स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित
झटपट काव्यलेखन स्पर्धा
विषय सरत्या वर्षाने काय दिले
विचार करता मनी
काय मिळाले गत वर्षात
दिले सुख आनंद वर्षभर
दिले यश लिखाणात
बृहन्महाराष्ट्र साहित्य संमेलनात
सादरीकरणास आले आमंत्रण
सागरात बोटीवर साहित्यिकांनी
केले मजेत कवितेचे वाचन
पलपब पालघर समूहाने
दिधला पुरस्कार मजला
सन्मानिले साहित्यास
आनंद मनी जाहला
राम आले परत स्वगृही
मंदिर उभारले शोभिवंत
सारे जन आनंदले
भारतीय सारे भाग्यवंत
देऊया हर्षाने ऊत्साहाने
निरोप सरत्या वर्षाला
जिंकली पदके खेळाडूंनी
उधाण आले जगाण्याला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा