मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र आयोजित
भव्य दिव्य राज्यस्तरीय मासिक काव्य स्पर्धा क्रमांक ७
विषय . एक.मी ही विद्यार्थीनी
अंत नसे शिक्षणाला
ओघाने आले शिष्य -पद
ज्ञान शिक्षण हवे अंतापर्यंत
जीवन होते निरापद. १
घेते मी ज्ञान समूहातून
कसे करावे उत्कृष्ट लिखाण
तर , झालेच ना विद्यार्थीनी
मानते स्वतःला लहान २
जन्मापासून सुरू नाते
गुरू शिष्य परंपरेचे
लहान असो, मोठेपणीपण
घ्यावे लागती पाठ विद्येचे ३
शिकणे हे गरजेचे
वाढविण्या आपले ज्ञान
विद्यार्थी अवस्था महत्त्वाची
ठेवा सदा त्याची जाण. ४
जाणूनी महिमा गुरूचा
मिळण्या जीवनात आकार
विद्यार्थीनी मी रहाते सदैव
आयुला भक्कम आधार
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा