येता मानव म्हणून जन्मा
समाजात ज्या वाढतो
ऋण असती समाजाचे
त्याचे देणे तो लागतो. १
सदा दावा माणुसकी
तोची असे खरा धर्म
ठेवा समतेचा भाव
तेची आहे जीवनाचे मर्म २
उठवा पतित जनांना
ते ही आपुलेच बांधव
द्यावा हात मदतीचा
हेची सांगती राघव ३
पहा बाबा आमटेजी
केले अर्पण जीवन
सेवा केली कुष्टी रोग्यांची
वसविले त्यांचे आनंदवन ४
ठेवा स्वच्छता सभोवती
राखण्या स्वच्छ भारत
घेऊ काळजी पर्यावरणची
काम करूया अविरत ५
वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा