शब्द अंतरीचे ग्रूप
स्पर्धेसाठी कविता अगदी पहिली( .
अष्टाक्षरी
काळ्या मातीला कसून
अष्टाक्षरी
काळ्या मातीला कसून
बळी करे काम फार
घाम गाळून शेतात
केली शिवारे तयार
मृग नक्षत्र लागता
मेघ आभाळी दाटती
नभा कडे पाही धरा
वाट चातक पाहती
सर पडता मृगाची
बीज अंकूर फूटती
कोंब डोकावून पाही
मन आनंदे डोलती
काळ्या मेघांच्या गर्जना
थंड गार वाहे वारा
पक्षी झेलती सरींना
मोर फुलवी पिसारा
शेते दिसती हिरवी
किती सुंदर आखीव
जणू रेखाटल्या कोणी
ओळी हिरव्या रेखीव
झाला सुरू वर्षा ऋतू
कोणी म्हणती बरवा
धरा भासे नव वधू
शालू नेसली हिरवा
........ .. .. वैशाली वर्तक
केली शिवारे तयार
मृग नक्षत्र लागता
मेघ आभाळी दाटती
नभा कडे पाही धरा
वाट चातक पाहती
सर पडता मृगाची
बीज अंकूर फूटती
कोंब डोकावून पाही
मन आनंदे डोलती
काळ्या मेघांच्या गर्जना
थंड गार वाहे वारा
पक्षी झेलती सरींना
मोर फुलवी पिसारा
शेते दिसती हिरवी
किती सुंदर आखीव
जणू रेखाटल्या कोणी
ओळी हिरव्या रेखीव
झाला सुरू वर्षा ऋतू
कोणी म्हणती बरवा
धरा भासे नव वधू
शालू नेसली हिरवा
........ .. .. वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा