सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

धावपळ सकाळची

 भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक

आयोजित उपक्रम क्रमांक ३१

विषय. सकाळची धावपळ

   घाई सकाळची


आधीच कंटाळा उठण्याचा

निवांतपणा नसे मनाला 

कामे कशी, कधी आटपून

धावणार नित्य कामाला


सकाळच्या साखर झोपेची 

गोडी मजा वेगळीच काही

 पण चहा ,टिफीन ,डबे भरा

यात फुरसतच मिळत नाही 


कशी बशी आटपा अंधोळ

नजरेत दिसे हजरी पत्रक

तीन शेरे लेट मार्क चे

असतात चित्त वेधक


नको वाटे कोणाचे येणे

क्षण क्षण  वाटे मोलाचा

फालतु वेळ मिळत नसे

सकाळचा वेळ धावपळीचा


वैशाली वर्तक

अहमदाबाद

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

परीक्षा

 सिद्ध साहित्यिक समूह

आयोजित उपक्रम क्रमांक 496

विषय...  परीक्षा


सुरू होतेची परीक्षा

येता  मानव जन्माला

बालपणी मायबाप

देतात उभारी मनाला


होतो मोठे जीवनी

देतो परीक्षा अनेक

उत्तीर्ण करून यशाने

येतो पुढे पाऊल , एकेक



सांभाळीत संयमाने

गृहस्थाश्रम सदाकाळ

देत परीक्षा करीतो

सदा आनंदी सकाळ


अहो सीतामाईला कुठे

परीक्षा  होती चुकली

अग्नी परीक्षा देऊन

पंच कन्येत  नाणे उजळली


परीक्षा करिते मोजमाप

 मिळविलेल्या अनुभवाचे 

 काय शिकलात जीवनी

 चुका सुधारून वागण्याचे



वैशाली वर्तक

अहमदाबाद

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

धीर देणारी कविता

साहित्य तेज मधे



 

     *नको मनी भ्रांत*

सायबर क्राईम पेपरा त


आली परीक्षा  तोंडावर

 म्हणतोस तू येत नाही

कसे होणार तुझे आता 

चिंता मनी खात राही


नको होऊस निराश तू

नाही इतकाsही मंद  मती

शांत चित्ते कर वाचन

येईल स्मरणात गती.


अजून वेळ गेली नाही

उठ सकाळी लवकर 

कर महेनत हुशारीने

प्रातःकाळ असे सुंदर 



आण  ध्यानी काल वाचलेले

मग घे पठणाचा ध्यास

येतय  मजला वाटेल मनी

वाढेल  तुझा आत्म विश्वास .


  नाही तुझा  स्वभाव धांदरट

चित्त   ठेव  सदैव शांत 

केलीय शेवटी ...का होईन

नकोच  आणू मनी  भ्रांत


वैशाली वर्तक

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

कळी

मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम
विषय.. कळी
      *कळीचे फूल*

होती काल सांजवेळी
ताठरलेली बंद कळी
येता रवीराज नभी
 खुले पाकळी पाकळी

रंग सुंदर गुलाबी सर
पर्णे बाजुला गोलाकार
आत गर्दी पराग कणांची
पाकळ्या खुलल्या रंगदार

उमललेली कमलदले
दिसती किती मोहक
भ्रमर आलीच समीप
रूप कमळाचे चित्त वेधक

मंद शीतल पवनाने 
कमळ अलवार डुले 
बागेतील तळ्याची शोभा
कळीचे फुल होता  खुले .

वैशाली वर्तक
 अहमदाबाद

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

धुंदी ( अष्टाक्षरी). विसर पडणे

नक्षत्र वेल  साहित्य  समुह आयोजित 
*धुंदी*

 धुंदी मधु सेवनाची
फुलासवे प्रणयात
राही सदा भ्रमरास
दंग राही गुंजनात

कुठलाही छंद जीवा
  तोची  लागता मनास 
रममाण रहाण्यात
मिळे आनंद तयास

कलाकारास  चढे धुंदी
  सदा अभिनयाची मना 
भुक तहान विसरे
वेड लागे तयाच्या तना

भक्तीरसात विसरली
  मीरा कृष्णाच्या प्रेमात 
झाली एकरुप मने
धुंद ती कृष्ण रुपात

वैशाली वर्तक

गझल....... सौदामिनी तिरंगा/. सौदामिनी बळीराजा/


तिरंगा.  २१\२\२

लगागा लगागा लगागा लगा


 फडकता स्वतेजे असावा तिरंगा

जगी सौख्यदाता ठरावा तिरंगा.        १


कधीही लहरता पहावा तिरंगा.   

सदा झळकताना दिसावा तिरंगा.      २


तिरंगा पहाता मनी   हर्ष वाटे 

 जगाने फडकता पहावा तिरंगा          ३


असे तो  महा सोहळा   भारताचा

मनातून सन्मानित हवा तिरंगा.           ४


 दिसे याच  दिवशी हर घरी तिरंगा

असाची फडकता रहावा तिरंगा.         ५


सलामी विनम्रे  तिरंग्यास द्यावी

  सर्वदा   मनी आठवावा तिरंगा.        ६


         वर्ल्ड व्हिजन टाईम्स मध्ये 26/5/26                                   


सौदामिनी बळीराजा 
लगागा लगागा लगागा लगा

जरी  धाम देवा तुझे पंढरी
पहातो तुला मी सदा अंतरी 

कधी ऐकतो मी तुझी बासरी
पहातो सदाची अदा हासरी

कशाला बसावे सदा मंदिरी
खरा देव पहावा शिवारी तरी

कितीही  झिजतो शिवारी तरी
जलाची अपेक्षा  सदा अंतरी          

शिवारे बहरली  बळीची जरी
तरी पोर पत्नी  उपाशी घरी

अशी ती कहाणी बळीची खरी
नशीबी सुखाची नसे भाकरी



वैशाली वर्तक
अहमदाबाद 


बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

गीत.... पुन्हा कधी भेटणार

लेखणी माझी  देखणी
काव्य लेखन महा स्पर्धा
फेरी क्रमांक3 गीत लेखन

पुन्हा  कधी भेटणार
अक्षर संख्या  16  यती 8 

पुन्हा  कधी भेटणार, ओढ लागली जीवाला
गुज मनीचे सांगण्या, धीर नुरला मनाला             । धृपद

किती वाट रे पाहू मी, तुज कळेना कधीच 
वाट पाहूनी शिणले , माझे नयन आधीच 
कसे कंठु दिन सारे , समजेना या क्षणाला
गुज मनीचे सांगण्या, धीर नुरला मनाला                  1


भावगर्दी आठवांची, मनी (आली) जणू  दाटलेली
एकांतात  (तुज संगे )रहाताना , सय तुझी साठलेली.  तुजविण रहाताना सय तुझी स्मरलेली
कधी येशील भेटण्या , तूची सांगना मजला
गुज मनीचे सांगण्या, धीर नुरला मनाला                2


येता आठव प्रेमाची, मन वेडे मागे पाही
नकळत पाणावता , पाणी डोळ्यातून वाही
ओठी आलेला हुंदका, आज ओठात आटला
गुज मनीचे सांगण्या, धीर नुरला मनाला        

कोड नं

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...