शनिवार, २९ मार्च, २०२५

लेख कर्णफुले

वल्ड व्हिजन टाईम्स मधे 

लालित्य नक्षत्रवेल समूह आयोजित 
ललित लेखन
विषय... कर्णफुले 

     कर्णफुले कानात हवीच त्या विण चेहरा कसा भकास भासतो. मला तर बांगड्या गळ्यातली पेक्षा कानातली याची फार हौस .........हौस नाही, तर हव्यास म्हणा. ...मला म्हणजे सर्वच बायकांना असतोच..खरी सोन्याची तर सध्याच्या काळात घेणे परवडत नाही   तरी 10/12तर असतातच . शिवाय नकली तर आकर्षक व सुंदर. आजकाल अमाप मिळतात. 
       आपल्यात तर मुलगा असो मुलगी कान विंधवणे. कान टोचणे प्रकार असतोच. जन्मा नंतर 10/12 व्या दिवशी कान विंधविण्यात येतात . तेव्हा सुंकले हा पहिला कानाचा दागिना.  कानात घातल्याने , बाळाच्या चेहऱ्यात, दिसण्या तर लगेच फरक पडतो. शेवटी दागिनाच...तो.!  अलंकार.... शृंगार शरीराचा वाढविणारच. !
     तर अशा रितीने पुढे  मुली चौकुला.  कुड्या. कुडयांव्यतीरिक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल,सोन्याचे कान यांसारखे आभूषणेही कानात घातले जातात. याचे पारंपारिक नाव झुबे असे आहे. सतराव्या शतकाच्या आधीपासून हे प्रचलित आहेत.
       तर सांगायचे काय मला कर्णफुलांची फार आवड. नवीन लग्न ठरले होते . लग्ना आधीचे फिरणे म्हणजे लाड पुरवून घेणे व नव-याने पण लाड पुरवण्यात  मागे न पडणे .  असेच फिरायला गेलो होतो. 
यांनी कौतुकाने विचारले घ्यायची कानाची आभुषणे.... मी उगा नको नको म्हटले. पण कानतली पाहून  मन रहावलेच नाही. यांनीच त्यांचा आवडीचे निवडले. आणि काय ! त्यांची आवड छान आहे कळले.
डूल प्रकारातील पसंत केली.
     पसंत करून थांबले नाहीत तर चक्क दुकानात त्यांनीच माझ्या कानात घालून फिरकी पण लाव ssली.
व अशी नजर रोखून पहात होते की.  ... त्यांच्या सुंदरीला कवेत घेणारी की काय !
 हो आमच्या वेळेचा काळ  होता. ..सध्याचा काळात तर  तेही शक्य आहे म्हणा.
    पण खरच कर्णफुले शोभून दिसत होती. तेवढ्यात मी पण लहान मुली सारखी २\४ दा माना वेळावून आरशात स्वतःला निरखून पाहिले. शेवटी  यांनी पण   पुढे पुढे.  येणाऱ्या.. माझ्या लाडिक बटांना कानामागे  करण्याची व अनाहुत स्पर्श करण्याची संधी  सोडली नाही.
     ती कर्णफुले आजतागायत मी जपली आहेत. एकतर  लग्ना आधीची पहिली भेट. ती नुसती कर्णफुले  नसून पहिल्या भेटीची सदा आठवण करून देतात. त्यानंतर अनेक कुड्या काय झुंबरे काय खड्याची काय!
इतकं नव्हे तर सुंदर नव्या नव्या आकर्षक डिझाईन ची.  मस्कत ची पण ४\५ आणलीत
सर्व वापरली पण ती लग्ना आधीची कर्णफुले अजून मीच वापरते.  कारण त्या कर्णफुलात दुकानात  ते विकत घेतानाच्या आठवणी दडलेल्या आहेत ना!


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

मायबोली. कसे वर्णू ऋण. अभिजात मराठी


शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे 
आयोजित काव्य लेखन स्पर्धा 
शीर्षक .... कसे वर्णू ऋण 
                                                          


साहित्य तेज पेपर मधे प्रकाशित १९\४\२५



  भाषा मराठी आहेच प्राचीन
  म्हणून मिळाला तिज मान
  साकारले  प्रयत्न , भाषा प्रेमिकांचे
  उरी दाटला ,भाषेचा अभिमान 

मुकुंद राज अन् ज्ञानेश्वर
माय मराठीचे आद्य जनक,
वैशिष्ट्ये पाहून मायबोलीची
अभिजात दर्जाचे जनमनी सार्थक 

अहवाल केला तयार समितीने
रंगनाथ पठारें याचे  होते नेतृत्व
 सविस्तर अहवाल पाचशे पानी
दाविले तयात भाषेचे प्रभुत्व .

प्राप्त झाले यश मराठीला
जाणा आता मराठी ची महती
मिळला दर्जा उच्च भाषेचा 
वाढवू मान सर्व भाषेत जगती.

कसे  वर्णू ऋण समितीचे 
ज्यांनी केले  प्रयत्न अखंड
मिळविण्यास मान मराठीला
विश्वात शोभण्या सदैव उदंड 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद 
८१४४२७४३०

गुरुवार, २७ मार्च, २०२५

काव्य रचना. शब्द सरी बरसल्या

सावली प्रकाशन समूह
काव्य लेखन 
उपक्रमासाठी
16/12/21
विषय - ओळ कविता
ओळ - शब्द सरी बरसल्या
     *काव्य रचना*
       
  मनी दाटलेले भाव
हाती घेता लेखणीला
*शब्द  सरी बरसल्या*
धारा भेटल्या मातीला

असे गुज अंतरीचे
उमटवे ती लेखणी
शब्द सरी बरसता
भासे मजला देखणी

अशा  नवरस पूर्ण 
*शब्द सरी बरसल्या* 
जणु मेघवर्षा आल्या
मन भावन ठरल्या

शब्द सहज  झरता
 दावी हृदयाचे भाव
शब्द शब्द जोडुनिया
घेई अंतरीचा ठाव

शब्द  असती सुमने
नाना रंगी उधळण
भक्ती, शौर्य ,धैर्य ,शांत
जणु शब्द पखरण

पहा शब्द एक-एक
झरला लेखणीतूनी
झाली कविता तयार
मोद झाला मनातूनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

आठवण (बालपणीचा काळ)

                     आठवण
अजुन आहे स्मरणात, ते दिन  बालपणीचे
कसे जड़लो घडलो , आजच्या या मितीचे.

अचूक वेळ सांगणे, आठवते ते आजीचे
बिनकाट्यांचे घड्याळ ,होते तिचे उन्हाचे.

जीभेवर रेंगाळतेय ती चव , पोळीच्या लाडूची
अन खमंग त्या  कुरमु-याच्या  चिवडया ची.

गुळ पोळीची सात्विक गुंडाळी ,असे न्याहरिला
मागे टाकेल चवीत, सध्याच्या  या फ्र्ँकीला.

पत्ते,लगोरी डाव ,रंगले असत दिवसभर
मोबाईल्स् गेम्सना, कधीच येणार नाही ती सर,

सांजवेळी म्हटली जाई ,घरात शुभंकरोती
तर आता,वेळ सुरु होते , टिव्हीच्या मालिकेंची

मातीनी ,गेरूनी बनविलेले ओटे न् किल्ले
नव्हते सर्वत्र चायनीजचे लाईटींगचे जाळे.

घरोघरी मित्रांसवे , चाले दिवाळीचे फराळ
अभ्यंग स्नाना वेळी, वाजवायचे फटाके बार

आता राहिल्या,नुसत्या आठवणी
"ती" मजाच न उरली , "त्या" काळाची.
 असे म्हणत फक्त, आठवण काढायची
गत काळाची , अन् जुन्या दिवसांची.





गुरुवार, २० मार्च, २०२५

लेख आठवणीतील होळी. ...होळी सण

लेख    आठवणीतील होळी.


  दरवर्षी होळी सण येतो. होळी  म्हटली कीं, विविध रंगानी ,  तसेच गुलालाने

 तबके भरलेली , व  त्याच बरोबर विविध आकारात रंग उडविण्याच्या पिचका-यां नी भरलेली ,सजलेली दुकाने . तसेच साखरेच्या माळींनी भरलेली दुकाने असे चित्र  डोळ्यासमोर उभे रहाते.  हो या साखरेच्या माळा गुजरात मधे आताच  मिळतात  मग आपल्याला गुडी पाडव्यास लागतात तेव्हा नसतात. येथे गुडीचे महत्व नाही ना.

       कसे आहे ना ....आपले  भारतीय सण ऋतुंशी पण संबधीत साजरे करीत असतो. होळीच्या सुमारास पानगळ झाल्याने झाडांची पाने गळून गेली असतात.

फांद्या  निष्पर्ण झाल्या असतात . तेव्हा त्या वाळक्या  फांद्यांची कापणी  केली की झाडांना छान नवी पालवी  फूटू लागते . तर होळी च्या वेळी वाळक्या फांद्यांची लाकडे , व पाना पाचोळा पेटवून तसेच नको असलेल्या वस्तू दहन म्हणजे होळी. 

होळीला पौराणिक महत्त्व आहेच.जे आपणा सर्वांना माहित च आहे. 

       त्याच पौराणिक  पारंपरिक  स्वरुपा ची होळी आमच्या लहानपणी दोन / तीन घरी प्रगटवायचे.  रीतसर घरा समोर खड्डा करुन तेथील जागा स्वच्छ करून   थोडी लाकडे व भोवताली गौ-यांची चड लावून, पाट मांडून यथा सांग शास्त्रोक्त पूजा करायचे. घरची बाई पुरळ पोळीचा नैवेद्य  दाखवून  भक्ती भावे नमस्कार करून  मग सर्व जण प्रदक्षिणा घालयचे. 

     तसेच सार्वजनिक  स्वरुपाची पण होळी व्हायची .सोसायटी ची मुले वर्गणी

गोळा करून, लाकडे आणून, होळी प्रगटवायचे. मग मुलांचे रात्री जागरण चालायचे .पौर्णिमा असल्याने रात्री उजेड पण असायचा. होळी पेटविल्यावर  सुरुवातीला छान खेळ वगैरे व्हायचे .  पण, मग मोठ्या लोकांची  झोपा झोप झाली कीं हळूच आवाज न होवू देता , कोणाचे  तरी कोळश्याचे पोते, तर कोणाची बाहेर राहिलेली लाकडी वस्तू उचलून सरळ होळीत टाकायचे. .त्यावेळी तसे करण्यात  काय आनंद  मिळत होता .?.........देव जाणे.  पण वात्रटपणा अथवा खोडकर पणाच होता.....  म्हणायचा. बालपणातील अशा खोडकर आठवणी अजून आठवितात.


        पण होळी म्हटले की मला शाळेत असतांनाची एक आठवण अजून येते. होळीची दोन दिवस सुट्टी असायची. त्यामुळे आदल्या दिवशी रंग खेळायचा मुड असायचा. काही जणी गुलाल पुडी घेऊन यायच्या. काही जणी सुके रंग.

       शाळा सुटल्यावर शाळेच्या आवारात गुलालाने एकमेकीस रंगवायचो. असेच रंग  खेळता खेळता एका मुलीने गुलाल संपला .... तर, शाईची पेन काढली .

         हो  !  त्यावेळी आत्ता सारख्या बाॕल पेन नव्हत्या.शाईचीच पेन वापरणे सक्तीचे होते.   त्यामुळे ती प्रत्येकी कडे असायचीच.  एका मुलीच्या  सुपीक  डोक्यात कल्पना आली .

   तिने लगेच फाउंनटन पेन काढली. व टोपण बाजूस काढून ,

    ज sssरा जोरात झटकली. .

 समोरच्या मुलीवर  शाईचे शिंतोडे उडाले.  .......झाssले .  लगेचच  तशीच  रंगपंचमी  सुरू झाली. 

       पण हे करतांना शाळेच्या  भिंतीवर 2/4 शिंतोडे उडाले. प्रथम  कोणाच्या लक्षात आले नाही. पण नेमका त्याचवेळी शाळेचा शिपाई तेथून जात होता .त्याने पाहिले. त्याला गयावया करून हाता पाया पडून आमचे नांव सांगू नको. करत पळ काढला. पण  वरती बाल्कनीतून शिक्षकांनी पाहिलेच.

 . त्यामुळे शिक्षिका बाईंनी खाली येऊन शाळा आपली स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य  आहे.  तुमचे हे वर्तन अयोग्य आहे वगैरे  वगैरे ..लेक्चर तर  दिलेच .आणि  भले 2/4 शिंतोडे पण चूक तर केलीच आहे तर ..... .  शिक्षा  पण भोगावीच लागेल म्हणत  ,  दोन दिवसाच्या सुट्टी नंतर  तुम्ही प्रतिज्ञा 5 वेळा लिहून आणायची  अशी शिक्षा  पण फर्मावली. 

        दोन दिवसा नंतर   वर्गात येताच मुले  आमच्या मिळालेल्या शिक्षे बद्दल हसली याचे वाईट वाटले.व त्या पेक्षाही अपमान वाटला. व घरी आईने युनीफाॕर्म धुवावयास लावला  व हवे तेवढे तोंड सुख घेतले हे वेगळेच ..

    आणि ..   आता ...नातवंडे रंग खेळतात. तर लगेच, "अरे!  अरे  ! ओट्याच्या खाली उतरा. 

  घराच्या भिंती खराब होतील." असे शब्द काढतांना शाळेची ४/५ शिंतोडे उडलेली भिंत आठवते.

  आणि होळी तर पेटविणे व्यर्थच वाटते.   उगाचच  झाडे कापणे .

अशी पण सिमेंटच्या जंगलाने  झाडे कमीच झाली आहेत. त्यात लाकडे जाळून प्रदुषणात वाढ. व पर्यावरण ची हानी करणे वाटते. 

   आणि रंग खेळून पाण्याची नासाडी .त्यामुळे  लगेच कोणी  तरी  म्हटलेल्या ओळी आठवितात   कोणी नव्हे माझ्याच की....

         

                साजरी करायची होळी तर,

                करुया जतन, वन- पर्यावरण

                  दहन करूनी, भेद वर्ण जाती

                   जागृत करु, एकात्मतेचे वातावरण.


                 ...............  वैशाली वर्तक




मोहरली लेखणी साहित्य समूह 

उपक्रम क्रमांक 1228

विषय ... होळी 


 शीर्षक...रंगून जाऊ रंगात*


आला   हो सण रंगाचा

*रंगून जाऊ रंगात*

फुलली विविध फुले

आनंद  होतो मनात


 सण हा येता रंगाचा

  रंगोत्सव   खेळे सृष्टी 

 विसरून सारे जाती भेद

समतेची ठेवुया दृष्टी 


करुया संवर्धन  वनश्रीचे

लोभ मत्सराचे करु दहन

नको तोडणे जाळणे वृक्षाचे

करु पर्यावरण जतन


येता  ऋतुंचा राजा

 वसंत फुलला मनोमनी

ऐका कोकीळ कुजन

मोहर दिसे वनोवनी


पळस बहावांचे सुंदर

  रंग आकर्षती मनाला

रंगून जाऊ रंगात

नको  निराशा  जीवाला


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

ओळकाव्य ) देवा सुरू दे माझे मी पण.


 --देवा सरु दे माझे मी पण

ओळ काव्य


देव जर मला भेटला

सांग तव ईच्छा म्हणाला

आधी मागीन मी  तयाला

संपव माझ्यातील मी पणाला


  षडरीपूंनी जग हे भरलेले

  दूर तया  सारण्या दे शक्ती     

  तूच भर भाव मम हृदयी

 मी पण  सारण्या घडो भक्ती


विसर न व्हावा कधी तुझा

घडू दे निरंतर तव सेवा

सरू दे माझे मी पण

 द्यावा हाची कृपेचा ठेवा


 वृक्षलता करती उपकार

तशीच घडो सेवा हातूनी

न दाविता अहम भाव

सरु दे  मी पण मनातूनी


हेची दान दे देवा आता

आले मी तुला शरण नाथा

सरु दे देवा माझे मी पण

टेकवीते  तव चरणी माथा


    वैशाली वर्तक

शनिवार, १५ मार्च, २०२५

का. ? ( शब्दगंध सिंगापूर)

शब्द गंध. सिंगापूर 
विषय.... का?


शब्द... का ?असे प्रश्नाथीं 
शब्दच दावी दाटलेल्या जिज्ञा
उचंबळती मनीच्या भावना अन,
जाणण्यासाठी करी शब्दातून आज्ञा.

का? ....शब्द असे आज्ञार्थी पण,
नकार देण्यात  पुढे सदा
न दाविता सरळ नकार 
अनिच्छा  दाखवी सर्वदा 

क  शब्दाची बाराखडी 
लहान मुलांची  होते सुरु 
का ,कधी,  केव्हा कोणी 
कुठे ?कशाला? प्रश्नावली निघे  चुरूचुरू

क अक्षर  असे उचापतीचे
सर्व प्रश्न तेच सुरू करे 
अन् शंका निरसन होईस्तोवर 
अक्षर क चे पोट न भरे


जग एवढे  जाहले प्रगत
का? या  प्रश्नानेच खरंतर
 का खालीच पडते फळ झाडावरुन ?
शोधक शब्दांस दिले गुरूत्वाकर्षणाने उत्तर .

तसेच केव्हा ,कधी ,कोठे, कोणात ,
शब्दे  तयार जाहला  भुगोल ,इतिहास 
अन् या क च्या बाराखडीनेच
मानवाचा झाला बौद्धिक विकास ,

तर सांगणे हेची.उरते
देऊन ताण बुद्धीला व्हावे विचारवंत
नका अव्हेरु *का* शब्दाला
अजून शोध लागता होऊ भाग्यवंत .


वैशाली वर्तक
अहमदाबाद 

चित्र काव्य करू हितगुज

शब्द रजनी साहित्य समूह पुणे  चित्र काव्य  अष्टाक्षरी  शीर्षक  ... करु हितगुज  हात  हातात घेतला जाऊ समुद्र  किनारी मौज लाटांची पहात बसु बाळुत...