" यारिया साहित्य कला समूह
विषय -- सप्तरंगी इंद्रधनू
सप्तरंगी इंद्रधनू
असे रवीची किमया
रवी किरण निघती
जलधारा पहावया
उन पावसाचा चाले
जणु लपंडाव खेळ
रवी पाही डोकावूनी
जमे इंद्रधनू मेळ
शोभे आकाशी तोरण
नभ मंडप खुलला
सात रंगाच्या फुलात
इंद्र दरबार सजला
तूच खरा चित्रकार
जादु असे हमखास
भासे बांधियला सेतू
अवनीस भेटण्यास
अशी आहे निसर्गाची
काही विशिष्ट महत्त्व
मुखातून निघे शब्द
आहे तुझेच श्रेष्ठत्व
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा