रविवार, २४ मे, २०२०

सासर

उपक्रम
विषय - सासर



असते सासरी जवाबदारी
पेलावी लागते कौशल्याने
मिळते जागा हक्काची
राखता प्रेमभाव आनंदाने

 उजळविण्या दुसरे कुळ
 संधी असते मुलींना सासर
सप्तपदी ची पावले अनुसरता
मिळतो आयुष्यभर सुख सागर

अशी महती सासरची
जी टाके सासरी पाउल
समजून उमजून रहाता
लागती आनंदाची चाहुल

वैशाली वर्तक


येता सासरच्या घरी
केले आपलेसे जन
सुखी ठेवता सर्वांना
झाले समाधानी मन

काया झिजली दिलेली
मोदी तरी सदा मनी
माया देणारी सारीच



बुधवार, २० मे, २०२०

सांज अशी रंगू

शब्दरजनी साहित्य समुह
उपक्रम
विषय- सांज अशी रंगू दे

बसले होते एकटीच
सांजवेळी नदी तटावरी
किलबिलाट होता पक्ष्यांचा
परत फिरती तया कोटरी


वाट पहाते सखयाची
ओढ दाटे ही अंतरी
मन हे अधीर भेटण्या
कशी समजावू सांग तरी

घेईन तव हात हातात
स्पर्श होताची अलवार
मोहमयी तव हात
फिरेल मग हळुवार

 चंद्रा सवे रोहिणी
बघ आलीय   गगनी
घेशील तू मज जवळी
जाण्या स्वप्नात रंगूनी

वाटे सुखाच्या एकांतात
रातराणी धुंद बहरेल
तुझ्या माझ्या मिलनाने
 मम काया मोहरेल

वैशाली वर्तक

शुक्रवार, १५ मे, २०२०

विनवणी.ईशनाम

उपक्रमासाठी
ईशनाम
शिर्षक - विनवणी

देवा तुझे चरण असता
तुजवीण कुठे जाऊ आता

विनवणी ही तुजपायी
धाव रे मज तारण्याशी
तूची मजला तात माता
तुजवीण कुठे जाउ आता

तारण्या भव तापातून
मोद विहरावा विश्वातून
भव सागरी तिमीर दाटता
तुजवीण कुठे जाउ आता

आलासी तू वर देण्यासी
दिले अढळ पद तू तयासी
दृढ भक्ती   ध्रुवाची पाहाता
तुज वीण कोठे जाउ आता



वैशाली वर्तक.

V. गीत...भक्तीगीत नाम घेता (भक्ती गीत)


सिध्द लेखिका आयोजित
उपक्रम
  विषय-भक्तीगीत
वर्ण 12
     **नाम घेता**


नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे
करितो तोची सार्थक जीवनाचे

भुरळ पडे षडरिपूंची जिवा
तया नामे लागे अंतरीचा दिवा
क्षालन होईल वाईट कर्माचे
नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 1

बळे करिता चित्त कोठे रमेना
समाधान ते काही केल्या मिळेना
उठता मनीं वादळ विचारांचे
नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 2

मन अडले नित्य भव सागरी
कशा मिळतील सुखाच्या घागरी
मार्ग न दिसे जीवनी तरण्याचे
नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 3

तोची जगी असे कर्ता करविता
शरणची आले तुज भगवंता
लाभावे भाग्यची मज दर्शनाचे
नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 4


वैशाली वर्तक






शब्दसेतू साहित्य  मंच
उपक्रम
गीत लेखन प्रकार 1
  विषय-भक्तीगीत
वर्ण 12
     **नाम घेता**


नाम घ्यावे सदा ,मुखी राघवाचे
करितो सार्थक ,तोची जीवनाचे

भुरळ  पडे षडरिपूंची जिवा
तया नामे लावा अंतरीचा दिवा
क्षालन होईल  वाईट कर्माचे

बळेची करिता, चित्त ते रमेना
समाधान  काही , केल्याची  मिळेना
उठे सदा मनीं ,वादळ विचारांचे


मन अडकले  , संसार सागरी
कशा मिळतील ,सुखाच्या घागरी
मार्गची दिसेना जीवन तरण्याचे


तोची जगी असे, कर्ता करविता
शरणची आले , तुज भगवंता
लाभावे भाग्यची, मज दर्शनाचे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




बुधवार, ६ मे, २०२०

कट कारवाया

स्पर्धेसाठी
विषय- कट कारवाया
 शिर्षक-

राजकारणात चाले
कट कारवाई खेळ
सत्ता मिळविण्यासाठी
सदा येतेच ती वेळ

शिवबांचा होता कावा
सदा गमिनीचा तेव्हा
सुटलेत आग्राहून
सही सलामत जेव्हा

महाभारतात आहे
भरलेले कारस्थान
खूप   केले कौरवांनी
पांडवाचे अपमान

आनंदीचा होता कट
नारायण मारण्यात
केला ध शब्दाचाच मा
 वंश अंत करण्यात

असे भरलेले कट
 जीवनात क्षणोक्षणी
किती जपून टाकावी
सदा पावले जीवनी

वैशाली वर्तक

रविवार, ३ मे, २०२०

माळरान हायकू / माळरान कविता/ निसर्ग

यारिया साहित्य कला समुह आयोजित महास्पर्धा
महास्पर्धा क्र 5
विषय- माळरान
हायकू रचना

    **जमला मेळ**

आवडे मज
हिंडणे माळरानी
म्हणत गाणी

ऐकता गाणी
फिरली सा-या रानी
मी अनवाणी

होते काटेरी
झाडे झुडपे फार
काटे अपार

फुले रंगीत
रानफुले सुंदर
ती मनोहर

फुले वेचली
ओंजळ ही भरली
माथी माळली

वृक्षची वृक्ष
 शीतल मोठी छाया
निसर्ग माया


जमला खेळ
माळरानात वेळ
सुंदर मेळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद


माळरान                        8/2/2021
   
पहा कसे   रमणीय
दिसतय माळरान
लहान  खुरटी झाडे
पसरली आहेत छान

माळरानात फुलली
पहा छोटी रानफुले
मंद  वा-याच्या संगतीत 
तालावरी  हळुच डुले

हिंडण्या फिरण्याची 
मौज वाटे माळरानी
किती पक्षी पहा उडती
ऐकू तयांची गोड गाणी

मोठ्या झाडाच्या खाली
आहे घनदाट छाया
रवंथ करत करत
गुरे  आली  बसाया

झालीय कृपा वरुणाची
उजाड माळरान बहरले
सर्वत्र  दिसे हिरवळ
पाहून मन आनंदले





अभा म प सा धुळे जिल्हा
चित्र  काव्य
हायकु लेखन
हायकु



 तुझे हसणे
 भासे चित्ता  मोहक 
 मना वेधक   १

  लोभस हास्य
 जणु चांदणे  फिदा
मोहीत अदा २

नको अडवू
हास तू मुक्त पणे
भासे  चांदणे ३

हसतमुख
चेहराची हासरा
पहा नखरा       ४


 मनी हासणे
 शीतलता भासणे
रूप पहाणे

वैशाली वर्तक







खरे पहाता
निसर्ग हाची देव
अमुल्य ठेव        1

देवे निर्मीला
निसर्ग  मनोहर
आहे सुंदर            2


निर्मीले देवे
सुंदरची  आकाश
देण्या प्रकाश        3

भास्कर  रवी            
अविरत नेमाने                                     
नित्य क्रमाने         4                             

 निसर्गा तुझी
 ठेव रे कृपा दृष्टी 
चालण्या सृष्टी         5

समतोलता
राखण्या  निसर्गाची
घेउ दक्षता               6

रवी शशी ते
उगवतात नित्य
सृष्टीचे सत्य            7

लाविता वृक्ष 
निसर्गची हिरवा
 रम्य बरवा              8

नदी सागर
देवाचे वरदान     
सुखी  घागर           9






क्रांती

क्रांती

अन्यायाला वाचा फोडण्या
उठते वादळ वैचारिक
सुरु होतो तयात लढा
नसतो तो कधी औपचारिक

क्रांती घडली ईतिहासात
त्यात झाली बलवानांची जीत
हाच नियम निसर्गाचा
चालत आलेली जुनी रीत

निसर्गाचा असे नियम
डार्वींगने लावला शोध
बलवान तो टिकणार
उत्क्रांती नावे दिला बोध

इंग्रजाच्या जाचाला त्रासून
क्रांती केली मिळविण्या स्वराज्य
स्वातंत्र्य वीरांनी केले बलिदान
घडविले भारतात सुराज्य

मिळेल जर योग्य औषध
ज्याची संशोधकांना नाही भ्रांती
मिळता औषधोपचार घडेल
 महामारी दूर करण्याची क्रांती

वैशाली वर्तक

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...