जीवन गौरव साहित्य परिवार महाराष्ट्र राज्य
मराठी काव्यलेखन स्पर्धा
*जीवन गौरव साहित्य परिवार स्पर्धेसाठी*
विषय - समतेच्या शोधात
शीर्षक - *विश्वची कुटुंब*
ठेवू भाव एकात्मतेचा
नाते राखूया बंधूत्वाचे
दिधले आभाळ एक ची छत
जपण्या नाते विश्व कुटुंबाचे 1
दीन अती पतीतांना साथ
उच नीचतेला नको मनी ठाव
सर्वा देवू मदतीचा हात
मनी जपूया समतेचा भाव 2
ठेवू जाण आपण सारे बांधव
मानवता हाची खरा धर्म
एकदुजांना करुनी सहाय्य
प्रेम देणे जगताला हेची कर्म 3
दिधलेली संतांची शिकवण
आहे महान संस्कृतीचा आरसा
नुरते फिरणे *समतेच्या शोधात*
असता विश्व-कुटुंब भावनेचा वारसा 4
सौ. वैशाली वर्तक
अहमदाबाद ( गुजरात)
मो नं 8141427430
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा