बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६
जीवनातला सुखद क्षण
सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६
वृत्तबद्ध ... पादाकुलक वृत्त. 8). 1पहिली वही. पहिली कविता) 2क्षणाक्षणा3..4..पानगळ.
नाही भरवसा क्षणाचा
आहे अगदी खरेची कथन
नसे भरवसा कधी क्षणाचा
निसटते जशी रेत हातची
वेळ हा सरे आयुष्याचा
येईल खचित उद्या दिवाकर
शुभची सकाळ करण्या मंगल
तोच आजचा सुख शांतीचा
आला क्षणची करण्या चंगळ
दिन तर सरती क्षणा क्षणाला
नको रहाया मनात आशा
नसे भरवसा कधी क्षणाचा
नकोच पदरी उगी निराशा
देवे दिधला. जन्म मानवी
विचार करण्या असेची मती
बहाल करिता मेंदू त्याने
वाढव आता कामात गती
काळ हातचा क्षण भाग्याचा
नको पहाणे वाट उद्याची
गवसत नाही दुसरी संधी
ही खरी असे रीत यशाची.
वैशाली वर्तक
( 4..)
वृत्त पादाकुलक
(पद्मावर्तनी समजाति)
मात्रा८-८=१६
शीर्षक.माझे मला कळेना
समोर दिसता रोज टिप्पणी
मनात आले विचार काही
करून वंदन सरस्वतीला
लिखाणास मन उत्सुक राही
शब्द मनीचे झरू लागले
ओवत गेले मी शब्दांना
सहज जाहली तयार कविता
झरू लागता शब्द फुलांना.
मलाच माझे नाही कळले
कशी प्रसवली मजला कविता
पठण करूनी पुन्हा पाहिली
जना भावली माझी रचिता
देत चालना कल्पकतेला
नेहमी स्फुरे पहा लेखणी.
छंदच जडला आता मजला
झरणी माझी दिसे देखणी
विचार येता शब्द गुंफता
शब्दकार मी कशी जाहले
नित्य लिहीणे सराव घडिता.
मलाच माझे नाही कळले
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भग्नावशेष आठोळी रचना
गुरुवार, २९ जानेवारी, २०२६
वृत्तबध्द. वृत्त आनंद कंद देव पाहिला (कविता )
बुधवार, २८ जानेवारी, २०२६
मी कोण कविता
रविवार, २५ जानेवारी, २०२६
लेख. स्वतःला व्यक्त करणे गरजेचे आहे
शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६
नजर
अलिप्तता व दुर्लक्षता
अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत. .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही तो लहानाचा मोठा होतो. ...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...


