शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

लेख....मी कोण \ कविता ..मी कोण

 साकव्य  लेख स्पर्धा 

दि 24 ते 30 एप्रिल 2025

विषय ... मी कोण 


    समोर दैनंदिन पडली  होती. व तिच्या समीप  लेखणी, तिच्या कुशीत विसावली होती. माझे लक्ष सहज त्या दोघींकडे गेले . कशा ऐटीत मेजवर बसल्या होत्या.  दैनंदिनी जणु लेखणीस प्रेमाने कुरवाळत होती. सहजपणे मी दैनंदिनी जवळ घेतली , व  लेखणीस  हातात घेतले. शारदेला मनोमन वंदन करुन, मनीचे घोळत असलेले विचार लेखणीच्या द्वारे दैनंदिनीत शब्द रुपाने झरले,... आणि ते शब्द.. शब्द गुंफीत गेले व मनाचे गुज मांडीत गेले.  मनीच्या भावनांना  रिक्त करता.. करता, शब्द माळ गुंफत जाता  , पाहिले तर मला काव्य  , कविता प्रसवली.  मी त्या शब्द माळेस पुन्हा पुन्हा वाचून योग्य तेथे सुधारणा केली. मनातून आनंदले.जनात पण वाचून, बोलून दाखवली. जन मनाला पण तितकीच भावली.

       पुढे पुढे मज छंदच जडला.  मनातील भावना कागदावर उतरविण्याचा.... सतत लेखनाने विचारांना प्रेरणा मिळत गेली . माझी लेखणी जास्त जास्त स्फुरत गेली . व ती दिवसेंदिवस जास्त देखणी बनत गेली. आता विषय मिळता , वा  सहज बसले असता, हलती डौलती पाने फुले.,.. मस्त हवेत स्वच्छंदाने उडणारी पाखरे,.. वा वा-याच्या झुळुकेवर डोलणारी शेते, ..काबाडकष्ट करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी पाहून  निसर्गातून मला भावना उचंबळून  येता  , माझ्या भावनांना वाट करण्यात, लेखणी पुढे सरसावत गेली. 

      आणि निसर्ग तर आहेच गुरू तो तर नवनवीन विचारांना प्रेरणा देतोच . जसे चित्र कार त्याच्या कुंचल्यातून दृश्य जसेच्या तसे रेखाटतो तसे मी शब्दांतून गुज मनीचे लेखणीतून सांगु लागले . सतत़ लेखन सरावाने लेखनास धार येऊ लागली. 

     आता   एक वेगळीची बॅंककर , नेशनल तरणपटू , निवृत्त काळात कवयित्री होऊन अनेकदा अ. भा .मराठी साहित्य संमेलनात मी काव्य सादरीकरणात आमंत्रित होऊ लागले .

         माझे मलाच कळले ना! मी शब्दकार  कधी बनले.



वैशाली अविनाश वर्तक 

अहमदाबाद 

8141427430






मोहरली लेखणी साहित्य समूह 

विषय...*मी कोण*


मी कोण असे पुसता

प्रश्न ..अस्तित्व,वा स्व ओळखीचा

मी,आहे तुमच्यातील सारस्वत

छंद जडलाय लेखणीचा


आहेत साहित्य समूह अनेक 

जतन करण्या मायबोली 

देत-घेत विचारांना चालना

रचिते रोज चार ओळी 


होते खरी तरणपटू, बेंकर 

निवृत्तीत  छंद जडला लेखणीचा 

अन् अविभाज्य स्थान तिज लाभता

मान मिळाला कवियित्रीचा



अ.भा साहित्य संमेलनी आमंत्रित 

कवि कट्टयावर सादरीकरणासाठी 

 भेटूया साता-यास आपण

सारस्वत भेटीचा आनंद घेण्यासाठी 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

या सुखांनो या. सुख मिळाले

सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित उपक्रम 
विषय ....या सुखांनो या
     

होता मनाजोगते काहीही 
 होते सुखी प्रसन्न, मन
बोलवितच होते सुखांना
मिळाले की? सुखाचे क्षण.

सांज सरता आली निशा
चांदण्याने मोहविले मन
लुटला अनामिक आनंद 
भासले ते पण ,  सुखाचे क्षण

पहा ऊषा उजळली
घेत नव्या आशेचा  साज
क्षण सुखाचे वेचले
आनंदाचा लावूनी ताज

स्वतः अंगणात लावलेलं 
डवरलेले पाहून  रोप
मन ऊडु ऊडु जाहले
आनंदाने उडली झोप 

क्षण सुखाचे शोधले
भरलेल्या  जीवनाते
आनंदे समाधाने  जगता
बहरले  ते क्षणाते

असेच असती सदोदित 
सुख अवती   भवती
या  रे सुखांनो  या
कळली तुमची महती.

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद 
21/4/25

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

चित्र काव्य पादाकुनक वृत्त बध्द लिखाणाचा प्रयत्न

वरील चित्रावर
पादाकुनक वृत्त बध्द लिखाणाचा प्रयत्न 


सुंदर आहे  , नभ निळे निळे 
अनेक. गगनी, दाटले मेघ.  
 होताच गर्दी, कृष्ण ढगांची
चमकते पहा, दामिनी रेघ 

  बिंब नभाचे , जल ही सुनील
   दिसतोय निळा, निसर्ग मनोहर 
  उठती तरंग  जलाशयाते
पहा किती ते ,दृश्य सुंदर 

    ऐटीत उभे, नारळी वृक्ष 
    रम्य निसर्गात, करीतोय भर
    शीतल वारा,करी मनाला
     प्रसन्न शांत,भासे  हे खर


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

रविवार, २० एप्रिल, २०२५

अभंग....थोरवी भिमाची

 महा स्पर्धा 

स्पर्धा फेरी क्रमांक ३

पंचकाव्य रत्न महास्पर्धा

२०\४\२५     

काव्य प्रकार अभंग वृत्त 

 विषय ...भीमाची थोरवी

      शीर्षक ..*दीन दलितांचा वाली*


 थोरवी भीमाची | कर्तृत्वाची गाथा. |

 नमवती माथा. | तूज पायी. ||. १


बुध्दीने तेजस्वी | भाषा पारंगत. |

तूची यशवंत | भीमराव ||. २


बंड पुकारून | दिले सर्वां पाणी |

तव गुण गाणी | गाती लोक. ||. ३


दलित जनांच्या | कल्याण्याचा यत्न. |

तू भारत रत्न | भूषविला. ||. ४



बहुजनांचा तू | होताची कैवारी | 

भिमा सुविचारी | हमखास ||. ५


समतेचा भाव | दया सर्वांवरी |

मान घरोघरी | मिळविला || ६



देशाची घटना | संविधानकार. |

देश शिल्पकार | मान तुला ||. ७



वैशाली वर्तक.

 अहमदाबाद

नाते हळुवार जपताना

[20/04, 4:51 pm] Vaishali Vartak: शोध  अस्तित्वाचा साहित्य समूह 
आयोजित 
आठोळी काव्य लेखन उपक्रम 
विषय ..  नाते हळुवार जपताना

   
उभे आडवे घेऊन धागे 
विणकर वस्त्र करी तयार
नाते  जपावे हळुवार
नाते संबंध प्रेमळ हवे अपार 

असता संबंध प्रेमळ धाग्याचे 
विनयता अंगी व बोलणे गोड
 नाती गोतीच कामास येती अनृ
जीवन  भासे आंब्याची फोड

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
[20/04, 10:53 pm] rajshri  marathe अष्टपैलू : किती सुंदर रचना आहे 👌👌

शनिवार, १९ एप्रिल, २०२५

चित्र काव्य स्वप्न परी

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

चित्र काव्य 

दि 25/3/25

शीर्षक ...स्वप्न परी


पाहताच सुंदरीला

प्राची झाली प्रफुल्लित 

काय नावे बोलावू तिज

मन झाले संभ्रमित 


कमनीय बांधा तिचा

भासे उतरली परी

मोहक तिच्या रुपानेी

झोप उडाली झडकरी 


सारूनिया पांघरूण 

नयन सुख घेऊ पाहे 

मोकळ्या त्या कुंतलाना

मन डोळा भरून पाहे


कशी आली अचानक 

 कसा  तिला पत्ता ठाव

माझे मलाच कळेना

कसे विचारावे तिज नाव


झाला गजर घड्याळाचा 

झालो स्वप्नातून जागा

बंद करण्यास हात जाता 

ध्यानी आला स्वप्नाचा धागा.


वैशाली वर्तक 

 अहमदाबाद

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

गीत ... सहचारिणी मी, मीच अर्धांगिनी

 काव्यस्पंदन राज्यस्तरीय  02

आयोजित  उपक्रम

18/4/25

ओळ काव्य - 

ओळ - सहचारिणी मी , मीच अर्धांगिनी



सहचारिणी मी मीच अर्धांगिनी

नभीचा शशी तू मी तुझी रोहिणी


नभी सांजवेळी , तव संगतीला

असे मीही तुझ्या, सदा सोबतीला

आपुल्या विणा शोभा, नसे नभांगणी

नभीचा  शशी तू,  शोभे  मी रोहिणी   1


 

संसार बागेत ,  भरिलास गंध

तुझ्याच नामाचा ,जडलाची छंद

तव अस्तित्वाने ,शोभे मी स्वामिनी

नभीचा शशी तू  ,शोभे मी  रोहिणी   2


 ओढ किना-याची, असेची लाटेला

तुला भेटण्याची , सदैव मजला

तूची माझा राजा, तुझी मीच राणी

नभीचा शशी तू  ,शोभे मी रोहिणी.       3

 

वैशाली वर्तक 

अहमदाबाद


अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...