर प्रेम करा , दया भाव ठेवा , विश्वबंधुत्वाची भावना मनी ठेवा ,चोरी करू नका, असत्य, दंभ ,मत्सरी पणा, अहंकृती सोडा . म्हणजे सर्व धर्माची शिकवण एकच असते आपल्याला संत लोकांनी पण तीच शिकवण दिली आहे . त्या शिकवणीच्या जोरावर आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुतली आहेत. कुठल्याही पंथात संतानी सांगितले की
नको हेवे दावे ,नको भेद भाव ।
सर्व धर्म समान , सांगे संत वाणी ।।
महाभारतातच पहा ना ! भर रणांगणात, कुरुक्षेत्रात आपलेच बांधव पाहून, युद्धापासून विन्मुख झालेल्या अर्जुनास श्री कृष्णाने जीवनाचे सार , तथ्य सांगितले . तीच महान 'गीता' आज आपणा सर्वांना जीवन तरून जाण्यास बोध रूपाने अमृतमय 'शिकवण 'आहे .
तेव्हा शिकवण ह्या शब्दाचा राग न करता अहंभाव दूर सारून शिकवण घेतली पाहिजे व तशीच दिली पण पाहिजे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा