यारिया साहित्य कला समुह आयोजित महास्पर्धा
महास्पर्धा क्र 5
विषय- माळरान
हायकू रचना
**जमला मेळ**
आवडे मज
हिंडणे माळरानी
म्हणत गाणी
ऐकता गाणी
फिरली सा-या रानी
मी अनवाणी
होते काटेरी
झाडे झुडपे फार
काटे अपार
फुले रंगीत
रानफुले सुंदर
ती मनोहर
फुले वेचली
ओंजळ ही भरली
माथी माळली
वृक्षची वृक्ष
शीतल मोठी छाया
निसर्ग माया
जमला खेळ
माळरानात वेळ
सुंदर मेळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
महास्पर्धा क्र 5
विषय- माळरान
हायकू रचना
**जमला मेळ**
आवडे मज
हिंडणे माळरानी
म्हणत गाणी
ऐकता गाणी
फिरली सा-या रानी
मी अनवाणी
होते काटेरी
झाडे झुडपे फार
काटे अपार
फुले रंगीत
रानफुले सुंदर
ती मनोहर
फुले वेचली
ओंजळ ही भरली
माथी माळली
वृक्षची वृक्ष
शीतल मोठी छाया
निसर्ग माया
जमला खेळ
माळरानात वेळ
सुंदर मेळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
माळरान 8/2/2021
पहा कसे रमणीय
दिसतय माळरान
लहान खुरटी झाडे
पसरली आहेत छान
माळरानात फुलली
पहा छोटी रानफुले
मंद वा-याच्या संगतीत
तालावरी हळुच डुले
हिंडण्या फिरण्याची
मौज वाटे माळरानी
किती पक्षी पहा उडती
ऐकू तयांची गोड गाणी
मोठ्या झाडाच्या खाली
आहे घनदाट छाया
रवंथ करत करत
गुरे आली बसाया
झालीय कृपा वरुणाची
उजाड माळरान बहरले
सर्वत्र दिसे हिरवळ
पाहून मन आनंदले
अभा म प सा धुळे जिल्हा
चित्र काव्य
हायकु लेखन
हायकु
तुझे हसणे
भासे चित्ता मोहक
मना वेधक १
लोभस हास्य
जणु चांदणे फिदा
मोहीत अदा २
नको अडवू
हास तू मुक्त पणे
भासे चांदणे ३
हसतमुख
चेहराची हासरा
पहा नखरा ४
मनी हासणे
शीतलता भासणे
रूप पहाणे
वैशाली वर्तक
खरे पहाता
निसर्ग हाची देव
अमुल्य ठेव 1
देवे निर्मीला
निसर्ग मनोहर
आहे सुंदर 2
निर्मीले देवे
सुंदरची आकाश
देण्या प्रकाश 3
भास्कर रवी
अविरत नेमाने
नित्य क्रमाने 4
निसर्गा तुझी
ठेव रे कृपा दृष्टी
चालण्या सृष्टी 5
समतोलता
राखण्या निसर्गाची
घेउ दक्षता 6
रवी शशी ते
उगवतात नित्य
सृष्टीचे सत्य 7
लाविता वृक्ष
निसर्गची हिरवा
रम्य बरवा 8
नदी सागर
देवाचे वरदान
सुखी घागर 9
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा