मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४
शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४
चित्र काव्य. मिळाला निवांत
मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित
उपक्रम क्रमांक 1156
दि 22/11/24
विषय .. चित्र काव्य
मिळाला निवांत
हवासा वाटतो एकांत
म्हणूनच येऊन बसला
पहात निश्चल शांत जल
गहन विचारात गुंगला
नको तो आवाज गोंगाट
हवा आहे तया एकांत
रम्य सायंकाळी आला
एकटाच बसला निवांत
मिळविण्या ज्ञान , सिध्दी
चित्ताला एकांत हवा
होता एकचित्त , सारे विसरता
एकाग्रता देते विचार नवा
जलात उठणारे तरंग
करीती प्रेरित विचारांना
प्रश्न मनीचे सोडविण्या
सहज ची शोधी उत्तरांना
वर सुंदर निळे नभ
मधे तुरळक आकाशी मेघ
प्रतिबिंबाने झाले जलनिळे
दुरवर दिसते क्षितीज रेघ
सारे सारे कसे शांत
मिळेल मनास शांती
आला होता विचारात
जातांना नसेल मना भ्रांती
वैशाली वर्तक
अहमदाबाद
बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४
गाव जत्रा
मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र आयोजित
साप्ताहिक स्पर्धात्मक उपक्रम क्रमांक 20
विषय..गाव जत्रा
शीर्षक ..सोहळा आनंदाचा
गाव जत्रेचे ऐकलंय
नसतो भपका शहरी
नाही पाहिलीय कधीच
जाण्याची मनीषा अंतरी. 1
गावकरी बैलगाडीने
जातात जत्रेच्या ठिकाणी
आनंदाने भेटती जन
गाती मिळूनी ग्रामीण गाणी. 2
खूप दुकाने सजलेली
वस्तू खेळणी कपड्यांची
न दिसे पीझा, चायनीज ,
असे कांदेभजी ,भाकरी झुणक्याची. 3
खेळ डोंबाऱ्याचा चाले
पताका , दिवे दिसती न्यारे.
मोठे उंच चक्करडयात
बसण्या आतुर जन सारे 4
विरंगुळा मिळे जत्रेत
वाट जत्रेची जन पाहती ,
रोजच्या रहाटगाड्यतून
क्षण सुखाचे अनुभवती. 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
एक मी ही विद्यार्थीनी
मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४
शाबासकी
सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४
रंग (विविध फुले)
अभा म प सा ठाणे जिल्ला 2
आयोजित
उपक्रम
विषय - रंग
किमया निसर्गाची
निसर्गाची पहा किमया
फुले फुलली विविध रंगात
लाल पिवळी श्वेत निळी
तितकीच असे नाना गंधात
फुलांचा राजा गुलाब
रंगे, रुपे, गंधे, रुबाबदार
फुलतो विविध मोहक रंगात
पहा त्याची ऐट शानदार
फुलला मोगरा श्वेतरंगी
माळिता तयाचा गजरा
गंधे चित्ताला वेधक
सहजची वळती नजरा
चाफा शेवंती कह्णेरी
असती विविध रंगात
असे मान तयांचा खास
खुलून दिसती गंध रूपात
रंगात बकुळी रातराणी
जरी पडती जरा मागे
सुगंधात आसती वरचढ
आठवणींचे विणती धागे
सारी किमया विश्वंभराची
केवढी केली सृष्टी तयार
आहे का तया निर्मीतीची भ्रांत
पण सुख दिधले आपणा अपार
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सारस्वतांची मांदियाळी (R)
आयोजित उपक्रम क्रमांक 4
विषय... रंग
निसर्गाचे रंग
सूर्य किरणांचे पृथ्थकरण
करिता मिळती सप्तरंग
सारे रंग पहा कसे मोहक
पाहून मन प्रमोदाने दंग
सोनसळी किरणांची ऊषा
नभात उधळण केशराची
सूर्य जस जसा चढे नभी
लाली वाढे नभात किरणांची
येता वर्षा काळी अवनी
सखा तियेचा सजले नटवे
रुप तियेचे पार बदलते
नव वधुसम नेसे वस्त्र हिरवे.
जलाशय घेई रंग नभीचा
सुंदर नभ सु -नील रंग
रूप प्रतिबिंबित किती सुंदर
जन मनात भरे उमंग
दाखवी रंग नवे नवे
निसर्गच चित्रकार खरा
ऋतु चक्रा प्रमाणे दावी
निसर्गाच्या विविध त-हा.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430
चित्र काव्य करू हितगुज
शब्द रजनी साहित्य समूह पुणे चित्र काव्य अष्टाक्षरी शीर्षक ... करु हितगुज हात हातात घेतला जाऊ समुद्र किनारी मौज लाटांची पहात बसु बाळुत...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
समजून घे तू सुखी जीवन जगण्या स्वभावही हवी तडजोड समजूनी घेता एकमेका जीवन आंब्याची फोड नको आपलाच हेका ऐका दुसऱ्यांचे पण ठरत...






