शनिवार, १ मार्च, २०२५

कर माझे जुळती (ओळ काव्य)

वर्ल्ड व्हिजन पेपरात

सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित उपक्रम क्रमांक 582
विषय ...कर माझे जुळती 


ऐकले होते बाबा आमट्यांच्या
आनंद वन प्रकल्पाचे महत्त्व .
कुष्ठ रुग्ण,  अपंग दलितांचे पाहिले 
 सामुहिक पुनर्वसनाचे कर्तृत्व .

जरी घरची होती, सुखवस्तु स्थिती 
आवड मनी ,समाज सेवेची सदोदित 
समाजाने नाकारलेल्या, कुष्ठरोग्यांसाठी
बाबांनी सारे जीवन केले  समर्पित .

मिळता  पत्नीचीही साथ
उभारले चंद्रपूरात आनंदवन.
अभ्यासिले कुष्ठ रोगाचे निदान 
साथीला, सारे कुटुंब जन

नाही नुसती सेवा कुष्ठ रुग्णांची
बनविणे आत्मनिर्भर , ही गरज.
अशी कर्मभूमी बाबा कुटुंबाची
पाहता,कर माझे जुळले सहज


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

कर्तृत्व. जाण कर्तृत्वाची


सायबर क्राईम न्यूज पेपर 17/11/25
Alien ka मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा 
  क्रमांक 28
विषय..     . कर्तृत्व 
 शीर्षक....जाण  कर्तृत्वाची 

    मातापिता घडविती 
    संस्काराने  आपणास 
    घडा कर्तृत्वाचा ठरे
    महत्वाचा प्रत्येकास.

    वृत्ती हवीच धाडसी
    वाव मिळे कर्तृत्वाला 
    ईच्छा शक्ती मनातील
    वाट दाखवी यशाला 
     
    यौवनाचा काळ असे
    घडविण्या कर्तृत्वाचा 
    आशा ,आकांक्षा, अपेक्षा
    पुरिपूर्ण करण्याचा.


   संधी येता जीवनात 
   कर्तृत्वाने घ्या भरारी
   सोने करिता संधीचे 
   यश येईलच दारी 

 वाचा गाथा शिवबांची
 कर्तृत्वाच्या बळावर 
केले हिंदवी स्वराज्य 
वंदनीय खरोखर.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

गझल मंजुघोषा

 मंजुघोषा


वेळ माझ्या  जीवनाचा वाचते  मी   

हेच माझे सांगण्याला जागते मी


सोबतीने चालण्याची हौस माझी 

खूप आशा  बांधलेल्या  तोडते मी


अंतरीला लागलेले  शब्द सारे

वेदनांना माझ्या मनी दाटते मी



खेळखेळू  जीवनाचा सोबतीने

हेच माझे शब्द तुजला बोलते मी


चांदराती चालण्याची मौज वाटे  

चंद्र तारे यात नाते जोडते मी


ऐक आता वेळ झाली परतण्याची 

आस माझी काय तीही सांगते मी




वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

17/2/25







गृहपाठ उपक्रम 7

मंजुघोषा

लगावली 

गालगागा गालगागा गालगागा 


खेळ थोडा सोबतीने सांगते मी

नीजआता बोलताना ऐकते मी


एकटीने जागताना वाट पाही

ऐकणारा तूचि माझा सांगते मी 


रातसारी संपण्याची वेळ आली 

खंत त्याची तूज नाही पाहते मी


वैशाली वर्तक

आज आता तूच सारा भार घ्यावा

हेच साधे का तुला उमजेना 

सोबतीने काम केले स्मरते मी


रविवार, १६ फेब्रुवारी, २०२५

प्रतिबिंब दिलेल्या शब्दां वरून कविता

#कविता_लेखन_स्पर्धा
आसरा , मोहक चैतन्य अथांग शब्द वापरून स्वरचित कविता 
दिलेल्या शब्दांना वापरून स्वरचित कविता 
दि १६\२\२५

    *प्रतिबिंब*
   
दिसे क्षणात स्वरूप 
पाहताच आरशात 
जसे आहे तसे दिसे
न घडे  बदल रूपात     

 निरखून पहावया
 स्वतःचे सौंदर्य नारीला
शोधक नजर आरशाकडे
सहजची जाई त्या घडीला

निहाळता आरशात 
रुप स्वतःचे *मोहक* 
चैतन्य संचारे मनी
भासे  चित्ताला वेधक


सत्य वचनी *आरसा*
दावी  बाह्यची रूपाला
पण डोकवा अंतरी
जाणा त्या अंतर्मनाला 

निराकार तो आरसा 
पहा असतो मनाचा
दावी सदा गुणदोष 
आपुल्या अंतरंगाचा


जरी समुद्र *अथांग* 
न दिसे प्रतिबिंब त्यात
पाहून लाटांना मात्र 
*चैतन्य* उर्मी येती क्षणात

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
8141427430

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

रुप यामिनीचे. रात्र. यामिनी

Alin ka मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित 
उपक्रम क्रमांक 154
काव्यलेखन 
विषय ... रात्र 
शीर्षक.   रमणीय यामिनी 


कालचक्र चाले नित्य
न चुकता नेमाने रवीचे
 दिनभर तळपून
आगमन होतसे  निशेचे.

रात्र वाटे हवीहवीशी 
जशी आस नव्या उषेची
थकलेल्या जीवाला 
गरज  असे शांत झोपेची

दावी  यामिनी तियेचे
शांत सोज्वळ स्वरुप
चंद्र  ता-यांनी  लोभनीय
रमणीय वाटे  तिचे  रूप 

आकाश  रुपी पांघरूणात
जन शांत घेती विश्राम.
दिवसभराच्या कामाने
तन मनाला मिळे आराम.


विसावती  आनंदाने 
पशु पक्षीगण ही सुखे 
 मंद अनिल विहरतसे
विसरावण्या दिनभराची दुःखे .

विश्वभंराच्या कालचक्राने
असा उषा निशाचा खेळ 
चालवितो, ही त्याची किमया
तोच जमवितो सारा मेळ.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

हृदयातील खरं प्रेम


सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित उपक्रम 
दि 8/2/25
विषय ... हृदयातील खरं प्रेम 

भरजरी साडी फाडली
धार रक्ताची पाहूनी
हृदयातील खरं प्रेम 
द्रौपदीचे आले दिसूनी


हृदयातील खरं प्रेम शबरीचे 
आंबट बोर टाळण्यास
उष्टी बोरे दिधली तिने 
रामास त्रास न होण्यास 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

समाजाचे ऋण. सेवा

सायबर क्राईम पेपरात 


समाजाचे ऋण*

येता मानव म्हणून जन्मा
समाजात  ज्या वाढतो
ऋण असती समाजाचे
त्याचे देणे तो  लागतो.          १


सदा  दावा माणुसकी 
तोची असे खरा धर्म
ठेवा समतेचा भाव 
तेची आहे जीवनाचे मर्म       २


उठवा पतित जनांना
ते ही आपुलेच बांधव
द्यावा हात मदतीचा
हेची सांगती राघव                 ३


पहा बाबा आमटेजी
केले अर्पण  जीवन
सेवा केली कुष्टी रोग्यांची
वसविले त्यांचे आनंदवन              ४

ठेवा स्वच्छता सभोवती
राखण्या स्वच्छ भारत
घेऊ काळजी पर्यावरणची
काम करूया अविरत                    ५


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

चित्र काव्य करू हितगुज

शब्द रजनी साहित्य समूह पुणे  चित्र काव्य  अष्टाक्षरी  शीर्षक  ... करु हितगुज  हात  हातात घेतला जाऊ समुद्र  किनारी मौज लाटांची पहात बसु बाळुत...