सोमवार, २८ जून, २०२१

विश्वासाचा धागा

शब्दरजनी समुह 
आजचा उपक्रम

विश्वास एक धागा

  

विश्वासाचा एक धागा
करि जीवन प्रशस्त 
नसे विश्वास जीवनी
तर आयुष्य उध्वस्त 


धागा अतूट विश्वासाचा
सुखी संसारास  खास
कधी न व्हावा कमजोर
 मग ,बंध रेशीम हमखास

टाके बालक   पहिले पाऊल
बोट  घट्ट् आईचे धरुन
पूर्ण  विश्वास असे तयाचा
घेईल तीच  नक्की   सभाळून
.
विश्वासाने सदा उचलावे
जीवनात  एक एक पाऊल
परिश्रमाच्या साथीने
मिळेल यशाची चाहुल

दृढ धागा विश्वासाचा
ठेवा मनी देवावर 
 कोरोनाला घालवू आपण
आपल्या आत्म बलावर


वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...