शुक्रवार, २८ मार्च, २०२५
मायबोली. कसे वर्णू ऋण. अभिजात मराठी
गुरुवार, २७ मार्च, २०२५
काव्य रचना. शब्द सरी बरसल्या
आठवण (बालपणीचा काळ)
अजुन आहे स्मरणात, ते दिन बालपणीचे
कसे जड़लो घडलो , आजच्या या मितीचे.
अचूक वेळ सांगणे, आठवते ते आजीचे
बिनकाट्यांचे घड्याळ ,होते तिचे उन्हाचे.
जीभेवर रेंगाळतेय ती चव , पोळीच्या लाडूची
अन खमंग त्या कुरमु-याच्या चिवडया ची.
गुळ पोळीची सात्विक गुंडाळी ,असे न्याहरिला
मागे टाकेल चवीत, सध्याच्या या फ्र्ँकीला.
पत्ते,लगोरी डाव ,रंगले असत दिवसभर
मोबाईल्स् गेम्सना, कधीच येणार नाही ती सर,
सांजवेळी म्हटली जाई ,घरात शुभंकरोती
तर आता,वेळ सुरु होते , टिव्हीच्या मालिकेंची
मातीनी ,गेरूनी बनविलेले ओटे न् किल्ले
नव्हते सर्वत्र चायनीजचे लाईटींगचे जाळे.
घरोघरी मित्रांसवे , चाले दिवाळीचे फराळ
अभ्यंग स्नाना वेळी, वाजवायचे फटाके बार
आता राहिल्या,नुसत्या आठवणी
"ती" मजाच न उरली , "त्या" काळाची.
असे म्हणत फक्त, आठवण काढायची
गत काळाची , अन् जुन्या दिवसांची.
गुरुवार, २० मार्च, २०२५
लेख आठवणीतील होळी. ...होळी सण
लेख आठवणीतील होळी.
दरवर्षी होळी सण येतो. होळी म्हटली कीं, विविध रंगानी , तसेच गुलालाने
तबके भरलेली , व त्याच बरोबर विविध आकारात रंग उडविण्याच्या पिचका-यां नी भरलेली ,सजलेली दुकाने . तसेच साखरेच्या माळींनी भरलेली दुकाने असे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. हो या साखरेच्या माळा गुजरात मधे आताच मिळतात मग आपल्याला गुडी पाडव्यास लागतात तेव्हा नसतात. येथे गुडीचे महत्व नाही ना.
कसे आहे ना ....आपले भारतीय सण ऋतुंशी पण संबधीत साजरे करीत असतो. होळीच्या सुमारास पानगळ झाल्याने झाडांची पाने गळून गेली असतात.
फांद्या निष्पर्ण झाल्या असतात . तेव्हा त्या वाळक्या फांद्यांची कापणी केली की झाडांना छान नवी पालवी फूटू लागते . तर होळी च्या वेळी वाळक्या फांद्यांची लाकडे , व पाना पाचोळा पेटवून तसेच नको असलेल्या वस्तू दहन म्हणजे होळी.
होळीला पौराणिक महत्त्व आहेच.जे आपणा सर्वांना माहित च आहे.
त्याच पौराणिक पारंपरिक स्वरुपा ची होळी आमच्या लहानपणी दोन / तीन घरी प्रगटवायचे. रीतसर घरा समोर खड्डा करुन तेथील जागा स्वच्छ करून थोडी लाकडे व भोवताली गौ-यांची चड लावून, पाट मांडून यथा सांग शास्त्रोक्त पूजा करायचे. घरची बाई पुरळ पोळीचा नैवेद्य दाखवून भक्ती भावे नमस्कार करून मग सर्व जण प्रदक्षिणा घालयचे.
तसेच सार्वजनिक स्वरुपाची पण होळी व्हायची .सोसायटी ची मुले वर्गणी
गोळा करून, लाकडे आणून, होळी प्रगटवायचे. मग मुलांचे रात्री जागरण चालायचे .पौर्णिमा असल्याने रात्री उजेड पण असायचा. होळी पेटविल्यावर सुरुवातीला छान खेळ वगैरे व्हायचे . पण, मग मोठ्या लोकांची झोपा झोप झाली कीं हळूच आवाज न होवू देता , कोणाचे तरी कोळश्याचे पोते, तर कोणाची बाहेर राहिलेली लाकडी वस्तू उचलून सरळ होळीत टाकायचे. .त्यावेळी तसे करण्यात काय आनंद मिळत होता .?.........देव जाणे. पण वात्रटपणा अथवा खोडकर पणाच होता..... म्हणायचा. बालपणातील अशा खोडकर आठवणी अजून आठवितात.
पण होळी म्हटले की मला शाळेत असतांनाची एक आठवण अजून येते. होळीची दोन दिवस सुट्टी असायची. त्यामुळे आदल्या दिवशी रंग खेळायचा मुड असायचा. काही जणी गुलाल पुडी घेऊन यायच्या. काही जणी सुके रंग.
शाळा सुटल्यावर शाळेच्या आवारात गुलालाने एकमेकीस रंगवायचो. असेच रंग खेळता खेळता एका मुलीने गुलाल संपला .... तर, शाईची पेन काढली .
हो ! त्यावेळी आत्ता सारख्या बाॕल पेन नव्हत्या.शाईचीच पेन वापरणे सक्तीचे होते. त्यामुळे ती प्रत्येकी कडे असायचीच. एका मुलीच्या सुपीक डोक्यात कल्पना आली .
तिने लगेच फाउंनटन पेन काढली. व टोपण बाजूस काढून ,
ज sssरा जोरात झटकली. .
समोरच्या मुलीवर शाईचे शिंतोडे उडाले. .......झाssले . लगेचच तशीच रंगपंचमी सुरू झाली.
पण हे करतांना शाळेच्या भिंतीवर 2/4 शिंतोडे उडाले. प्रथम कोणाच्या लक्षात आले नाही. पण नेमका त्याचवेळी शाळेचा शिपाई तेथून जात होता .त्याने पाहिले. त्याला गयावया करून हाता पाया पडून आमचे नांव सांगू नको. करत पळ काढला. पण वरती बाल्कनीतून शिक्षकांनी पाहिलेच.
. त्यामुळे शिक्षिका बाईंनी खाली येऊन शाळा आपली स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे. तुमचे हे वर्तन अयोग्य आहे वगैरे वगैरे ..लेक्चर तर दिलेच .आणि भले 2/4 शिंतोडे पण चूक तर केलीच आहे तर ..... . शिक्षा पण भोगावीच लागेल म्हणत , दोन दिवसाच्या सुट्टी नंतर तुम्ही प्रतिज्ञा 5 वेळा लिहून आणायची अशी शिक्षा पण फर्मावली.
दोन दिवसा नंतर वर्गात येताच मुले आमच्या मिळालेल्या शिक्षे बद्दल हसली याचे वाईट वाटले.व त्या पेक्षाही अपमान वाटला. व घरी आईने युनीफाॕर्म धुवावयास लावला व हवे तेवढे तोंड सुख घेतले हे वेगळेच ..
आणि .. आता ...नातवंडे रंग खेळतात. तर लगेच, "अरे! अरे ! ओट्याच्या खाली उतरा.
घराच्या भिंती खराब होतील." असे शब्द काढतांना शाळेची ४/५ शिंतोडे उडलेली भिंत आठवते.
आणि होळी तर पेटविणे व्यर्थच वाटते. उगाचच झाडे कापणे .
अशी पण सिमेंटच्या जंगलाने झाडे कमीच झाली आहेत. त्यात लाकडे जाळून प्रदुषणात वाढ. व पर्यावरण ची हानी करणे वाटते.
आणि रंग खेळून पाण्याची नासाडी .त्यामुळे लगेच कोणी तरी म्हटलेल्या ओळी आठवितात कोणी नव्हे माझ्याच की....
साजरी करायची होळी तर,
करुया जतन, वन- पर्यावरण
दहन करूनी, भेद वर्ण जाती
जागृत करु, एकात्मतेचे वातावरण.
............... वैशाली वर्तक
मोहरली लेखणी साहित्य समूह
उपक्रम क्रमांक 1228
विषय ... होळी
शीर्षक...रंगून जाऊ रंगात*
आला हो सण रंगाचा
*रंगून जाऊ रंगात*
फुलली विविध फुले
आनंद होतो मनात
सण हा येता रंगाचा
रंगोत्सव खेळे सृष्टी
विसरून सारे जाती भेद
समतेची ठेवुया दृष्टी
करुया संवर्धन वनश्रीचे
लोभ मत्सराचे करु दहन
नको तोडणे जाळणे वृक्षाचे
करु पर्यावरण जतन
येता ऋतुंचा राजा
वसंत फुलला मनोमनी
ऐका कोकीळ कुजन
मोहर दिसे वनोवनी
पळस बहावांचे सुंदर
रंग आकर्षती मनाला
रंगून जाऊ रंगात
नको निराशा जीवाला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
ओळकाव्य ) देवा सुरू दे माझे मी पण.
--देवा सरु दे माझे मी पण
ओळ काव्य
देव जर मला भेटला
सांग तव ईच्छा म्हणाला
आधी मागीन मी तयाला
संपव माझ्यातील मी पणाला
षडरीपूंनी जग हे भरलेले
दूर तया सारण्या दे शक्ती
तूच भर भाव मम हृदयी
मी पण सारण्या घडो भक्ती
विसर न व्हावा कधी तुझा
घडू दे निरंतर तव सेवा
सरू दे माझे मी पण
द्यावा हाची कृपेचा ठेवा
वृक्षलता करती उपकार
तशीच घडो सेवा हातूनी
न दाविता अहम भाव
सरु दे मी पण मनातूनी
हेची दान दे देवा आता
आले मी तुला शरण नाथा
सरु दे देवा माझे मी पण
टेकवीते तव चरणी माथा
वैशाली वर्तक
शनिवार, १५ मार्च, २०२५
का. ? ( शब्दगंध सिंगापूर)
बुधवार, १२ मार्च, २०२५
चित्र काव्य ...अभिलाषा
मृदगंध
विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अष्टाक्षरी काव्यलेखन विषय मृदगंध किती वसुने साहिल्या तप्त उन्हाच्या झळा काया तिची भेगाळली भासे ज...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...





