शुक्रवार, २ जुलै, २०२१

सहाक्षरी.. तुझी माझी मैञी

तुझी माझी  मैत्री 


ध्यानी मनी नाही
नजरेत आली
तुझी माझी  मैत्री 
 कधी कशी झाली      1
               

प्रथम दर्शनी
पहिलीच भेट
भावली मनात
हृदयात थेट                2


सावरणे बट
आवडली अदा
पाहून अदेला
झालो मीच फिदा        3

मधुर बोलणे
दावणे विनय
लागली मनाला
 नित्याची   सवय            4    


तुझी माझी  मैत्री 
ती जिवाभावाची
भेटण्या शिवाय
दिन न जाण्याची             5

आहोत आपण
खरे  मित्र छान
सदाची जीवनी
ठेवू मैत्र मान

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

परिचारिका

जगाचा पोशिंदा समूह आयोजित उपक्रम  दि ७\५\२६ विषय परिचारिका  सेवा रूग्णांची करणे गुणाने असे मायाळु नसे ठाऊक आराम स्वभावाने ती दयाळु परिचारिका...