विषय - बापाची माया
येते जरी नाव मुखी
आईचेच सदाकाळ
माया बापाची देतसे
सदा सुखाची सकाळ
करी कष्ट घरासाठी
देण्या सुख लेकरांना
करी दूर हौस स्वतःची
देण्या मौज स्वजनांना
साथ देत गृहिणीला
ठेवी प्रेमभाव दृष्टी
तोच देई कुटुंबास
फुले रुपी मोदाची सृष्टी
नाही करिता विचार
कधी स्वतःच्या सुखाचा
करी सहन यातना
फुलवण्या संसाराचा
माया असते फणसासम
बाहेरूनी ती काटेरी
पण अंतरात भरलेली
रसाळ गोड अनेरी
बाप असे कुटुंबाचा
सदा सर्वांना आधार
ज्याच्या जीवावर सारे
उपभोगी सुख फार
होतो आपण महान
ऋण असती जीवनाचे
देतो आशीर्वाद सदा
रहाण्या सुखी समाधानाचे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच धुळे
आयोजित उपक्रम 377
विषय... बापाची व्यथा
शीर्षक..
असे जीवन कष्टाळू
तोची घराचा आधार
त्याच्या जीवावर चाले
कुटुंबाचे व्यवहार
पत्नी बाल्यांच्या गरजा
पुरविण्या सदा दक्ष
कष्ट साही तयांसाठी
स्वतः कडे ते दुर्लक्ष.
कधी जाणून न देता
कुटुंबाला ठेवी सुखी
माझे कुटुंबीय जन
मात्र न व्हावेत दुःखी
बाल्य असे जीव प्राण
यशवंत होवो मनी आस
पण दु:ख येता ओठी
आई शब्द हमखास
आईअसे मानाचं स्थान
बाप करी कष्ट अपार
उभा राहतो निश्चल
येता बिकट प्रसंग फार
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा