बुधवार, १५ जानेवारी, २०२५

आठवणीच्या गावामध्ये




 सिद्ध साहित्यिक समूह 

आयोजित उपक्रम क्रमांक ५७०

मुक्तछंद काव्य प्रकार 

विषय.  आठवणीच्या गावामध्ये 

    शीर्षक.. ताज्या झाल्या आठवणी


जुनी जुनी  छायाचित्रे 

 पहात होतो बसलेलो

गेले आठवांच्या गावी

 भान वेळेचे नुरले 


आठवणीच्या गावात

गेले क्षणात रमून 

कसे होतो  ना आपण! 

हसू आले आता स्मरून


रम्य  जुन्या दिवसांची

झाली मज आठवण

जेथे प्रथम भेटलो आपण

केली मनी साठवण



किती केलेस  नखरे

 कधी नसे  तू वेळेवर

मात्र  मी असे उभाची  

 तुझ्या भावा बरोबर.


हात तुझा माझ्या  हाती

दिली घेतली वचने जोडीने

भासली हसलेली सुमने

पाहुनीया त्या प्रीतीने



छाया चित्र सांगे कानी

कसे  होईल विस्मरण

तुझ्या  माझ्या  मनातली

राहील सदा आठवण


बाहेर आलो आठवणीतून 

 तृप्त  समाधानी मनाने

 उन्हात पण चांदणे हसले

देवाजीच्या कृपाप्रसादाने 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...