गुरुवार, २४ जून, २०२१

सप्तरंगी इंद्रधनू

" यारिया साहित्य  कला समूह
विषय -- सप्तरंगी इंद्रधनू

सप्तरंगी इंद्रधनू 
असे  रवीची किमया
रवी   किरण निघती
जलधारा पहावया

 उन पावसाचा चाले
जणु लपंडाव खेळ
रवी पाही डोकावूनी
जमे इंद्रधनू  मेळ

शोभे आकाशी तोरण
नभ मंडप  खुलला
सात रंगाच्या फुलात
इंद्र दरबार सजला


तूच  खरा चित्रकार
 जादु असे हमखास
 भासे बांधियला सेतू
अवनीस भेटण्यास

अशी आहे निसर्गाची
काही विशिष्ट महत्त्व 
मुखातून निघे शब्द
आहे तुझेच श्रेष्ठत्व

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, २२ जून, २०२१

आईचा आशीर्वाद

 सावली प्रकाशन समूह

उपक्रम 

विषय - आईचा आशीर्वाद 



आई शब्दांत  जिव्हाळा

असे  प्रेमाचा सागर

लेकरांना देतसे ती

सदा प्रेमळ घागर


असो कुठली परीक्षा

आशीर्वाद  देण्या दारी

हाती घेऊनी साखर

तिचा हात सदा शिरी


सदा   करते  प्रयत्न  

लेकरांच्या यशासाठी

रान जीवाचे करते

उज्वल  भविष्या साठी



तिच्या आशीर्वादानेच

 यश मिळते  कामात

ठेवा लक्षात सदैव

तिचे ऋण जीवनात


तिचा शब्द  आशीर्वाद 

सदा धुमतात कानी

त्याच शब्द बळावर

 होते काम मन मानी



वैशाली वर्तक 

अहमदाबाद

1अष्टाक्षरी महादेव.../2अभंग / 3 सहाक्षरी

सावली प्रकाशन समुह आयोजित 
झटपट अष्टाक्षरी  काव्यलेखन स्पर्धा
विषय - हर हर महादेव
अष्टाक्षरी

भोळा सांब सदाशिव
तव नामाचा गजर 
ओम नमःशिवाय चा
चाले मुखी  निरंतर       1

कैलासीचा असे राणा
जटा गंगा तोची धारी
उमा पती सदाशिव
भव ताप दुःख  हारी         2

गौरी हर महादेव 
असे दयेचा सागर 
तव नामात सा-यांना
मिळे सुखाची घागर        3

गौरी  उमा महेश्वरा
सदा त्रिशुळ धारक
येता संकटात भक्त 
तूची तयांचा तारक         4

आला धावुनी मंथनी
विष तूची प्राशियले
कंठ तुझा होता नीळ
नीलकंठ  नाम झाले      5

वैशाली वर्तक
अहमदाबाद





शब्दरजनी साहित्य  समूह आयोजित
राज्य स्तरिय समूह महास्पर्धा
अभंग रचना
विषय - शिवस्तुती
            *महादेव*
पार्वतीच्या नाथा। गळा शुभ्र माळा  । 
विषे कंठ काळा ।  नीळकंठ  ।।          1

विभुती अंगासी  । विष अंगीकारी  । 
जटा गंगाधारी    ।  तूची देवा  ।।          2

होताची कोपीष्ट  ।  तांडव ते नृत्य । 
कलेत ते स्तुत्य  ।  तुझे देवा ।।             3

बारा ज्योतीर्लींगी  ।  तुझा असे वास । 
दर्शनाची आस ।    मनोमनी ।।             4

भोळा शिव सांब  ।  नामाचा गजर  । 
चाले निरंतर ।  सदाशिवा।।                 5

अर्धनटनारी  ।  रुप नटेश्वरा  । 
तुझे विश्वंभरा  ।  पहातसे ।।                6

शिवलीलामृत  ।  पोथीचे स्मरण । 
करीती वाचन  ।  पुण्यभावे  ।।             7


वैशाली वर्तक

अहमदाबाद















अ भा म सा प स्वप्नगंध समूह 
उपक्रम 19   षडाक्षरी
विषय -- गौरी हर शिव
        *भोळा सदाशिव*

भोळा सदाशिव
नामाचा गजर
मुखी शिव नाम
चाले निरंतर          1

गौरी हर शिव
दयेचा सागर
तव नामातच
सुखाची घागर        2

अर्ध नटनारी
रुप नटेश्वरा
गौरी हर शिवा
तुझे विश्वंभरा          3

कैलासीचा राणा
जटा गंगाधारी
उमा शिव  पती
भव दुःख  हारी          4

समुद्र  मंथनी
विष प्राशियले
नीलकंठ नाम 
प्रसिध्द जाहले               5

गौरी हर शिव
त्रिशुळ धारक
तूची संकटात
भक्तांचा तारक          


वैशाली वर्तक

रविवार, २० जून, २०२१

बाप. बापाची माया/बापाची व्यथा


आ भा म सा प स्वप्नगंध समूह 
विषय - बापाची माया
    

येते जरी नाव  मुखी 
आईचेच सदाकाळ
माया बापाची देतसे
सदा सुखाची सकाळ

करी कष्ट घरासाठी
देण्या सुख लेकरांना
करी दूर हौस स्वतःची 
देण्या मौज  स्वजनांना

साथ देत गृहिणीला
ठेवी प्रेमभाव दृष्टी 
तोच देई कुटुंबास
फुले रुपी मोदाची सृष्टी 

नाही करिता विचार 
 कधी स्वतःच्या  सुखाचा
करी सहन यातना
फुलवण्या  संसाराचा

माया असते फणसासम
बाहेरूनी ती काटेरी
पण अंतरात भरलेली
रसाळ गोड  अनेरी

बाप असे कुटुंबाचा
सदा सर्वांना आधार
ज्याच्या जीवावर सारे
उपभोगी सुख फार

होतो आपण महान 
ऋण असती जीवनाचे 
देतो आशीर्वाद  सदा
रहाण्या सुखी समाधानाचे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच धुळे 
आयोजित उपक्रम 377
विषय... बापाची व्यथा
 शीर्षक..

 असे जीवन कष्टाळू 
तोची घराचा आधार 
त्याच्या जीवावर चाले
कुटुंबाचे व्यवहार 

पत्नी बाल्यांच्या गरजा
पुरविण्या सदा दक्ष
कष्ट साही तयांसाठी 
स्वतः कडे  ते दुर्लक्ष.

कधी जाणून न देता
कुटुंबाला ठेवी सुखी
माझे कुटुंबीय जन
मात्र न व्हावेत दुःखी

बाल्य असे जीव प्राण
 यशवंत होवो मनी आस
पण दु:ख येता ओठी
 आई शब्द हमखास 

 आईअसे मानाचं स्थान 
 बाप करी  कष्ट अपार 
 उभा राहतो निश्चल 
येता बिकट प्रसंग फार 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, १९ जून, २०२१

देवमाणूस

अ भा म सा प समूह 2
उपक्रम
विषय -- देव माणूस

देव वसे  प्रत्येकात
जसे होतेची सत्कृत्य
तेव्हा  तो देवमाणूस
 करी दानव दुष्कृत्य

  मदतीस सदा तत्पर
 गरजूंना दावी प्रेमभाव
 माणसुकी जपणूक
 तया द्वेष  नसे ठाव

पहा कामगार जन
केले देव काम कोरोनात
जोडीला नर्स डाॕक्टरांनी
केली सेवा रूग्णांची समाजात

संतानी करुनी सजाण
दिले ज्ञान सामान्य  जनास
दिले बोधक विचार ज्ञान
उमजण्या देव कर्मास

जिथे असे सत्कर्म 
तेथे वसे देवत्व
म्हणून संत सांगी सदा
कर्मात आसे प्रभुत्व 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

ठेवू भान निसर्गाचे

अ भा म सा प स्वप्नगंध समूह
आयोजित  उपक्रम
विषय- ठेवू भान निसर्गाचे

*निसर्ग  हाची देव*

नसे  दुजा देव कोणी 
निसर्गास  माना  देव 
 असे कर्ता करविता
तोच देई सुखाची ठेव

दिन क्रम चाले आज्ञेनुसार
येई नित्य सूर्य  नेमाने 
घडे दिनरात्र, ऋतुचक्र
पडे पाऊस , येई थंडी क्रमाने

स्वच्छ ठेवा वसुधेला
तरु वृक्षाचे महत्त्व माना
मग पहा बरसती धारा
जल हेची जीवन जाणा

 मानवा सह, जल चर प्राणी  
राखू  स्वच्छ  सरोवर सरिता
सारे अवलंबित जलावरती
आशीष रुपे पोशिंद्या करिता

 
आरोग्याची  घेत काळजी
स्वच्छ  राखण्या पर्यावरण
दक्षतेने *ठेवू भान निसर्गाचे*
सदा दूर होईल प्रदुषण


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अष्टाक्षरी दागिना

काव्यस्पंदन राज्य स्तरीय 02
आष्टाक्षरी रचना
विषय - दागिना

हिरे मोती सोनियाचे
आभुषणे आहे बरी
बाह्य रुप शोभविण्या
येती मदतीस खरी                1

हाती सुवर्ण  कंकण
शोभा देतसे हातास 
पण खरी शोभा दिसे 
जेव्हा पुढे तो दानास              2

विद्या असे जो दागिना
दडलेला हृदयात
नसे भय होण्या चोरी
भुषवितो जगतात                   3

विनयता आभूषण
सर्व  जगात महान
 मोल तयाचे सदैव
दागिन्यात  मौल्यवान             4

नाव कुळाचे राखिती
तेची दागिने महान
अशी बालके भुषणे
तोच खरा बहुमान           5
...........................वैशाली वर्तक

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...