गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

धीर देणारी कविता

 आली परीक्षा  तोंडावर

 म्हणतोस तू येत नाही

कसे होणार तुझे आता 

चिंता मनी खात राही


नको होऊस निराश  तू

नाही इतकाही मंद  मती

शांत चित्ते कर वाचन

येईल स्मरणात गती


अजून वेळ गेली नाही

उठ सकाळी लवकर 

कर महेनत हुशारीने

प्रातःकाळ असे सुंदर 



आण  ध्यानी काल वाचलेले

मग घेशील पठणाचा ध्यास

येत आहे मजला वाटेल मनी

वाढेल  तुझा आत्म विश्वास 


  नाही तुझा धांदरट स्वभाव

चित्त   ठेव  सदैव शांत 

केलीय शेवटी ...का होईन

नकोच  आणू मनी  भ्रांत


वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...