तिरंगा. २१\२\२३
फडकता स्वतेजे असावा तिरंगा
जगी सौख्यदाता ठरावा तिरंगा. १
कधीही लहरता पहावा तिरंगा.
सदा झळकताना दिसावा तिरंगा. २
तिरंगा पहाता मनी हर्ष वाटे
जगाने फडकता पहावा तिरंगा ३
असे तो महा सोहळा भारताचा
मनातून सन्मानित हवा तिरंगा. ४
दिसे याच दिवशी हर घरी तिरंगा
असाची फडकता रहावा तिरंगा. ५
सलामी विनम्रे तिरंग्यास द्यावी
सर्वदा मनी आठवावा तिरंगा. ६
सौदामिनी बळीराजा
लगागा लगागा लगागा लगा
जरी धाम देवा तुझे पंढरी
पहातो तुला मी सदा अंतरी
कधी ऐकतो मी तुझी बासरी
पहातो सदाची अदा हासरी
कशाला बसावे सदा मंदिरी
खरा देव पहावा शिवारी तरी
कितीही झिजतो शिवारी तरी
जलाची अपेक्षा सदा अंतरी
शिवारे बहरली बळीची जरी
तरी पोर पत्नी उपाशी घरी
अशी ती कहाणी बळीची खरी
नशीबी सुखाची नसे भाकरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा